Tuesday, October 26, 2021

सदरक्षणाय खलनिग्रहणाय

                      सदरक्षणाय खलनिग्रहणाय

सेवा द्यायचीच तर अगदी तन,मन, धन अर्पण करून.अशाच एका सैनिकाचे हे  देशप्रेम!

               खूप कष्टातून प्रविण शाळा शिकला.आईवडिलांनी प्रसंगी उपासमार भोगून त्याला शिक्षणासाठी पैसे पोचवले.त्याच्या आत्मविश्वासाने तो पोलिस दलात भरती झाला होता.त्याच्या हुशारीने तो प्रत्येक सेवा कार्यतत्परतेने बजावत होता.आता दिवस रात्र ड्युटी करून तो ही होता थोडा थकला.आईवडिलांच्या आठवणीने डोळ्यांच्या कडा पाणावल्या.वर्षभरात एकदाही तो आईवडिलांकडे गेला नव्हता, म्हणून आता दिवाळीची सुट्टी घेऊन तो जाणार होता.

          रजा ही मंजूर झाली होती. आई बाबांसाठी कपडे घेतले होते.भावाबहिणींसाठीही खरेदी केली होती.आनंदाने त्याने सामानांची आवराआवर करून ठेवली होती.इतक्यात वरून निरोप आला."तातडीने सेवेत हजर रहा " भरल्या डोळ्यांनी त्याने सामानांवरून नजर फिरवली अन् अंगावर वर्दी चढवली. 

            अचानक दंगल झाली होती.दगडफेक आणि लाठीमार सुरू झाला होता.तो  गर्दीला शांत राहण्याचे आवाहन करत होता.पण .....त्याचा आवाज पोचतच नव्हता.तो जीवाच्या आकांताने  शांत राहण्याचा सल्ला देत होता.पण.....कुठून एक दगड आला अन् त्याच्या डोक्याला लागला.डोक्यांतून रक्ताच्या धारा वाहू लागल्या.

               तो रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच निपचिप पडला.त्याचा जनतेला शांत रहा म्हणून सांगणारा हात तसाच वरच्या बाजूला होता.आणि......आणि रक्ताने भिजलेल्या वर्दीने पुन्हा एक पूत्र गमावला. आणि हिच आठवण " सदरक्षणाय खलनिग्रहणाय" वचनाची ठेवून गेला.

सलाम त्यांच्या सेवेला.


सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर फोन नंबर ७०५७२२५४०७


Saturday, October 16, 2021

संदीप

 * संदीप*


गोड हसर्या स्वभावाचा

मनमिळावू तू वाघ दोस्तांचा

तुकडा आहेस तू आईच्या काळजाचा

असा ढाण्या वाघ तू होतास माळवाडीचा


तुझ्या बोलण्याने तू मनं जिंकलास

मनातली सल तुझ्या मनातच ठेवलास

सर्वांच्यासाठी तू दिलाचा राजा होतास

माणुसकीच्या नात्याचा खराखुरा साज होतास


तुझ्या बोलक्या स्वभावाने तू सर्वांना जिंकलास

शेवटच्या क्षणापर्यंत स्वतः शीच झगडलास

मित्रांच्या आवाजाने जीवाचा आटापिटा केलास

दोस्तांची जान तू त्यांच्यासाठीच धडपडलास


ह्रदयाची धडधड तुझ्या मित्रांना दाखवलास

त्यांना पाहण्यासाठी किती आटापिटा केलास

नियतीच्या विरोधात जाऊनही तू लढलास

असा कसा रे संदीप तू अनंतात विलीन झालास


प्रत्येक आईच्या काळजाचा ठोका चुकवलास

प्रत्येक बहिणींच्या आसवातून ओघळलास

जगण्याची लढाई तुझी तू..... शेवटपर्यंत लढलास

असा कसा रे संदीप तू अवेळी निघून गेलास

दोस्तांच्या चेहर्यावरचे तेज घेऊन गेलास

त्यांच्या मनावर एक जखम ठेवून गेलास

त्यांच्या प्रयत्नांना तू साद का नाही दिलास

असा कसा रे संदीप तू खेळ हा खेळलास


अवघ्या क्षणात तू होत्याचा नव्हता झालास

खूप क्षणिक आयुष्य तू मनसोक्त जगलास

जीवनाची मजा तू अखेरपर्यंत घेतलास

जातानाही मिटल्या डोळ्यांनी तू हसलास

असा कसा रे संदीप तू अवेळी निरोप घेतलास


प्रत्येकाला विचार करायला लावलास

अजाण बालका तू कसा हा त्रास सोसलास

हसर्या चेहर्याआड कसं दू: ख हे पचवलास

असा कसा रे संदीप तू जीवाला चटका लावून गेलास


*सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर फोन नंबर ७०५७२२५४०७*



Monday, October 4, 2021

ती ....अनामिका..... ध्येयवेडी

            ती .........अनामिका......... ध्येयवेडी 

   अल्लड पोर ती बालीश वयाची . खूप हसरी गोड स्वभावाची , सतत माणसांच्या वर्दळीत रमणारी अशी ती हळव्या मनाची भावना जपणारी ..!  

    लहानपणापासून तिला एक वेगळंच पोक्तपण आलं होतं. ती बालिका नसून कूणी प्रगल्भ विचारांची मध्यम वयीन बाईच आहे असं वाटायचं . इतकं समंजस तिचं वागणं बोलणं होतं ..!  परिस्थितीने म्हणा किंवा काही इतर कारणाने तिला बालवयात जे जे हवं ते ते मिळतं गेलं. 

   अर्थात तिच्या मागण्यासुध्दा रास्तच होत्या म्हणा ..!!  तिला कधी फ्राॅक मिळाला नाही तर चड्डी अंगराख होते. केसांवरून तर ती मूलगाच वाटायची , आणि खेळताना खेळसुध्दा ती कबड्डी विटीदांडू लंगोरी सूरपारंब्या असाच खेळायची. त्यामुळे तिच्या मूलगी असण्यावर बहूतेक शंकाच असायची .

   कधी कधी रात्रीची ती पोटाजवळ पाय घेऊन खुरुटं घालून आईच्या मायेसाठी तळमळायची . पण ...... तिचं मन , तिच्या भावना, कूणी समजूनच घेत नव्हतं  आणि मग तिची चिडचिड व्हायची . रागाने कधी ती भिंतीवर तर कधी आरशावर हाताच्या मुठी मारायची. आणि यातूनच तिच्यामध्ये एक न्यूनगंड वाढत गेला. ती शाळेत सुध्दा मूलींच्या घोळक्यात जरी असली तरी...... स्वतः ला एकटी समजायची आणि नाराज होऊन गप्प बसायला लागायची . 

यातून कधी तिला भिंतीवर चित्रविचित्र चित्रे दिसायची आणि नी चक्क त्यांच्याशी बोलायची . आता तिला एकटेपणा वाटतं नव्हता. ती त्या आभासी दुनियेत रमली होती. आता जिथं जिथं तिला एकटे वाटायचं तिथं तिथं हा आभास तिच्यासोबतीला असायचा. 

एकदा मैत्रिणींना तिच्या या विचित्र वागण्याचा संशय आला आणि त्यांनी तिला याबद्दल जाब विचारला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हे एकटेपणामुळे होतं असावं . मग मैत्रीणी तिला अजिबात एकट सोडत नव्हत्या . पण शाळेची वेळ संपली की प्रत्येक जण आपापल्या घरी असायच्या. 

लहान असल्याने घरातले सारखं सारखं दुकानला पाठवायचे. अन् अंधारात तिला ती सावली आपला पाठलाग करत आहे असं वाटायचं. ती धावत धावत जायची अन् भितीने घामाघूम व्हायची. 

 मग या भितीवर मात करण्यासाठी तिने कराटे शिकायचा प्रयत्न केला. एखादी गोष्ट शिकताना ती मन लावून शिकायची . असंच तिने कराटेत ही ब्लॅक ब्लेट मिळवला. आतातर तिची पोरांना सुध्दा भिती वाटत होती. एका फायटीत पोरगं आडवं व्हायचं . 

आता तिला सायकल सुध्दा शिकायची होती. पडत रडत खडतर तिने सायकल सुध्दा शिकली.

आता तिला आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी चालत जावं लागायचं नाही तर सायकलवर टांग टाकल्या टाकल्या दहाव्या मिनिटांत ती मैत्रीणीच्या घराजवळ पोहचलेली असायची. किशोर वयीन पोरवय होतं ते त्या दोघींचं  आठवी नववीला असतील कदाचित....

 पण दोघी एकमेकीत इतक्या गूंतल्या इतक्या गूंतल्या की आजूबाजुछचं भानच विसरून गेल्या. वर्गात शंभर भर मूलंपण या इतर कूणाशी न बोलता एकमेकींशीच गप्पात रमायच्या . दोघीही अभ्यासात खूप हुशार होत्या.

अवेळी आलेल्या शहाणपणा दोघींनी आपलं स्वप्न रंगवलं होतं. एकीला डॉक्टर व्हायचं होतं . त्यासाठी ती जीवाच्या आकांताने अभ्यासात रमायची . तर दूसरीला अनाथ आश्रम उभारून एकाकी मूलांना मायेचा आधार द्यायचा होता. दोघीही कमालीच्या जिद्दी आणि कष्टाळू होत्या.

वर्ष दहावीचं असेल दोघीही खूप नेटाने अभ्यास करत होत्या. दिवसभरात एकदा तरी भेटत होत्या. मनसोक्त गप्पा मारत होत्या. तिला तर आभाळ ठेंगणं झालं होतं. आता त्या दोघींची मैत्री नुसती मैत्री नव्हती तर खूप काही म्हणजे प्रेमाच्या अलिकडे आणि दोस्तीच्या पलिकडे पोचली होती. 

  परिक्षा जवळ आल्याने अभ्यासाची वेळही वाढली होती. कधी कधी रात्रंभर ती मैत्रिणी साठी वेगवेगळ्या गोष्टी करायची. तिच्यासाठी गिफ्ट द्यायची एकेका गिफ्ट पाहून मन हरखून जायचं. तिला आता इथं तिथं मैत्रिणचं दिसत होती. 

दहावीच्या परीक्षा संपून निकाल हाती पडला  होता. नेहमी एकमेकींशी चूरस धरणारी ती फक्त चांगल्या मार्गांनी पास झाली होती तर ती बेस्ट ऑफ फाईव्ह मध्ये आली होती. भविष्यात काय करणार असं जेव्हा हिने तिला विचारले तेव्हा तिनं दिलेलं उत्तर जबरदस्त होतं. ती म्हणाली “ सेवा तर करेनच ” पण शेवटच्या श्वासापर्यंत तूझ्यांवर प्रेम करेल. 

तिला वाटलं मैत्रिण ही असंच काहीसं उत्तर देईल पण झालं उलटचं . तिची मैत्रीण म्हणाली तूझ्या प्रत्येक संधीची माती कशी होईल याची काळजी मी घेईन. आणि ती तरातरख निघून गेली.

इकडे हे अचानक असं कसं झालं या विचाराने ती कोलमडली पण नंतर तिने ही ठरवलं की, यापुढे कितीही अडचणी आल्या तरी ती माझा सेवाभाव सोडणार नाही आणि आजही ती तेच करतेय. प्रत्येकांच्या मनात तिच्याबद्दलचा आदर आज दशपटीने वाढलाय ! 

आजही तिची ती मैत्रिण मोठ्या पदावर कार्यरत आहे. अन् मानसिक त्रासातून.मूक्त होऊन नवे विचार समाजात पेरण्याचा प्रयत्न करत आहे. माणसं जोडतं आहे आणि सेवाभावाची ज्योत नेहमीच मनात जपत आहे. 

    अगदी तुमच्या आमच्या सारखी ! 

               सौ . मनिषा पिंटू वराळे. 

            धरणगुत्ती , तालुका :– शिरोळ , जिल्हा :– कोल्हापूर .

               पिन कोड :– ४१६१०२ 

            मोबाईल नंबर :– ७०५७२२५४०७ 




Saturday, October 2, 2021

नातं मनाचं मनाशी

          🤝  नातं मनाचं मनाशी🤝


    लहानपणी खेळता खेळता अनेक बालमित्र मैत्रीणी भेटतात. आणि तो अजाण जीव त्यांच्यांत रमून जातो. कधी शाळेपर्यंत, कधी हायस्कूल पर्यंत ,तर काही जीवश्च आजन्म सोबत करतात , हेच ते मैत्रीचं नातं आपण स्वतः निवडत असतो. आणि टिकवण्याचा , जपण्याचा प्रयत्न करत असतो. 

       समाजप्रिय म्हणून मान्यता असलेला मानव प्राणी हा जन्माने खूप सारी नाती घेऊन जन्मतो. आईशी नाळेच नातं असल्यामुळे कदाचित तो मातृप्रिय म्हणून ओळखला जातो. आजोबा—आजी , काका– काकी , मामा–मामी , बहिण–भाऊ ही नाती आपसूकच त्याला आईवडिलांमुळे त्याला मिळत जातात.आणि एक सुसंस्कारी आयुष्य तो जीव जगू लागतो .

     निसर्ग नियमाप्रमाणे शिक्षण , लग्न , संसार , जबाबदारी, पार पाडत असताना ... तसेच नोकरी वर सुध्दा तारेवरची कसरत होत असते . ती स्त्री मनाची !  सहजोडीदार व कुटुंबिय समजदार असतील तर ती स्त्री निभावून नेतेचं ! पण .. जर प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचं असेल तर मात्र तिची घुसमट होते. ती कुढत असते , आधार शोधण्याचा नादात कधी भरकटते , तर कधी भक्कम सोबत ही मिळते .

       आणि.. जेव्हा अशी सोबत मिळते . तेव्हा ती मनातुन मोकळी होत असते. असाच एक अनुभव यानिमित्ताने सांगावासा वाटतो. जो सत्य असून भावनिक दृष्ट्या माझ्यासाठी नवं संजीवनी देणारा ठरला . असं म्हणतात की , त्यांच्याच आयुष्यात संघर्ष जास्त असतो .. जो त्या संघर्षाचा सामना करतो .

     कोरोनाच्या महामारीने सारी दुनिया होरपळून निघाली . जणू प्रत्येक हुभर्यापर्यंत हा रोग पसरला . वैद्यकीय सेवेत सेवा देत असल्याने माझ्यासह माझे कुटुंब ही त्या विळख्यात सापडले. कुठेतरी पुण्य असल्याने म्हणा किंवा वडिलधार्यांचा आशिर्वाद म्हणा सेवेतील अधिकारी मंडळीमुळे योग्य उपचार मिळाला. पण...... तो घेत असताना जे मानसिक खच्चीकरण होतं होते, तेव्हा  मानसिक आधाराची खरी गरज होती. आणि खरोखरंच आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की साहित्य सेवेचा डॉ. आमच्या कुटुंबाचा आधार वड ठरला. 

    स्वतः जोखिम घेऊन त्या १४ दिवसांत त्यांनी आमचं जे मनोबल वाढलं ते शब्दात सांगण्यासारखं नाही इतकं अनमोल होत. त्यांचा आठ वर्षाचा मुलगा माझ्यासाठी तर देवदूतच ठरला. त्याने माझ्यासाठी ज्या ज्या सदिच्छा दिल्या , त्या त्या हळूहळू पूर्ण होत आहेत. एखाद्याला सर्दी ताप आहे म्हटल्यावर कोसो दूर पळणारे मित्र , भाऊबंद आणि नातेवाईक यानिमित्ताने त्यांचे खरे चेहरे दाखवून गेले . जिवलग! आणि जिवघेण  यातला फरक अनुभवायला मिळाला . 

    आपण ऐकतो की गरज पडली तर अर्धा रात्रीला मदतीला येईन . पण खरी गरज असतान , आपल्याच माणसांनी फोन न उचलत ,  तोंड फिरवून जाणं, किती जीवघेण असतं, हे फक्त अनुभवणारी व्यक्तीचं सांगू शकते.  असं म्हणतात की.... रक्ताची नाती सर्वश्रेष्ठ असतात  , असतील ही , आहेत ही , पण ..... कधी कधी ती आभासी मृगजळ ही असतात . अशावेळी फक्त नाळेशी जोडलेली नाती म्हणजे आपले आई-वडील, आणि भाऊ  खंबीर पणे उभे राहतात . 

      आणि खरंच मी मनापासून देवाचे आभार मानते की ...., असे दोन सच्चे भाऊ त्याने माझ्या जीवनात पाठवले. व माझा पाठचा भाऊ माझ्यासाठी संरक्षण कवच बनून , त्याने मला जे सहकार्य केलं ते सुध्दा शब्दात सांगता येणारं नाही. या आधी मी फक्त आईवडिलांच्याच ऋणात राहणे पसंत करत होते. पण.... आता या घडीला मी या तीन देवदूतांची आजन्म ऋणी राहीन. त्यापैकी पहिला आहे , तो माझ्या पाठचा लहान भाऊ विजय होय  , त्यानंतर दुसरा आणि तिसरा आहे तो म्हणजे माझा श्वास ज्यांनी नवीन संजीवनी देऊन दिर्घायुष्य बनवला. तो माझा देवचं ! 

    माझ्या असंख्य अडचणींवर मात करणारा प्रत्येक क्षणी नव्या संकटातून बाहेर काढणारा माझा भाऊ डॉ . सुनिल दादा पाटील. जे कवितासागर प्रकाशनाचे प्रकाशक असून माझ्या जीवनातला अंधार मिटवून त्यांनी माझं सुख, माझं सौभाग्य जपण्यासाठी , मला जी काही मदत केली आहे ती निःशब्द करणारी असून हे धाडस फक्त आणि फक्त एक मोठा भाऊचं करू शकतो.

        जो रक्ताच्या नात्यापेक्षा ही कितीतरी पटीने ते आज या दूबळ्या बहिणीसाठी आपलं कर्तव्य अगदी निस्वार्थ पणे पार पाडत आहेत. आणि म्हणूनच ते मला महाभारतातल्या श्री कृष्णापेक्षाही श्रेष्ठ वाटतात , आणि राहतील ही.

बाळाला काय हवं ? हे फक्त आई सांगू शकते  . पण बहिण कोणत्या अडचणीत आहे ? हे फक्त एक सच्चा भाऊच जाणू शकतो. असा अनुभव मला या सुनिल दादांनी दिलेला आहे . स्वतःची बायको आजारी असूनही ते आमच्यासाठी वेळात वेळ काढून सेवा द्यायचे , मन जपायचे आणि एवढ्या आभाळासारख्या मनाचा मोठेपणा असणारा भाऊ मला लाभला.  हेच माझे नशीब समजते. 

   सध्याच्या व्यवहारी जगात स्वार्थाने बरबटलेली नाती असताना . एखाद्याच्या जीवाची रक्षा करावी . यासाठी रात्रंदिन देवाकडे याचना करणारे माझे तिसरे बंधू श्री . राज धुदाट सर ! 

 या दोन्ही जोडप्याकडे बघितलं की आव्हानांना सामोरे जायची प्रेरणा मिळते. जेव्हा मीच काय कोणीही अडचणीत असले की , पहिला पाणी यांच्याच डोळ्यात येते. मग ही नाती मला मिळाली म्हणून मला मनापासून वाटतं की हे नातं जे जोडलयं ते या देवदूताची जे नेहमीच माझ्यासाठी वंदनीय आहेत. असं हे नातं मनाचं मनाशी !!

                           सौ. मनिषा पिंटू वराळे .

             धरणगुत्ती  , तालुका :—  शिरोळ ,  जिल्हा :— कोल्हापूर  

पिन कोड नंबर :— ४१६१०२ 

             फोन नंबर:— ७०५७२२५४०७ 


      

Monday, September 13, 2021

नातं जपताना

                        नातं जपताना

दोष नाही कोणत्याही नात्याचा

इथे महत्व असतं जिव्हाळा जपण्याचा

तू तू मी मी करत नातं द्रुढ करण्याचा 

सूखदू: खात  एकमेकांना समजून घेण्याचा

कारण इथं जपला जातो जिव्हाळा ह्रदयाचा

रोज रोज असतो नवा ध्यास जगण्याचा

हसत खेळत सूख दू: खात सोबत राहण्याचा

किती ओढ असते माणुसकी जपण्याचा

तिचा लटका राग आणि माझा प्रयत्न हसविण्याचा

येईल त्या प्रसंगाचा सामना करण्याचा

कितीदा आली हार तरी प्रयत्न जिंकण्याचा

नात्यांमध्ये घट्ट वीण निर्माण करण्याचा

प्रयत्न सदैव एकोपा टिकवून ठेवण्याचा

जगण्याला नवी दिशा देण्याचा

असो मैत्री किंवा नाती त्यामध्ये विश्वास राखण्याचा

एकमेकांना गरजेनुसार मदतीला धावण्याचा

खूप हळवा असतो जिव्हाळा ह्रदयाचा

मनातले भाव अलगद ओळखण्याचा

एकमेकांना समजून घेऊन आनंदी राहण्याचा

रोज नव्या उमेदीने जीवन भोगण्याचा

केविलवाणा प्रयत्न असतो ना हृदयाचा

सौ.मनिषा पिंटू वराळे.धरणगुत्ती, तालुका शिरोळ, 

जिल्हा कोल्हापूर.

Saturday, August 28, 2021

🏫 शाळा 🏫

                     शाळा

गेल्या वर्षापासून हा कोरोना आलाय

आणि आमच्या शाळेला बेपत्ता करून गेलाय

शाळा बंद, बंद college आणि संपर्क सुध्दा टाळताय

सांगा गुरुजी कधीपासून शाळा सुरू करताय

मास्क स्यानीटायझर चा वापर लय वाढलाय

बास झालं गुरूजी आता आँनलाईन जे शिकवताय

सततच्या मोबाईल मुळं नंबर चष्म्याचा वाढलाय

सांगा गुरुजी कधीपासून शाळा सुरू करताय

बरी होती शाळा आपली सांगा कधी बोलवताय

फळा खडूच्या संगतीने गणितं भरभर सांगताय

प्रार्थना आणि खेळासाठी जीव तुटायला लागलाय

सांगा गुरुजी कधीपासून शाळा सुरू करताय

भरमसाठ फी आँनलाईन शिक्षण जीव बेजार झालाय

दमलेल्या बापाकडे बघून मन कातरत चाललंय

चूक बरोबर सारं काही यंत्र ठरवत चाललंय

सांगा गुरुजी कधीपासून शाळा सुरू करताय

पाठीवरचा हात मायेचा खूप आठवाय लागलाय

बाईंच्या त्या शिकवण्याचा ध्यास आम्हां लागलाय

वर्गमित्रांच्या सोबत दंगामस्तीत अभ्यास करणार हाय

सांगा गुरुजी कधीपासून शाळा सुरू करताय

शिक्षक दिन हा भेटून तुम्हांला साजरा करणार हाय

शाळेतील मज्जा पुन्हा पुन्हा मी चाखणार हाय

खडू फळ्या सोबत आता पुन्हा रमणार हाय

सांगा गुरुजी कधीपासून शाळा सुरू करताय


सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर



                             

Wednesday, August 25, 2021

ओढ

                              ओढ

खूप आठवण येते ग तुझी

तुझ्या हसर्या स्वभावाची

लाघवी तुझ्या बोलण्याची

आणि आतूर या नयनांची

किती

 समर्पक आहेत नावं तुझी उमजेना 

कधी तू ज्योत्स्ना तर कधी स्वप्ना

कशी हेरतेस तू सांग ना

का तुला माझ्या मनाची अवस्था समजेना

आणि होणारी तगमग माझीच मला कळेना

समवयस्क आपण दोघी समजून तू घेशील ना

साथ अशी अर्ध्यावर सोडून नको जावूस ना

माझं हे असंच होतं जीव लावलाय तुला

आयुष्याची सोबती कधी मैत्रिण मानलंस का मला

मावशी मी मावशीच राहिले भेद न हा कळला

माणुसकीच्या नजरेतले माणुसपणच हरवला


सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर




तुझ्या आठवणीत

                 तुझ्या आठवणीत

तू हताश गडबडलेली वाटत होतीस

थोडीशी मनातून गोंधळली होतीस

तुझ्या नजरेतली असहाय्यता दिसत होती

तेव्हा मला तुला आधार द्यायची गरज होती

तेव्हा तुम्ही उपचार जरी घेत होतीस

तरी घालमेल या जीवाची ओळखत नव्हतीस

तू, का कोणास ठाऊक पण या मनात बसली होतीस

रोज तुला फोन करावं इतकी बेचैन तू करत होतीस

भान ठेवून कर्तव्याचे दूर दूर तू राहत होतीस

खरंच सांगते तू मला अगदी हक्काची वाटत होतीस

तू बरी होऊन लवकर यावीस एवढीच इच्छा होती

तुझी काळजी सतत मनाला माझ्या बोचत होती

देणं घेणं ही रीत जगाची भावनेला किंमत नव्हती

मनाने मनाला होतं ओळखलं माणुसकीची गरज होती

कधी वाटलं यावं घेऊन थोडासा अल्पोपहार हाती

मग वाटलं....स्विकाराल का अवस्था सुदाम्यासारखी झालती

ओढ अनामिक तुम्हांला कधीच कशी कळली नव्हती

की जाणुनबुजून व्यवहारी वागण्याची शपथ घेतली होती

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर

Wednesday, July 21, 2021

👩‍⚕️कुचंबणा आरोग्य कर्मचार्यांची👩‍⚕️

     👩‍⚕️👩‍⚕️ कुचंबणा आरोग्य कर्मचार्यांची 👩‍⚕️ 👩‍⚕️

कुणी  कोरोनाला  घाबरून  मदत  करत  नाही  तर  कुणी रक्ताच्या  नात्याची  माणसं सुध्दा  भेटायला  येत नाहीत.. आपुलकी ,  जिव्हाळा ही नाती फक्त बोलण्यापुरती ऊरलेली असताना ,फक्त आणि फक्त आरोग्य सेवेतील कर्मचारी जीव मुठीत घेऊन दिवसरात्र राबत आहेत .... फक्त सेवेचे व्रत घेतल्यामुळे त्यांनी तहान भूक सुध्दा विसरली आहे... काही बोटांवर मोजण्याइतकी कर्मचारी कामचुकार पणा करत ही असतील पण कोविडसेंटरमधील आरोग्य यंत्रणा आणि खेड्यापाड्यांतील आरोग्य कर्मचारी फक्त आपलं गाव, आपला देश या महामारीतून वाचला पाहिजे ...

   या एकाच विचाराने प्रेरित होऊन भरपावसात सुध्दा जनसेवेला वाहून घेऊन झोकून देऊन काम करत आहेत.... तरीसुद्धा........ तरीसुद्धा काही नामवंत समजले जाणारे समाजकंटक त्यांना विनाकारण मानसिक त्रास देऊन त्यांचे मनोबल ढासळत आहेत ... शासकीय कर्मचार्याला घरगड्याप्रमाणे बोलून त्यांचा अपमान करत आहेत... अर्वाच्य शब्दात त्यांचा पान उतारा करत आहेत... इतकेच नव्हे तर... गावात वाहतूकीची सोय नसल्याने ते कर्मचारी स्वतः च्या खाजगी वाहनाने ये– जा करत...कार्यालयीन वेळ संपली तरीसुद्धा सेवा बजावत असताना त्यांच्या वाहनांची छेडछाड करून त्यांना नूकसान पोचवत आहेत.... 

हा असूरी आनंद मिळवण्यात त्यांना काय समाधान मिळते.... हे त्यांचं त्यांनाच माहीत...... इतकं असूनही आपल्या सेवेत खंड न पाडता  ते आपलं कर्तव्य बजावत आहेत.... हे त्यांच्यातील मानवतेचे सहद्यतेचेच दर्शन आहे.... दिसायला प्रतिष्ठीत असणार्यांनी आपलं कार्य ही प्रतिष्ठेला शोभणारे ठेवले...... तरच गाव सुरक्षित राहील अन्यथा या कर्मचाऱ्यांनी यल्गार पूकारला ,  तर  रुग्ण सेवा कोण करेल ?.. साथीला आटोक्यात कोण आणेल आणि एकूणच  गावातील भोंगळ कारभाराला अरेरावीला  खतपाणी घालण्या अगोदर ज्यांनी हे कूकर्म केलेलं  आहे.... त्यांची स्वतःची मनोदेवता तरी त्यांना समाधानाने जगू देईल का ?... 

शासकीय आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्याला त्रास दिल्यास कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.... हेच विसरलेल्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मदतीसाठी आलेल्यांचा आदर केला पाहिजे... त्यांच्याशी सहकार्याने वागले पाहिजे , अन्यथा एक ना एक दिवस जशास तशे होईल , तेव्हा पश्चात्ताप करण्यापेक्षा वेळ आहे..... तोवर सूधारा  कालाय तस्मै नमः  इतकंच ......

         सौ. मनिषा पिंटू वराळे.

धरणगुत्ती , तालुका  :–शिरोळ,  जिल्हा :– कोल्हापूर

Sunday, July 4, 2021

कर्तव्य मूलीचे

                कर्तव्य मूलीचे

संसार आणि लेकरं सोडून ती आली

आई-वडिलांच्या सेवेत ती रमली

क्षण क्षण युगांसारखा ती भोगत राहिली

आईबापांच्या काळजीत ती झुरू लागली

सोशल डिस्टंसिंग ती वागण्यातून सांगू लागली

फक्त आईबापांसाठीच ती जगत राहिली

होणारी घुसमट ओठांतच ठेवून वागली

तिला असं बघून नजर कासावीस झाली

खरंच....आईबापासाठी ती कन्या थोर वाटली

तिच्या नजरेतली असहायता मनाला टोचू लागली

म्हणून मनीषाची लेखणी सरसावू लागली

तिच्या अगतिकतेपुढे नतमस्तक होऊ लागली

आईबापांच्या सेवेत ती दिवसरात्र जगू लागली

कर्तव्य मूलीचे असे ती निभावू लागली

भाऊ भावजयीपासून सुरक्षित सेंटरला ती राहू लागली

ऑक्सिजन बापाला असताना आईलाही जपू लागली

म्हातारपणातील बालखोड्यांना ती समजून घेऊ लागली

अशी कन्या ती आईबापांसाठी आई होवून जगू लागली

                            सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

देवदूत कोविड सेंटर मधील

       देवदूत कोविड सेंटर मधील


थकलेल्या हारलेल्या जीवांना विश्वास दिला

खचलेल्या मनाला तुम्ही खराखुरा आधार दिला

होईल सर्व ठीक फक्त घाबरू नका हा दिलासा दिला

खाऊपिऊ वेळेवर घालून निस्वार्थ पणे औषधोपचार केला

प्रत्येक वेळी स्मितहास्याने सर्वांची तुम्ही सेवा केला

दिवस रात्र फक्त रूग्ण सेवा हा ध्यास तुम्ही घेतला

आसवं भरलेल्या डोळ्यांत तुम्ही आशा जीवनाची भरलात

प्रत्येकाला आपुलकी आणि उपचाराने बरे केलात

जीवन मरणातील आनंद तुम्ही संगीत खुर्ची मधून सांगितला

किती मानावे आभार तुमचे"thank you"हा शब्द सुद्धा तोकडा पडला

मनोभावे रूग्ण सेवेचा ध्यास तुम्ही सार्थ केला

मनोबल वाढवून प्रत्येकाचा आधार तुम्ही झाला

रूग्ण सेवा करून तुम्ही खरेखुरे ईश्वर झाला

सर्वांच्या सहकार्यातून रुग्ण बरा करून घरी पाठवला

या तुमच्या सेवेतून माणुसकीचे दर्शन घडवला

पुन्हा एकदा अभिमानाने ऊर मनीषाचा भरून आला

डॉक्टर, सिस्टर, ब्रदर तुमच्यामुळे जीवनाचा अर्थ कळला

या कोविडमुळे तुमच्यातला देव सर्वांनाच दिसला

मनीषाच्या लेखणीने भावनांचा प्रवाह वाहिला

नतमस्तक हा जीव तुमच्यापुढे कित्येकदा झाला

सर्वे सूखिन भवतू: असाच हा अनुभव आला

                       सौ.मनीषा पिंटू वराळे धरणगुत्ती

           

Wednesday, June 30, 2021

छाया

                         छाया

नावाप्रमाणेच ती मायेची छाया आहे

सर्वांना हसत हसवत ती जगण्याचा मंत्र देत आहे

प्रार्थनेवर अगाढ तिचा विश्वास आहे

आशेवर जगण्याचा तिचा आत्मविश्वास आहे

सुखदू:खावर हसत खेळत तिने मात केली आहे

कर्तुत्वाच्या जीवावर लेकींना ती घडवत आहे

तिच्या जिद्दीवर आमचा पुर्ण विश्वास आहे

मैत्रीण म्हणून ती खरंच खूप खास आहे

जीवाभावाचं हितगूज तिच्या ओठांत आहे

मैत्री काय असते हेच तिच्या आचरणातून कळत आहे

माणुसकीची खरीखुरी ती छाया आहे

मनीषा आणि सुरेखाची तिला अनमोल साथ आहे

तिच्या विचारांतून जगण्याची प्रेरणा मी घेत आहे

          सौ.मनीषा पिंटू वराळे धरणगुत्ती जिल्हा कोल्हापूर

Monday, June 28, 2021

वेळ

                वेळ

माणूस कितीही दक्षता घेत असला तरी त्याची वेळ चांगली असावी लागते.वे

ळ चांगली असेल तर सर्व त्याच्या अवतीभवती माणसांची गर्दी असते.पण.....तीच वेळ बदलली तर जीवाभावाची माणसं सुध्दा दुरावतात.एकमेकांसांठी जीव देण्याच्या गोष्टी करणारे साधी विचारपूस सुध्दा करत नाहीत.एवढेच काय तर तोंड फिरवून जातात.फोन उचलत नाहीत.टोमणं मारत जातात.जिव्हारी शब्दांचाच मारा करून माणसिक खच्चीकरण करतात.

मला इतकंच म्हणायचं आहे की, या विषाणूने आधीच माणसाचा धीर खचलेला आहे.आणि आधाराची गरज असते अशावेळी जर एकटेपणा भोगायला आला तर दूर राहून विचारपूस करणं हे माणुसकी म्हणून आपलं कर्तव्य असतं.पण प्रत्येक जण फक्त तोडत चाललाय आणि हेच चुकीचे आहे असे मला वाटते.शेवटी सारं वेळेवर सोडणे हेच आपल्या हातात असते नाही का?

      सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती जिल्हा कोल्हापूर

Saturday, June 19, 2021

माझ्या रमानं

                  माझ्या रमानं... 

माझ्या भिमाच्या रमानं बाई कसं गं सोसलं 

कष्ट आणि दूखणी तिनं अंगावर काढलं

सार्या समाजासाठी तिनं बाबांना जपलं 

संविधानामुळे माणसात माणसाला आणलं 

माझ्या भिमाच्या रमानं बाई कसं गं सोसलं? ||धृ|| 

दिलं सूख तिनं आणि समतेने वागवलं 

आता खाण्यापिण्याला नाही कूठे कमी केलं 

नटणं थटणं  आणि वागणं बाई थाटात जगवलं 

आता समान दर्जा देऊन बापानं कर्तव्य निभावलं 

माझ्या भिमाच्या रमानं बाई सारंच घडवलं ||२|| 

शिक्षणाचं महत्त्व तिने तेव्हाच होतं ओळखलं 

यशवंतासाठी तिने बूध्दीसागरात तूफान आणलं 

पूस्तकांसाठी राजवाडा हे अप्रूप होतं घडलं 

माझ्या भिमाच्या रमानं समाजालाच घडवलं ||३|| 

शिका संघटित व्हा संघर्ष करा हे सांगितलं

जातीयतेच्या वादावर संविधान श्रेष्ठ ठरलं 

बूध्द धम्मांच्या आचरणाने शांतता पसरवलं

माझ्या भिमानं दिक्षा घेऊन धम्मदानच आम्हां दिलं 


सौ. मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती जिल्हा कोल्हापूर


रिकामं मन

                 रिकामं मन 

 रिकामं मन कित्येकदा एकटंच करून जातं

गर्दीत ही मनाला परकेपणाचं वारं लागतं

आले एकटी जाणार एकटी हे सत्य मनाला पटतं

 जाताना सुध्दा माणुसकीच्या रुपाने आठवणीत उरतं

जगायचं तर हसत खेळत संकटाला का कुणी घाबरतं 

येईल की चांगले दिवस कष्ट करायचे का कुणी थांबतं 

कर्तव्य करताना अपेक्षांचे ओझं मनाला पेलतं 

आशा निराशेच्या हिंदोळ्यावर मन स्वैर होतं

 कधी तरी येईलच विजयाचा दिवस मन सांगतं

 कसं कुठे बदलेल नशिब हे वेळच ठरवत असतं

 कूणाच्याही बंधनात नाही अडखळत ते नशीब असतं

 ध्येयावाचून जगताना रोजच मरण यातना भोगतं

 असं कसं मन आता एकाकी पणानं जगणं 

ना मोह ना माया फक्त कर्तव्यच उरतं 

 सौ. मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती जिल्हा कोल्हापूर

दायी / मावशी

                      दायी / मावशी 

सर्व सामान्यांसारखीच देश सेवेचं व्रत घेतलेली 

इतर मावश्या जेमतेम पण मी जराशी शिकलेली 

झाडलोट करणं परशी पुसणं खर्चासाठी पाणी भरलेली 

दिसायला दणकट पण आतून पोखरलेली 

होय मावशीच मी कूणी दखल न घेतलेली  ||धृ || 

किरकोळ उपचार आणि सांग काम्यासारखी सज्ज झालेली 

कूणी दूखावलं तरी हसून सारं विसरलेली

नको नको म्हणता नाही काळजी मूळे पूढे झालेली 

काही गोष्टी अनुभवातून तर काही कर्तव्यातून शिकलेली 

होय मावशीच मी कूणाच्याही गणतीत नसलेली ||१|| 

समाजसेवेतून देशसेवेचं समाधान बाळगलेली 

चिंताग्रस्तांच्या चेहर्यावर थोडंसं हसू आणलेली 

प्रत्येक अधिकारी घरच्या माणसांसारखं समजलेली 

प्रत्येकात माणुसकी आहे व्यवहार नाही हे मानलेली||२|| 

गरजेनुसार कूणी डावा तर कूणी उजवा हात समजलेली 

कूणी हक्काची समजून लेकीसारखी माया लावलेली 

कूणी घरच्या माणसांपूढे माझं महत्व सांगितलेली 

कूणी माझ्या सेवेचं महत्त्व जाणून हीन मानलेली 

होय मावशीच मी कर्तव्यासाठी जगलेली ||३|| 

 एखाद्या रंग कर्मी सारखी पडद्यामागे राहिलेली 

प्रत्येकाच्या सूखासाठी मनापासून धडपडलेली 

धाडस किती ही असलं तरी नशिबाने मागे पडलेली 

कूणी खिजवलं तरी डोळ्यांत आसू दडपलेली 

होय मावशीच मी कळत असूनही नसल्यासारखं वागलेली ||४|| 

कितीही झाला अपमान तरी खालमानेने जगत आलेली 

तोंड नाही पाठ द्यावी हे शिक्षण घेतलेली 

 होईल की आपलं पण चांगलं ही आशा धरलेली 

प्रत्येक खडतर प्रवासात जिद्दीने वाटचाल केलेली 

होय मावशीच मी! हितशत्रूमुळे त्रासलेली ||५|| 

कधी कधी शून्य नजरेने आत्मविश्वास हरवलेली 

कधी दूखण्याने तर कधी अडचणींनी त्रासलेली 

कधी कधी आपल्याच माणसांनी केलेला घात स्विकारले ली 

तर कधी पश्चातापात होरपळून गेलेली 

 होय मावशीच मी! दिशा हीन आयूष्यजगलेली ||६||      स्वतः:च्या स्वप्नांचा आणि जबाबदारीत कूचंबणा झालेली 

भविष्यापेक्षा वर्तमानाचा विचार करून थांबलेली 

 ध्येय असून ही लाचार लाजिरवाणे जगलेली 

प्रत्येकाच्या हास्यांचा विषय बनलेली 

 होय मावशीच मी! जनसेवेचे व्रत घेतलेली

 किती ही हिणवलं तरी दूर्लक्ष केलेली 

 फक्त माणसांतली माणुसकी जपण्याचा प्रयत्न केलेली 

वृध्दांच्या सेवेत आत्मिक आनंद मानलेली 

सतत कोणत्या तरी अडचणीत सापडलेली 

होय मावशीच मी! जिला सर्वांनी सूखी समजलेली ||७||.    मूलांच्या सूखी आयूष्यांसाठी सतत प्रयत्न केलेली 

शिक्षणाचे महत्त्व सतत सर्वांना सांगत सूटलेली

 पूस्तकांवर  मौल्यवान वस्तू सारखं प्रेम केलेली 

 होय मावशीच मी! सतत व्यवहार शून्य वागलेली  ||८||

   सौ . मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती जिल्हा कोल्हापूर




सवय

                 सवय 

इतकी सवय झालीय तूला पाहण्याची

की वाटतं विचारांती घाई असते तूझ्या येण्याची

तुझी तिरपी नजर साक्ष असते सहवासाची

तू कर्तव्य दायिनी  ओढ तूला कार्याची 

 तूझ्या त्या डोळ्यांत हरवले मी साथ मीपणाची 

 तूला नाहीच कळली ओढ माझ्या मनाची

तू हरहुन्नरी तूला असंख्य माणसे भेटतील ओळखीची

फक्त तूलना केलीस तर गरज नाहीच माझ्या दोस्तीची

असेल गोतावळा भरपूर आणि संगत तूझ्या सखींची

एका उत्तराने भरलीस मनात आस हीच अंतरीची

नको कोणती भेट आणि मेहरबानी पैशा अडक्यांची

पण जप माणुसकी खूप ओळखून गरज माणसांची 

 नजरेतले विष ओळख दान लाभलं जनसेवेची

स्त्रीत्व जपताना टाळ नजर विखारांची

खूपच सवय झाली तूझी ओढ तूला भेटण्याची

कडकडून मारावी मिठी ओढ हीच मैत्रीची

भेटशील तेव्हा बोलशील खूप आण तूला मनिषाची

 तूझ्या माझ्या नात्याला गरज नाहीच नावाची 

मैत्री दोस्ती पदाधिकारी या शब्दांची 

सौ. मनिषा पिंटू वराळे. धरणगुत्ती, जिल्हा:-- कोल्हापूर


पडद्यामागचा बाप

              पडद्यामागचा बाप 

              सगळीकडे गोडवे गातात जन्म देणार्या आईचे 

         लाड करणारी , हट्ट पुरवणारी कोडकौतुक करणार्या माऊलीचे  

पण रीतसर दुर्लक्ष केले जाते दिनरात राबणार्या बापाचे  

बाप कमवितो म्हणूनच तर आई पुरविते हट्ट बालकाचे 

बाप असतो पडद्यामागे मोल ना कुणाला त्याचे 

      शिक्षण , खाणंपिणं , आजारपणं , आले गेलेले सगेसोयरे त्याचे 

       सर्वांनी फक्त वापर केला सूख दुःख ना विचारले त्याचे 

दुखलं खूपलं तरी राबतात हात घरासाठी त्याचे 

मूलांच्या सूखांसाठी धडपडतो तो जरी कठोर शब्दवाणीचे 

श्री फळासारखा बाप असतो मृदू घोट जसे नारळाचे 

     दुखावतो तो आतुन जेव्हा पाहतो लेकरांचा मार्ग चूकल्याचे 

     पश्चात्तापात  होरपळतो तो बाप तळमळतो रात्रीचे 

सक्षम व्हावे लेकरांनी हेच स्वप्न असते बापाचे 

दहाहत्तीचे बळ येते जेव्हा जग कौतुक करते लेकरांचे 

चूकून जरी वाकडा पाय पडला तरी  काळीज तुटते बापाचे 

    आई रडून व्यक्त होते पण दू:ख समजणार कोण त्याचे 

   चार माणसात मान अपमानांनी त्रस्त होते जीवन त्याचे 

स्वप्नांचा इमला ढासळावा तसा ढासळतो विश्वास नात्याचे 

सूचलं जसं तसंच लिहीलं अस्वस्थ मन या मनिषाचे 

आईबापाहून कोण पाहतं हित चिमूकल्या लेकरांचे 

     हसणारे असतात भेदी आपल्याच घरचे 

     तोंडाला साखर काळजाला कातर असे जीवन अनूभवतात 

पण तरी धडपडतात सक्षम बनवून स्वप्न लेकरांचे  

           सौ. मनिषा पिंटू वराळे.धरणगुत्ती,  जिल्हा:-- कोल्हापूर.


कोरोना -- दूसरा टप्पा

             😷  कोरोना -- दूसरा टप्पा 😷 

        आली पुन्हा ही लाट भल्याभल्यांची दूर्दशा झाली 

       नाही कोणते लक्षण तरी तपासणीत पॉझिटिव्ह आली 

आहेत खात्यापित्या घरची श्रीमंती आणि गरीब मंडळी 

कूणी उपचारांती जातं कूणी उपचाराविन अश्रू ढाळी 

   नाही सर्दी नाही ताप नाहीच खोकला जरा ही 

    तरी दूसर्या टप्प्यात सापडले मध्यम वर्गात आणि अजाण बालके ही  

विना लक्षणाची ही संख्या दिवसागणिक वाढत आहे 

अपूरी आरोग्य यंत्रणा दिवसरात्र झटत आहे 

      गावागावांत दक्षता समिती आता स्थापली आहे 

     वृध्द असो वा कर्ता पुरुष क्षणांत नाहीसा होत आहे 

हताश मन पुन्हा पुन्हा स्वतः ला समजावत आहे 

येतील दिवस सूखाचे पुन्हा मात्र संयम आता जरुरी आहे 

      सूरक्षित अंतर स्वच्छता आणि मास्क वापरणे गरजेचे आहे 

       जगण्यासाठी पुन्हा नव्याने कंबर कसली आहे 

दमलेले मन आणि शरीर हताश आता होत आहे 

डोळ्यांदेखत कित्येक जीव निरोप जगाचा घेत आहे 

     काय करावं. कसं जगावं प्रश्न गरिबांना सतावत आहे 

     श्रीमंतांचा थाट वेगळा रोज नवीच डीश ताटात आहे 

धाय मोकलून रडणारी माय तिचा कर्ता पुरुष गमावलं आहे 

लेकरांसाठी जगणं आता नवेच आव्हान ठरत आहे  

  सौ . मनिषा पिंटू वराळे . धरणगुत्ती,  जिल्हा:--   कोल्हापूर

धाय मोकल

Friday, June 18, 2021

नातं नवरा बायकोचं

           👩‍❤️‍👨 नातं नवरा बायकोचं 👩‍❤️‍👨

सातजन्माचं स्वप्न ज्याच्या जोडीने पाहिलं ...

सूखी संसार करण्याला दोघांनी जीवन वाहिलं ...

 एक राबतो उन्हातान्हात त्याला नाही कोणाचा आधार

ती पाठिशी उभी राहते तिच्या शब्दांचाच धीर 

कूणी सतावते त्यांना कूणी करते निराधार

असा धडपडतो जीव त्याला तिचाच आधार

कधी भांडतो, चिडतो , दुःख मनात ठेवतो , तो दिसतो धीर गंभीर 

त्याला किती त्रास होतो तरी लपवत असतो जरी झाला उशीर 

तो असा ढळलेला हातपाय गाळलेला  नवरा म्हणून हारलेला

तरी तिच्यासाठी मात्र भक्कम आधार बनुनी हीरो  ठरलेला

त्याच्या जोडीने तिने कष्ट कित्येक उपसले 

आपल्याच माणसांनी पाठीत खंजीर खूपसले 

तरी नाही ब्रशब्द घाव ऊरात जपले 

सर्वासक्षम दोघे ही मनसोक्त हसले 

नातं नवरा बायकोचं जगी श्रेष्ठच ठरले 

विव्हळणार्या आईबापाला मूलाने नाही विचारले 

असा कर्तव्याचा तो नवरा , बाप , मामा , म्हणून नेहमीच श्रेष्ठत्व मिळवले  

मोडताना कित्येक संसार त्याने होते वाचवले 

असा सूख वाटणारा तो ............... , त्याच्या उरी दु:ख  आले 

सहचारिणीचा विरह त्याला अश्रू अनावर झाले 

नातं नवरा बायकोचं त्याने पूर्णत्वाला नेले  

  सौ . मनिषा पिंटू वराळे .धरणगुत्ती , जिल्हा :-- कोल्हापूर


ती कर्तव्यदक्ष आई

            ती कर्तव्यदक्ष आई

खूप समाधान वाटतं जेव्हा तिच्या कष्टाचं चीज झालेलं मन पाहतं

किती दगदग किती धावपळ सारं काही तिनेच सोसलेलं असतं

कुटुंब आणि नाती जपत असताना कित्येकदा तिचं मन थकलेलं होतं 

तरीसुद्धा नव्या आशेने तिने सर्व काही मिळवलं होतं

ती खूप संयमी आणि जिद्दी तिच्या कतृत्वाचं भान कुणालाच नव्हतं

पण तिने लावलेल्या रोपट्याला वटवृक्षात रूपांतर झालेलं पाहून माझं मन अभिमानानं फुललं होतं

किती कष्ट होते तिचे आणि त्यांचे सुध्दा! हे सर्वांनीच पाहिलेलं होतं

असं आयूष्य सार्थकी तिने लावलं होत

कित्येकदा तुटलेल्या मनाला तिनं शिवलं होतं 

माणसं जोडण्याच्या नादात मन पुन्हा हरलं होतं 

नाती जपताना कित्येकदा नात्यांनी रंग दाखवलं होतं 

असं आयूष्य रोज नवा धडा शिकवतं होतं

 सौ. मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती . तालुका:-- शिरोळ  ,जिल्हा:-- कोल्हापूर

















सेवा

               👩‍⚕️  💊💉 सेवा 💉💊👩‍⚕️

सेवा देणारे किती साहसी असतात ते डाॅक्टर ..👩‍⚕️

 त्यांच्या बरोबरीने काम करतात त्या सिस्टर..👩‍⚕️

त्यांच्या साठी रुग्ण सेवेतच दिसत असतो ईश्वर..🤲

म्हणून सदैव असतात त्या कार्यतत्पर..

असो सेवक सेविका किंवा आशा आणि परिचर ..

ध्यास फक्त एकच रुग्ण बरा व्हावा सूकर..

किती धाडसी असतात ते सफाई वर्कर्..

स्वच्छता आणि समृद्धी साठी झटतात ते शूटर ..

आयूष्य लागले पणाला कोरोनाचा असा कहर...

तेवढ्यात नवा रोग आला दूषित करतो रोग्यांची नजर..

कुठे कुठे धावणार आहे आरोग्य यंत्रणा कोण करेल विचार..

तरीही बिनधास्तच बोलत असते आपलं सरकार..

कोण घेईल काळजी आरोग्य यंत्रणेची होऊन जबाबदार..

व्हावे सारे कूशल मंगल रहा घरी सुरक्षित चालावा कारभार..

करा नाकाबंदी किंवा लाॅकडाऊन पण व्हा सर्वांनीच जिम्मेदार..

आणि बंद करून टाका हे कोरोनाच्या असूराचं दार..😷😷

सौ. मनिषा पिंटू वराळे. धरणगुत्ती, तालुका :-- शिरोळ ,जिल्हा:-- कोल्हापूर..



Saturday, May 29, 2021

आक्का

                        आक्का

सात भावंडात माझी लाडकी आक्का बहीण

तिनं सोसलं गरिबीचं चटकं लहानपणी

केला सार्यांचाच सांभाळ, माया देऊन आईवाणी

माझी आक्का अशी होती,गोड फणसाच्या गर्यावाणी

भावंडासाठी तिची.... काय करू काय नको अशी धावपळ होई

एक जीवानं जगली माझी आक्का होऊन आई

सुखदू:खात सार्यांच्या ती धावतपळत येई

माझी आक्का लय गुणी अशी होती बहिणाबाई

भोगलं गरिबीचं चटकं नाही हरली राबाया

आता दिस आलं चांगलं पण....ती नाही भोगायला

दोन बंगल्यांची मालकीन कशी गेली निघूनिया

नातलगांच्या गराड्यात आक्का नाहीच दिसाया

तिनं मानलं सर्वांना आपलं अशी गुणवंत होती काया

माझ्या आक्का सारखी नाही मिळणार कुठे माया

संसार नेटाचा करण्या झटली तिचीच ही किमया

कशी वाहू आदरांजली दू:ख अमाप झालंया

भरल्या घरातून ती अशी निघून गेलीया 

चिमण्या लेकरांनी तिच्या किती धावा केलाया

तरी दिसेनाच कुठे माझ्या आक्काची ओ छाया

अशी मायाळू कनवाळू हरपली छत्रछाया


सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती जिल्हा कोल्हापूर



Tuesday, May 25, 2021

बेजबाबदार माणूस

                           बेजबाबदार माणूस


असंख्य प्रश्नांचा भडीमार असतो

जेव्हा रोज कोविड म्रुत्यूचे थैमान बघतो

कित्येक संसार.....हा विषाणू मोडतो

कोणी व्यसनांपायी लेकरांना निराधार करतो

कधी थांबणार हे दूष्टचक्र विचार मी करतो

आयुष्य कसे जगावे हेच माणूस विसरतो

आव्हांनानी आणि कर्जांनी तो जीव थकतो

असा बेईमान माणूस जेव्हा जगणंच विसरतो

सततचे टेन्शन आणि मनस्ताप तो भोगतो

क्षणाक्षणाला स्वतः चं रक्त जाळत असतो

कधी बदलणार ही वेळ याचाच विचार मी करतो

पुन्हा हसतील का लेकरे... हे हळूच जेव्हा पाहतो

कुणासाठी ही धडपड अधांतरी जीव उरतो

कधी होईल माणूस शहाणा प्रश्न मज पडतो

स्वतः चं स्वतः चा रक्षक व्हावा हेच तो विसरतो

आपली जबाबदारी कुटूंबातली हे जसे तो जाणतो

तरीसुद्धा नकळत स्वतः कडेच दूर्लक्ष करतो

का बरं माणूस इतका बेजबाबदार वागतो

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती जिल्हा कोल्हापूर



Tuesday, May 11, 2021

फक्त कर्तव्यच

         फक्त कर्तव्यच

रिकामं मन कित्येकदा एकटंच करून जातं

गर्दीतही मनाला परकेपणाचं वारं लागतं

आले एकटी जाणार एकटी हे सत्य मनाला पटतं

जाताना सुध्दा माणुसकीच्या रुपाने आठवणीत उरतं

जगायचं तर हसत खेळत संकटाला का कुणी घाबरतं

येतील की चांगले दिवस कष्ट करायचे का कुणी थांबतं

कर्तव्य करताना अपेक्षांचे ओझे मनावर पडतं

आशा निराशेच्या हिंदोळ्यावर मन स्वैर होतं

कधी तरी येईलच विजयाचा दिवस मन सांगतं

कसं कुठे बदलेल नशिब हे वेळच ठरवत असतं

कुणाच्याही बंधनात नाही राहत ते नशीब असतं

ध्येयावाचून जगताना रोजच मरण यातना भोगतं

असं कसं मन आता एकाकी पणाने जगतं

ना मोह ना माया फक्त कर्तव्यच उरतं

            सौ.मनीषा पिंटू वराळे धरणगुत्ती जिल्हा कोल्हापूर

जातील की हे ही दिवस

                        जातील की हे ही दिवस

शून्यातून निर्मिलेल्या संसाराला दोघांनी उभं केलं

चिमण्या डोळ्यात उद्याचे स्वप्न आपण पाहिलं

जातील की हे ही दिवस आपण कधी कोणाचं वाईट केलंय//१//

येईल जे पण संकट आपण दोघांनीच परतून लावलं

काही गोष्टी मनाविरुद्ध झाल्या म्हणून मनालाच समजावलं

काही नाती रंग दावूंन गेलीत तरी कर्तव्य आपण केलं

कर्तव्यासाठी एकोप्याने राहून जीवाचं रान केलं

जातील की हे ही दिवस अजून मन नाही हरलं//२//

माणसांत देव बघायचा आईबापाला ईश्वर मानलं

कधी कुणी बोललं कधी शब्द जिव्हारी लागलं

आपल्याच माणसांनी कधी आपल्याला उघडं पाडलं

पुन्हा पुन्हा मन आपलं तीळ तीळ तुटत राहीलं

तरीसुद्धा हिंमतीने आपण सारं काही सोसलं

जातील की हे ही दिवस अजून मन आशा नाही सोडलं//३//

कधी कधी जवळच्यांनीच आपल्याला लांब लोटलं

तू मोठा की मी मोठा या अहंकारात होतं भरडलं

हो तूच मोठा म्हणून माघारी परतताना होतं डोळं भरलं

किती तरी वेळा मन आतून होतं तूटलं

जातील की हे ही दिवस आपण तर सर्वांनाच होतं जपलं//४//

प्रत्येक जण आपण बरोबर याच भ्रमात होतं राहिलं

कुणी तरी छोटेपणा आणि मोठेपणा हा भेद होतं केलं

कुणीतरी अगदी अपमानास्पद होतं वागवलं

टोचून बोलण्यांनी मन रक्तबंबाळ होतं झालं

जातील की हे ही दिवस आपण तर प्रामाणिकपणे जीवन घालवलं//५//

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती जिल्हा कोल्हापूर




Saturday, May 8, 2021

धरणगुत्ती माझं गाव

            🌏  धरणगुत्ती माझं गाव 🌏

पंचगंगेच्या काठावर वसलंय धरणगुत्ती गाव

हिरव्या निसर्गाच्या कुशीतलं माझं गाव

सर्रास इथं वस्त्या मळे पसरलं पार नाक्यापर्यत

मोजकीच लोकसंख्या पण विस्तार याचा जयसिंगपूर पर्यत

मळे मळे हिंडून बघता रानं हिरवी गार

हिरवाईच्या नवलाईन समाधान मिळते फार

गावाची सुरुवात पूर्व दिशेने केले तर शिरोळ हा रस्ता

इथं पाटील गल्ली आणि भीमवाडीचा बस्ता

इथली सुरुवात होते बूध्दवंदनेने विहारात

इथेच मिळते तूम्हांला माणसं माणूसकीच्या रुपात

पश्चिम दिशेला नांदणी रस्ता धनगर गल्लीची जमात

बिरोबा मंदिर बघून दंग व्हाल तूम्ही भंडार्यात

दक्षिण दिशेत पाण्याची टाकी आणि आहे जैन मंदिर

सर्वांच्या एकोप्याने नांदतो इथे दर्ग्यातला पीर

स्पर्धा परीक्षा आणि कलागूणांनी प्रसिद्ध इथला वीर

मूलगी मूलगा एकसमान मानूनी बनवतात खंबीर

उत्तरेला बघाल तर महादेवांचं मंदिर

त्यांच्याच शेजारी मरगूबाई लक्ष्मी मातेचे मंदिर

 त्याहून मोठा अभिमान इथं जीवन शिक्षण विद्या मंदिर

 इथेच घडतो ज्ञानवीर आणि शूध्द जलमय नीर (पाणी) 

 हगंणदारी मूक्त गाव निर्मल गाव म्हणूनी वाटतो अभिमान

पूर आला की साथ आली तरी जपूनी आपली शान

 भरचौकात तलाठी आॅफिस ग्रामपंचायत आणि दवाखाना

 इथे सारे समान म्हणूनी मिरवते स्वस्त धान्य दुकान

सर्वे सूखिन भवतू असा वाटतो आम्हांला अभिमान

 शेखर दादांसारखी माणसे आहेत गावाची शान

स्पर्धा परीक्षा व्यायाम शाळा माळवाडीचा अभिमान

 जयप्रकाश मधले उद्यान पाहूनी हरवून जाते भान

 धरणगुत्ती या गावाचा वाटतो आम्हांला अभिमान 

             सौ. मनिषा पिंटू वराळे , धरणगुत्ती जिल्हा:- कोल्हापूर

Wednesday, April 28, 2021

गर्जा महाराष्ट्र माझा

                           गर्जा महाराष्ट्र माझा

हिरव्या निसर्गाच्या कुशीत लपलाय रानमेवा ताजा

मनापासूनी गर्जा तुम्ही जय जय महाराष्ट्र माझा//१//

डोंगर दर्या आणि कड्या कपारीतून स्वराज्यासाठी लढला राजा

छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सन्माननीय तो राजा

परस्त्री मातेसमान वागवून राखली स्त्री जातीची लज्जा

मनापासुनी वंदन करते वीर शिवाजी राजा

मनापासूनी गर्जा तुम्ही जय जय महाराष्ट्र माझा //२//

स्वराज्य रक्षणासाठी जिजाऊंनी दिधला शिवबा राजा

इथेच घडले लेखक, कवी;इथेच सुचते चारोळी आणि कविता

गझलांच्या, गाण्याच्या मैफिलीत विसरून शीण तुम्ही जाता

अशा पावन भूमीत जन्मलो गातो महाराष्ट्र माझा

मनापासुनी गर्जा तुम्ही जय जय महाराष्ट्र माझा//३//

इथेच कर्मभूमी गाजली,फड कूस्त्यांचाही रंगला

इथेच तमाशा आणि कलापथकांनी रस्ता आणि चौक सजला

इथेच नाट्यगृहामुळे कित्येक कलाकार साकारला

गीत, संगिता मुळेच इथला रोमरोम होता शहारला

अशा गुणांनी महाराष्ट्र माझा जगात भारी ठरला

अभिमानाने कितीदा नमवीला माथा, गर्जा महाराष्ट्र माझा//४//

कोरोनाने जीव सार्यांचा काकुळतीला आला 

मास्क लावून हात धुवून सुरक्षित अंतर पाळा

सहकार्याने हे ही युद्ध जिंकूनी होऊ विजेता

मनापासूनी गर्जा तुम्ही जय जय महाराष्ट्र माझा//५//

          सौ.मनीषा पिंटू वराळे धरणगुत्ती जिल्हा कोल्हापूर









Sunday, April 4, 2021

कधी कधी वाटायचं

                        कधी कधी वाटायचं

कधी कधी वाटायचं तू येशील तेव्हा तुझ्याही डोळ्यांत मला ती अधिरता जाणवेल

तू येशील आणि माझा हात हातात घेशील

काय अन् किती बोलू असं म्हणशील

पण.... तू आलीस कोरड्या नजरेने

कुठेतरी डोळ्यातला ओलावा विसरून

बघतेस आजही!तसाच......कटाक्ष टाकतेस

मग मी ही माझ्याच परीने अर्थ काढत बसते

कारण आपली मराठी भाषा वळवेल तशीच वळते

मग वाटतं.... तू कर्तव्य दक्ष अधिकारी असतेस

चपराश्यात कशाला आणि का घूटमळतेस

का?करायची असेल तुलाही मैत्री माझ्याशी

तुलाही हवंय कुणीतर ओळख करून देईल तुझीच तुझ्याशी

तुला हसवणारं, तुला फुलवणारं तुला नवी उमेद देईल

आणि दोन मनाचं तेव्हाच एका स्वच्छ नात्यात रुपांतर होईल

तुला काही शिकवता शिकवता मीच एकदा एकाकी होईल

अन् तेव्हाच तर खरी माणुसकीची पारख होईल

              सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती जिल्हा कोल्हापूर

भातुकली

                        भातुकली

आज मन पुन्हा लहानपणीच्या आठवणीत रमते

भातुकलीच्या खेळातील राजारानी आठवते

कधी ती छोटीशी कुरबुर आणि लटका राग आठवते

तर कधी मैत्रिणींशी केलेला रुसवा राग साठवते

सारंच आज वेगळं आणि सत्य डोळ्यात पाणी दाटते

लहानपणीच्या दिवसांना आठवून ओठांवर हसू उमटते

आज संसारात रोजच नवी धावपळ असते

डब्यात काय, नाष्टा काय अशी आवडीनिवडी जपत राहते

नोकरी सांभाळताना तर त्रेधातिरपीठ उडत असते

सगळ्यांच्या वेळा सांभाळताना नाकीनऊ येत असते

अशीही सत्यातली भातुकली प्रत्येकीच्या नशिबी असते

आता लटका राग नसतो तर चिडचिड आणि टोमणे असते

वठारलेल्या डोळ्यांमधून तिरस्काराची नजर असते

कुत्सित बोलण्याने काळीज चिरत जात असते

आताची भातुकली खरंच खूप दमछाक करते

कर्तव्य आणि संस्कारांची ओझी ती मिरवत असते

कधी आईबापांच्या इभ्रतीसाठी तडजोड ती करत जगते

एक आई म्हणून जगताना ती खरंच रोज मरत असते

दोन शब्द प्रेमाचे ऐकण्यासाठी ती जीवाचा कान करत असते

अशी सत्यातली भातुकली खरंच किती परिक्षा घेते

      सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती जिल्हा कोल्हापूर

Thursday, March 25, 2021

तहानलेली धरणी माझी

        तहानलेली धरणी माझी

सगळीकडे तापलेली सूर्याची किरणे पसरली

उन्हाच्या झळांनी माणसांसकट जनावरं ही घामेजली

रानातली पिकं पाणी या उन्हानं की होरपळली

तहानलेली धरणी माझी, पाणी बघून हरखली //१//

आळीपाळीने मिळतं पाणी,शेतं शिवारं भेगाळली

कर्जाच्या ओझ्याखाली शेतकर्याची कंबर मोडली

पिकाला पाणी नाही माळव्याला दर नाही आसवं डोळ्यात दाटली

तहानलेली धरणी माझी लेकूरवाळींच्या गालावरून ओघळली//२//

कुणी आपुलकीने चौकशी नाही केली

जिव्हारी बोलण्याने काळजाचं पाणी केली

नाही ओढ नाही आपुलकी व्यवहारी दुनिया झाली

तरी तहानलेली धरणी माझी आशा मनात पेरून गेली//३//

मायबापाच्या कष्टाची लेकराने खातर नाही केली

लेकरांच्या सुखापायी बापाने वेदना सोसली

ठणकणार्या यातनेवर माय फूंकर हळूच घाली

तहानलेली धरणी माझी नवी प्रेरणा तिनं दिली

लढण्याची जिद्द तिनं मनामनांत पेरली//४//

      सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती




Tuesday, March 16, 2021

आठवण

                        आठवण

क्षणाक्षणाला येणारी तुझी आठवण

आणि माझ्या मनातली तुझी साठवण

कधी तू माझ्याशी हक्काने बोलणं

आणि कधी तुझं चटकन रागावणं

तुझ्यात गुंतताना माझं मलाच जाणवणं

एका म्रुगजळापाठी माझं धावत राहणं

खरंच जगावेगळं आहे व्यवहारी जगणं

लाघवी स्वभावानं माझ्या मनाला भुरळ घालणं

ऊनसावलीचा खेळ जसा तसं सुखदूखा:चं असणं

कधी आशा तर कधी निराशा पदरी उरणं

किती निरागस अन् लाघवी स्वप्नं उराशी बाळगणं

शेवटी आलोय एकटं जाणार एकटं हेच सत्य स्विकारणं

क्षणाक्षणाला तुझ्या विचारांचं काहूर पसरणं

वाटतं तिच्या डोळ्यांत माझं बुडून उरणं

            सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती


तुला आपली मानली

                 तुला आपली मानली

तुला पहिल्यांदा पाहिलं आणि तुझ्या नजरेने मला आपुलकीची साक्ष दिली

तुझ्या कोरड्या शब्दांमध्येही मला मार्दवता जाणवली

का कोणास ठाऊक? पण माझ्या मनाने तुला आपली मानली//१//

तुझ्या शब्दातली कटूता आणि डोळ्यातली अधिरता मला जाणवू लागली

का कोणास ठाऊक पण तू मला आपलीशी वाटली//२//

तू रोखठोक, सडेतोड वागणारी खूप कठोर भासली

पण तुझ्या खोलवर नजरेतली आपुलकीही जाणवली

डोळे आणि ओठांची तेव्हा जुळवाजुळव का झाली

का कोणास ठाऊक पण तू मला आपलीशी वाटली//३//

मान्य आहे अल्पावधीतच कुणी आपलं होत नसतं ही कारणमीमांसा मनाला माझ्या पटली

पण एक असं नातं ज्याला नाव नाही पण अर्थ आहे याची खातर मनाला झाली

तू मान अथवा नको मानू कोणतीही जोरजबरदस्ती मी नाही केली

पण खरंच मनापासून खोल कुठंतरी तुझं अस्तित्व तू कोरून गेली

आणि का कोणास ठाऊक पण तू मला आपलीशी वाटली//४//

तुला असेल का माझ्याबद्दल तितकीच ओढ किंवा नसेलही याची खातरजमा मी नाहीच केली

पण तुझ्या डोळ्यात पाहताना तू फक्त माझीच असावीस ही आशा मनात अंकुरली

आणि कधी जवळून तर कधी दुरुन मी तुझ्या भावना वाचण्याचा प्रयत्न केली

पण अबोल निशब्द तू तुझी मैत्री नाहीच मनाला पटली

तरीही का कोणास ठाऊक पण....... तू मला माझी आपलीशी वाटली//५//

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

बरोबरी

                     बरोबरी

हरलेलं, माझ्या मनाची नजर तुला शोधत होती

का?कोणास ठाऊक?पण.... सैरभैर मनाला ओढ तुझीच लागली होती

तू कामात व्यस्त आणि ध्येयात तुझ्या गुंतली होतीस

आणि मी मात्र भावूक होऊन तुलाच सगळीकडे शोधत होती

माहित आहे मला,महाल आणि झोपडीची बरोबरी होणार नव्हती

पण माणूस म्हणून मला फक्त समानताच जाणवत होती

सतत तुझा विचार आणि का मनाला हुरहूर लागली होती

तुझी चौकशी करावी या विचाराने मीच मला सतावत होती

हरलेय मी!नात्यांतल्या अनुभवातून साक्ष घेतली होती

तरीही तुझी ओढ अनामिक मनाला लागली होती

कित्येकदा समजावलं मनाला की ही जगण्याची रीत नव्हती

एकटे येऊन एकटे जाण्याची सत्यता स्विकारली होती

तरीही..... तू मनातून माझ्या क्षणभरही जात नव्हती

का बरं?ही कोणत्या नात्याची सुरुवात होती........

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Monday, March 15, 2021

आई एक अकल्पित ठेव.....

 

              ...😘 आई एक अकल्पित ठेव 😘...


 काल संजिवनी ताईंच्या आईला भेटण्याचा योग आला , निमित्त होतं , प्रिन्सचा वाढदिवस 🧁! प्रिन्स नऊ वर्ष चा एक निरागस,बालक,  तरीसुद्धा ! दूर दृष्टी असणार एखाद्या विषयी खूप अगतिकपणे बोलणारा सर्वाशी जवळीक साधणारा ... थोडासा खोडकर पण , खूप सारा विचार करणारा , जणू ज्ञानाच्या सागरातला अनमोल हिराचं !  अशा या छोट्या देवदुताच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक साहित्यिक विचारवंत जमलेले असताना , एक दुग्धशर्करा योग जुळून आला तो म्हणजे कविरत्न विजयकुमार बेळंके सरांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलं ...💐

       

    ज्या माऊलीनं मला माध्यमिक शिक्षण घेत असताना शिकवलं होतं . जी उमेद आम्हां विद्यार्थ्याच्या मनात भरली होती. त्या सर्व गोष्टी आज जशाच्या तशा डोळ्यासमोर उभ्या राहिल्या आणि जीवनाचा अभ्यास एखाद्या चलचित्राप्रमाणे डोळ्या पुढून सरकत गेलो . खूप काही मनात सुरू होतं . काय सांगावं, कुठं थांबावं , याचा विचार करता करता वेळेचं भान ठेवणं गरजेचे होतं ! आणि SHORT BUT SWEET  अशा अर्थाचं मनोगत व्यक्त करून मी स्थानापन्न झाले . मनात विचारांचे काहूर माजले होते. का कोणास ठाऊक ?  एक वेगळंच विश्व मनाला सारखं मोहित करते होतं राहून राहून मन बालपणात शिरत होतं . आणि ती माऊली मला साक्षात वात्सल्य देवता भासत होती. 

      

   काही वेळाने एक   शिडशिडीत बांधण्याची व्यक्ती माझ्या समोर आली अन् नावाने हाक मारली ! मी तिला ओळखलं नव्हतं . पण तीने ज्या अगतिकपणे माझ्या कविता ह्या माझ्या नसून तीच्या जीवनातील घटना आहेत , असं सांगितलं . तेव्हा वाटलं , खरंच  बाईचं बाईपण कुठं ही गेलं तरी सोसावंच लागतं. मग ती महलों की रानी असू दे कीं झोपडीतील दिनवाणी . 


              अनेक साहित्यिकांना ज्यांनी जगण्याची संजिवनी दिली होती. त्या कवितासागरच्या संचालिका , मुद्रितशोधिका संजिवनी ताई पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या . 


        वाचनावेड🧾 इतकं होतं की स्वयंपाकाचं भान उरत नव्हतं . खाणं पिणं कळत नव्हतं. आजू बाजूच्या लोकांचा विसर पडावा इऊ देहभान विसरून अफाट वाचन करणारी ती माऊली ! एका अपघातानंतर तंद्रीत गेल्या सारखी वागत होती . कोणत्या पुस्तकात कुठल्या पानावर , काय लिहीलं हे अगदी अचूकपणे ती सांगत होती . आपल्या तिन्ही लेकरांना तिनं उच्च विद्या विभूषित करून क्लासवन अधिकारी बनवलं होतं . पण पतीच्या अकस्मित जाण्याने त्या आतून तुटल्या  होत्या . 

बोलण्यातला लाघवीपणा आणि शिक्षणावरचं अतूट प्रेम जाणवतं होतं . एक खंत सतत मनाला बोचत होती की  होती , की का आपण शिक्षणापासून वंचित राहीलो ..... आणि एक समाधान ही होतं की, आपली मुलं आपापल्या कार्य क्षेत्रात स्थिरस्थावर झालीत .  खरंच एक आगळा वेगळा अनुभव अनुभवला जो माझ्यासाठी प्रेरणा देणारा आणि अनमोल होता .👍👍 

       💗    सौ. मनिषा पिंटू वराळे . धरणगुत्ती 

           ता. शिरोळ , जिल्हा . कोल्हापूर ... 😊

Saturday, February 6, 2021

माता रमाई

                         माता रमाई

भिकू म्हात्रेंची द्वीतीय कन्या नाव तिचे रमाई

भाग्याची भागिरथी होशील असे म्हणायची तिची आई

आई बापाची लाडकी आणि समंजस जणू ती जाईजुई

धाकट्या शंकर भावाची अन् गौराईची ती ताई

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर काकांसोबत गाठली मुंबई

रामजी सपकाळांनी सून ठरवली नाव तिचं रमाबाई

भिमरावांची पत्नी रमा झाली ही आईवडिलांचीच पुण्याई

कधी दगड फोडले तर कधी डोक्यावरून पाटी नेई

कधी रक्तबंबाळ पाय झाले तरी कर्तव्यात नाही केली कुचराई

भल्या पहाटे उठून शेणी गोवर्या थापण्यास ती जाई

तरी साहेबांना परदेशी पैसे ती पाठवत राही माझी रमाई

अवेळी लेकरांच्या जाण्याने हतबल झालेली रमाई

यशवंताकडे बघून जगण्याची उभारी घेई

दिनदुबळ्यांची ती थोरली आई झाली रमाई

बाबासाहेबांची सावली आणि दलितांची ती आई

अशी माऊली लाभली हिच खरी दिनदुबळ्यांची कमाई

                सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर

Tuesday, February 2, 2021

अरे संसार संसार

                   अरे संसार संसार

अरे संसार संसार  तुझा किती रे आधार

माझ्या घराचा कणा आहेत सासू नी सासरं

माझ्या चिमुकल्यांना घालते मायेचा पदर

देशासाठी घडावा सीमेवरचा तो सरदार

अरे संसार संसार तुझा किती रे आधार  //१//

माझ्या भावाबहिणींना मिळावा सुखाचा आहेर

भावजयीने ठेवावं असं मायेचं माहेर

नंदादिरात वावरताना ठेवला सार्यांचा आदर

त्यांच्या दिमतीत असताना माझा मलाच पडतो विसर

अरे संसार संसार तुझा किती रे आधार. //२//

असं गोकुळ केलं घराचं आईवडिलांचे संस्कार

माझ्या चिमुकल्यांना भरवते मी सुखाने भाकर

कधी आल्या अडचणी झाले दू:खाने  बेजार

तरी घरधनी माझा हिंमतीने मला सावरणार

अरे संसार संसार  तुझा किती रे आधार //३//

कर्तव्यासाठी जगताना पडला भावनांचा विसर

दोघे होऊन संसाराची चाके गाडा नेटाने ओढणार

जरी थकलो भागलो तरी नाही घेणार माघार

येईल त्या परिस्थितीला आम्ही दोघे सामोरे जाणार

अरे संसार संसार तुझा किती रे आधार //४//

मला येतंच नाही दुटप्पी जगणं मी कसं रे जगणार

सरळ वाटेने जाणार्रयांना आडकाठी का येणार

माझं शील महत्त्वाचं माझा भक्कम आधार

ऊन सावलीत ही साथ माझा भ्रतार देणार

अरे संसार संसार तुझा किती रे आधार //५//

शिक्षणाचं महत्त्व लेकरांच्या मनात बिंबवणार

शूर शिवबा आणि रामजीचा भिमा सांगणार

माता रमाईच्या कष्टाची मी गोष्ट सांगणार

जिजाऊंच्या संस्कारांची मी रीत सांगणार

अरे संसार संसार तुझा किती रे आधार //६//

आम्ही सावित्रीच्या लेकी आम्हां ज्ञानाचा आधार

येईल त्या परिस्थितीला आम्ही सामोरे जाणार

माझ्या सुखाचा सोबती मला घरधन्याचा आधार

त्यांच्या कष्टानेच खातो आम्ही सुखाने भाकर

अरे संसार संसार तुझा किती रे आधार //७//

माझ्या सौभाग्याने दिला माझ्या जीवनाला आकार

साहित्यात लिहीण्याचे स्वप्न झाले की साकार

थोर मायबाप आणि सासू सासर्यांचे आहेत उपकार

माझा चंद्रमौळी संसार त्यात गुण्या गोविंदाने नांदणार//८//

अरे संसार संसार तुझा किती रे आधार 

आमच्या लेकरांच्या स्वप्नांसाठी आम्ही दोघेही राबणार

त्यांना स्वावलंबी करण्यासाठी कष्ट उपसणार

अशी सावली मायेची जन्मभर त्यांना देणार

माझ्या घराचं गोकुळ त्याला तुझाच आधार

अरे संसार संसार किती मानावे आभार //९//

           सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती 

Tuesday, January 26, 2021

माझ्यातली तू

                    माझ्यातली तू

सहज बोलता बोलता समजलं की, आजही तू माझा विचार करतेस.पण संयमाने हे मान्य करायला टाळतेस.कारण, तुलाही माहीत आहे की, तुला सोडून मी दुसरा कोणताच विचार करणार नाही. तसं तुझं मत खरंच आहे म्हणा !  ‌‌‌     

    पण खरंच , तुला वाटतं की तू माझ्याशी न बोलण्याने किंवा तुझ्या व्यवहारी वागण्याने तुझ्यातल्या त्या निरागस हळव्या  मनाला तू जपलं नाहीस , आणि मी तुझ्या विचारांपासून दूर   राहिलेय हे तू सांगू शकतेस ?   तुला माहित आहे का ? आजही जेव्हा केव्हा तू थोडं जरी आजारी पडलीस किंवा   एखाद्या अडचणीत सापडलीस , तरी मनाने , तू माझ्या जवळ येतेस  भासांतून , स्वप्नातून , तु मला सांगण्याचा प्रयत्न करतेस , पण नाही गं ................  , पण ती समजच आता नाही उरली माझ्याकडे  ! 

       तुला तर माहीतच आहे की , प्रत्येक नातं  मी  मनापासून जपण्याचा प्रयत्न करत आलेय , आणि आजही मी तेच करतेय! पण खरंच गं ... फूल वाटणार्या हाताला कधी सुगंध लागलाच नाही, उलटं रक्तबंबाळ झाले  माझे हातही आणि मनही .. तेव्हा तूच तर येतेस मला हळूवार समजायला . तुझं ते येणं इतकं मोहक असतं  की , त्या क्षणाला मी माझा सारा ताण विसरुन जाते , इतकी  तुझी सवय  झालीय ! 

         तुला  वाटतं की , तुझं माझ्याशी न बोलणं , माझ्या प्रगतीसाठी चांगलं आहे . मी ध्येयवेडी  होऊन , यशाची अनेक शिखरे मिळवेन . पण .... वेडे तुला तरी माहिती आहे का, तू आजही प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत असतेस. अगदी माझी जीवाभावाची सखी बनून  , तू माझा आधार बनतेस , असा आधार  जो कूणीही काढून घेऊ शकत नाही , अगदी तुसुध्दा !  

     तू आज एक आदर्श कार्य करत  आहेस , हे ऐकून तूझा खूप अभिमान वाटतो . उद्या तूझीच एखादी विद्यार्थिनी तुला भेटलं ,  तेव्हा तिचे यश बघून तुला जे समाधान मिळेल ना ते जगाच्या कोणत्याही पारितोषिकापेक्षा नक्कीच श्रेष्ठ असेल , आणि ते श्रेष्ठत्व माझ्या सखीचं आहे याचं  समाधान मला मिळेल,   असो , काळजी घे सुखी रहा याच . सदिच्छा !  आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या !  

               सौ . मनिषा  पिंटू  वराळे .

Tuesday, January 19, 2021

साहित्यिक जीवनप्रवास

                       साहित्यिक जीवनप्रवास

सर्वांना माझा सप्रेम नमस्कार! मी मनिषा पिंटू वराळे राहणार धरणगुत्ती तालुका शिरोळ येथील रहिवासी असून, मला सांगताना  खूप आनंद होतो की, एक कवयित्री म्हणून आपल्याशी ओळख होण्यापूर्वी मी एक साधी ग्रुहिणी होते आणि खेड्यातील जीवनरीत अशी आहे की, इथे सासुरवाशिणींना मनमोकळेपणाने वागता येत नाही.मग घर म्हटलं की, भांड्याला भांडं लागतंच आणि आवाजही होतोच.

         इथं सुध्दा एक गंमत असते ती म्हणजे घरचो सासूचे वर्चस्व इतकं की तिच्या मैत्रिणी सुध्दा (शेजार पाजारच्या) सुनेला बोलू शकतात आणि अशावेळी मन मोकळं करण्याचा एक अल्पसा प्रयत्न लेखणी मुळे झाला.

        सुरूवातीला हे लिखाण घरच्यांना आवडलं नव्हतं.मग त्यांनी न्याय बसवला.नंतर ते साहित्यच जाळून टाकले आणि मन निराश झालं.असं म्हणतात की, संसार रथाची दोन चाके नवरा आणि बायको असतात.आणि जेव्हा यांची साथ एकमेकांना असते तेव्हा प्रत्येक संकटातून मार्ग निघत असतो.

अगदी तसाच अनुभव मला आला.माझे पती श्री.पिंटू वराळे यांनी मला खूप साथ दिली.त्यांनी त्यांना जमेल तसे वाचनालयातून मला पुस्तके आणून दिली आणि माझी वाचनाची आवड जपली.हळूहळू माझ्या लिखाणाला सुध्दा त्यांनीच प्रेरणा दिली.अनेक चिटोर्या कागदावर लिहून मी माझ्या भावना व्यक्त करत होते.तात्पूरते वाचन करून चांगलं लिहीलंस असं कौतुक सुध्दा होत होतं.नंतर नंतर शाळेतील शिक्षकांना मी माझं लिखाण दाखवत होते.त्यांनाही ते खूप आवडत होते.काहींना तर ती आपलीच कविता आहे असं वाटायचं.

            मी गावातीलच उपकेंद्रात मदतनिसचे काम करत असल्याने काही समदू:खी महिला माझ्या सहवासात आल्या.आणि त्यांनी माझ्या या लिखाणाला पुस्तक रूपाने यायला पाहिजे या सदिच्छा सुध्दा व्यक्त केल्या.

          असं म्हणतात की, निरपेक्ष भावनेने केलेली सेवा फळाला येते.माझ्या बाबतीत सुध्दा असंच झालं.मी मानधन तत्त्वावर काम करत असल्याने या तुटपुंज्या मानधनावर माझा स्वता:चा खर्चसुध्दा भागत नाही.तरीसुध्दा एक सेवाभाव मनात जपून मी आजपर्यंत माझं काम सुरू ठेवलेलं आहे.

       नंतर नंतर मिस्टरांनी सकाळ न्यूज पेपर आणून दिले.त्यामधील एक न एक बातमी मी वाचत होते.एकदा बारीक चौकटीत 'नवोदित कवी लेखकांसाठी सुवर्ण संधी ' अशी छोटीशी जाहिरात व खाली फोन नंबर होता.

            माझ्यासाठी ती खरंच एक सुवर्णसंधी ठरली.मी लगेच त्या नंबरला फोन केला.कवितासागरचे संचालक डॉ.सुनिल दादा पाटील यांचा तो नंबर होता.माहिती विचारल्यानंतर त्यांनी मला "सावित्रीच्या लेकी"या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले.कार्यक्रम  होता जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये! आणि संयोजक होते श्री.संजय सुतार सर.

तसं बघायला गेलं तर धरणगुत्ती_जयसिंगपूर खूप जवळ आहे.पण तिथं पर्यंत जाणं सुध्दा माझ्यासाठी कष्टदायक ठरलं होतं.मी माझ्या नवर्याच्या प्रोत्साहनामुळे माझ्या मुलासोबत (प्रीतम) तिथं पोचले खरी पण.... नेमकं भेटायचं कुणाला? या विचारात असतानाच कार्यक्रमाचे नियोजन करणारी साधे सरळ व्यक्तिमत्व असणारी ती व्यक्ती ज्यांना मी सांगितलं की, मला डॉ.सुनिल दादा पाटील सरांना भेटायचं आहे.

            सरांनी हो मीच ती व्यक्ती! असं सांगितलं आणि तिथंच ती व्यक्ती माझं श्रध्दास्थान बनली.मी माझ्या चिटोर्या असलेलं कवितेचं साहित्य त्यांना दाखवलं.आणि त्यांनी कशाप्रकारे सुटसुटीत मांडावं ते समजून सांगितले.

त्याआधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की, संजिवनी दीदी आणि प्रिन्स गाडीवरून येताना त्यांना मी फोन केला होता आणि त्यांनी माझा फोन घेताना त्यांचा छोटासा अपघात झाला होता.तेव्हा ते ऐकून तर माझी भीतीने गाळण उडाली होती.पण सरांनी ते बरोबर ओळखलं होतं.तेव्हा ते म्हणाले की, फार काही नाही किरकोळ लागलं असेल काळजी करू नका आणि माझी पत्नी खूप समंजस आहे.तुम्ही तिची बेस्ट फ्रेंड व्हाल.सरांचा प्रत्येक शब्द खरा ठरला आहे.

        त्यावेळी मी माझी"कन्यारत्न" नावाची कविता सादर केली.जिने मला आजपर्यंत बळ दिलंय.संजय सुतार सर, मंगेश कोळी सर,प्रा.प्रविणकुमार वैद्य सर, आबासाहेब सुर्यवंशी सर, डॉ.कुमार पाटील, मनोहर भोसले सर, विजय बेळंकी सर, शिवाजी केंद्रे सर, सचिन वसंत पाटील सर, वैशाली नायकवडी,मेघा उळागड्डे अशी अनेक नामवंत साहित्यिक भेटली.जिथं कोणी लहान मोठ्ठा नव्हता तर जे होते ते विचारांनी साहित्यांनी एक झाले होते.

त्यावेळी खरं तर या सार्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन माझा अर्धाअधिक आत्मविश्वास परत मिळाला होता.सत्तर वर्षाचे युवक ज्या शिताफीने पायर्या चढून वर जात होते त्यांच्या मानाने मला दहा-पंधरा पायर्यासुध्दा धड चढता येत नव्हत्या.हे माझं दुर्दैव होतं.पण मानसिक बळ मिळाले आणि छोट्या प्रिन्सच्या गुढी भेटीने मला लिहीण्यास बळ दिले असं वाटतं.कारण लहान मुलांच्या निरागस बोलण्यात एक सत्य लपलेले असते जे मनाने बघितलं तर नक्कीच दिसतं असं मला वाटतं.

          श्री.मंगेश विठ्ठल कोळी सर एक आदर्श शिक्षक एक समुपदेशक आणि व्यक्तीमत्व विकास दिवाळी अंकाचे संपादक असून त्यांच्या प्रत्येक साहित्यातून एक सकारात्मक ऊर्जा मिळते.मला खरंच खूप अभिमान वाटतो हे सांगताना की, मंगेश सरांचा यशाचा मार्ग हे पुस्तक वाचल्यानंतर एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा प्रेरीत होते.आणि वाटतं की, जसं एखाद्या डॉ क्टरांकडे जशी अनेक रोगांवर विविध उपचारासाठी औषधोपचाराचा साठा असतो.

     अगदी तसाच साठा मंगेश सरांच्या विचारातून मिळतो.अनेक खचलेल्या जीवांना उभारी देण्याचे काम सरांनी एका निष्णांत तज्ञ अभ्यासू आणि कष्टाची जोड देऊन केलेली आहे.संकटांना सामना करण्याचं मनोबल त्यांच्या साहित्यातून मिळते.एखादंच वाक्य असं सांगतील ज्याने आपल्या आयुष्यातील प्रश्न सुटतील.असे मनमिळावू, माणुसकी जपणारे आणि तरूणांची उमेद असणारे मंगेश कोळी सरांचे साहित्य आहे.जे खरंच जीवनाचा आनंद देते.यशाचा मार्ग सुचविते.हे नक्कीच!

              असं म्हणतात की,घराचा कणा घराचं आडं असतं आणि कुटूंबाचा कणा कुटूंबातील म्हातारी माणसं असतात.जे वेळेनुसार सल्ला देतात.मार्गदर्शन करतात आणि घरातील एकोपा राखतात.पण माझ्यासाठी साहित्य विश्वातला कणा आहेत डॉ.सुनिल दादा पाटील! ज्यांनी अनेक नवोदित कवी लेखकांना प्रोत्साहन देत नावारूपाला तर आणलंच पण, ज्येष्ठ साहित्यिक सहकार्यांना सुध्दा ते विसरले नाहीत.त्यांचे वाढदिवस साजरा करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला.उतरत्या वयात आलेल्या या वडील माणसांना आनंदाचा क्षण पुन्हा मिळवून दिला.असे हे हरहुन्नरी सर्हदयी डॉ.सुनिल दादा पाटील आहेत.जे प्रत्येकाच्या चांगल्या वाईट क्षणी अगदी देवमाणूस होऊन पाठीशी उभे राहतात.

जगाच्या कानाकोपऱ्यात कविता सागरचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते.याहून दुसरा आनंद, समाधान ते कोणतं असेल बरं?

       असेच सेवाभावी डॉ.आणि ज्येष्ठ साहित्यिक आहेत डॉ.व्यंकटेश जंबगी! ज्यांनी त्यांच्या जीवनात अनेक व्याधीग्रस्त रूग्णांवर उपचार करत आपली रूग्णसेवा इमानेइतबारे बजावली असेल.अशा जंबगी सरांनी एकाचवेळी पाच_पाच पुस्तक ंप्रकाशित करून त्यांच्यातला सर्हदयी माणसाचं दर्शन घडवून आणले आहे.

            अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच कलाटणी देण्याचं काम त्यांनी आपल्या साहित्यातून व्यक्त केले आहे.अनेक पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ.जंबगीसर आपली वैद्यकीय सेवा मात्र विसरले नाहीत आणि म्हणूनच बीसीजी ते ईसीजी ही कलाकृती निर्माण करून वाचकांपर्यंत पोचवली.

                 यामधून त्यांनी मनुष्य जन्माचा निरोगी आराखडाच मांडलेला आहे असं म्हणावं लागेल.तसेच डॉ.श्रीकांत पाटील सर जे राष्ट्रपती पूरस्कारांनी सन्मानित तर आहेतच पण हाडाचे शिक्षक सुध्दा आहेत.त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले.तसेच घडलेल्या विद्यार्थ्यांवर साहित्य लिहून न थांबता त्याची चित्रफीत तयार केली आहे.

               नवोदितांना मार्गदर्शन व्हावे यासाठी नवोदितांनी काय वाचावं, काय लिहावं, कसं लिहायचं,कोणता विषय हाताळायचा याची बारीक सारीक माहिती त्यांनी"लिहू आनंदें" या साहित्यातून प्रकाशित केले आहे.ज्यामुळे असंख्य वाचकांना, लेखकांना, कवींना सर्वांनाच खूप मोठे बळ मिळते.अगदी आपल्या संग्रही ठेवावे आवर्जून वाचावे असे साहित्य म्हणजे"लिहू आनंदें" होय.

                अशा अनेक नामवंत साहित्यिकांची भेट जिथे झाली ते ठिकाण आहे कवितासागरचे संचालक डॉक्टर सुनील दादा पाटील यांचे घर! माळेतील दोर्याप्रमाणे स्वत:अद्रुश्य राहून आपलं काम प्रामाणिकपणे करत सर्वांना एकत्र बांधण्याचं काम या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती करते.

जगावं तर रडावं का?लढू का नये आणि लढावं तर जिंकावं मग ते प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा जपून का जगू नये.प्रत्येकाच्या जीवनात आनंद पसरत माणुसकी जपत पडद्यामागे राहून काम करणारे हे दाम्पत्य खरंच एका सच्च्या साहित्यिकांसाठी थोर दैवत आहे असे मला वाटते.

म्हणूनच तर माझ्यासाठी मुद्रित शोधिका सौ.संजिवनी पाटील व डॉ.सुनिल दादा पाटील,श्री.आबासाहेब सुर्यवंशी सर,प्रा.प्रविणकुमार वैद्य सर,श्री.मंगेश कोळी सर, वासुदेव गुरूजी, डॉ.व्यंकटेश जंबगी सर,श्री.विजय बेळंकी सर,प्रा.शिवाजी केंद्रे सर आणि स्वर्गीय अशोक दादा पाटील सर अशा गुरूजन वर्गाचा आशिर्वाद आणि मार्गदर्शन लाभले.

               ज्या नवोदितांना कुणी समजून घेण्यास वेळ देत नाहीत पण या कुटूंबातील प्रत्येक व्यक्ती महत्तवाचा असतो.मग ती कुणीही असो. डॉक्टर पाटील काका,शांता पाटील काकी यांनी तर खूप बळ दिले अगदी मनापासून दाद दिली आणि ही गोष्ट माझ्यासाठी लाखमोलाची आहे.

                  साहित्य चळवळीसाठी जिथे जिथे साहित्य संमेलन भरविण्यात आली आणि मला तिथं जाणं शक्य झाले तिथे तिथे मी आवर्जून उपस्थिती लावली आहे.मग ते शिरढोणचे साहित्य संमेलन असो किंवा शिरोळ चे साहित्य संमेलन असो किंवा इंगळीचे संमेलन असो.शक्य तेव्हा मी जाण्याचा प्रयत्न करत असते.मला सुनील दादा पाटील यांचा खूप अभिमान वाटतो की त्यांनी मला साहित्य क्षेत्रातील एक सदस्य केलं.संवाद ग्रामिण साहित्य संमेलन मध्ये कवी संमेलनाचे अध्यक्षपद सुध्दा मी बजावलं.दिवाळीअंकामध्ये  अतिथी संपादक म्हणून श्री.मंगेश सरांनी मला सन्मानित केले आहे.

                आता वाटतं की, आपल्या साहित्यिकांची संख्या वाढली पाहिजे.तशीच वाचकांनी ही  वाचनाची आवड जपली पाहिजे.तरच वाचनसंस्कृती व साहित्यिक यांच्या सहकार्याने आपण देशाच्या विकासासाठी हातभार लावू शकतो.ज्यामध्ये लेखणी अव्वल ठरेल.

           मला वाटतं की,प्रत्येकातच एक लेखक, कवी लपलेला असतो, म्हणून माणसांच्या मनात मैत्रीचा हात पुढे करून प्रत्येक गावात संमेलनाचे आयोजन केले पाहिजे.ती भरवल्याने वाचनसंस्कृती तर टिकेलच पण साहित्य निर्मिती सुध्दा होऊन नवविचारांचे आणि प्रगतीचे विचार होऊन देशाच्या विकासासाठी हातभार लागेल एवढं नक्की.

        मी मला जे वाटलं ते सांगण्याचा/लिहीण्याचा प्रयत्न केला आहे आणि काही चुकीचे वाटले तर मोठ्या मनाने माफ करा ही विनंती.

                सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती


Saturday, January 16, 2021

सेवादायिनी

                               सेवादायिनी

एक कर्मयोगिनी आज पुन्हा नवचैतन्य घेऊन आली

माझ्यासाठी ती साक्षात आनंदसरी घेऊन बरसली

कितीही म्हटलं तरी मनाने ती कर्तव्यासाठी आली

तरी मी म्हणते ती माणुसकी जपण्यासाठीच आली

माझ्यासाठी ती खरंच मला खूप जवळची वाटली

जणू काही अथांग सागरातली नौका मला मिळाली

सर्व नात्यांपेक्षाही मला ती खूपच हक्काची वाटली

तिच्या परतण्यासाठी मनाने आराधनाही केली

तिचं बोलकं डोळं आणि आत्मियता मी ओळखली

पुन्हा एकदा देव आहे याची साक्ष मनाला पटली

सैरभैर झालेल्या मनाला पुन्हा नव्याने उभारी आली

पद, प्रतिष्ठा, पैसा यापेक्षाही माणुसकी श्रेष्ठ ठरली

ती कर्तव्यदक्ष सेवा बजावणारी मनमिळावू माऊली

तिच्या येण्यानं मला समाधानाची लकेर मिळाली

तिच्यासाठी शुभेच्छा सुमने मनानं या उधळली

आपुलकी आणि स्पष्टपणाने ती सखी व्यक्त झाली

ती खरंच..,.... माझ्यासाठी आदर्श सेवादायिनी ठरली

            सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Monday, January 11, 2021

क्षणभंगूर सोबती

                              क्षणभंगूर सोबती

काही क्षणांत जोडलेली होती नाती

कर्तव्याची जाण आणि सहकार्याची निती

हसमुख तू मनमिळावू तरी....का खेळ खेळली नियती

हरलेली आई म्हणू की,कर्तव्यासाठी हटलेली आसवांची दाटी

आहेस आई तू तरी सखीच मला भासती

अधिकारी तरीही स्नेहमय क्षण गेले सुखाचे पण... आशा मनी तेवती

विचार बदलेल अशी आस मनाला होती

विरहाच्या वेदनेने आसवांची गर्दी झाली होती

स्वप्नांत आल्यासारखी ती सखी मला आपली हक्काची वाटत होती

पण...सत्य हे आहे की मनिषाला समजून घेणारी नियती नव्हती

             सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Monday, January 4, 2021

संजीवन ज्ञानाचा सागर

                 संजीवन ज्ञानाचा सागर

आयुष्यात अनेक माणसांशी संबंध आला.काही नाती आपुलकीने जपण्याचा प्रयत्न केला.काही नाती जीवाभावाने जपली.पण खरंच, कर्तव्य करत असताना एक पोकळी नेहमी राहिली ती म्हणजे सहकार्याची! 

कर्तव्य करताना प्रत्येक नात्याला समजून घेत जगत राहिले.कधी बालपण करपलं आणि त्या नकळत्या वयात सहनशक्ती माझी सावली बनून राहीली.या सावलीने माझी इतकी साथ दिली की, जीवनाच्या प्रवासात जेव्हा शेवटच्या टप्प्यात पोचलो तेव्हा सुध्दा या सहनशक्तीने मला जीवनदान दिलं.निसर्गनियमांनुसार लग्न, संसार, मुलं आणि पुन्हा कर्तव्य ओघाने आलंच.

पण....माझ्यातलं मी पण जरा डोकावत राहिलं.कधी चिटोरा बनून तर कधी वहीतील प्रत्येक पानावर जीव ओतून लिहावं तसं झालं.वाचणारा तर डोळ्यांतून पाणी काढायचा किंवा कौतुकाचा वर्षाव करत बसायचा. 

मुलांच्या जडणघडणीत पुन्हा हरवल्यानंतर शाळेतील पालक मिटींग मध्ये कधी कधी चार, दोन शब्द बोलून दाखवली आणि मग ते शब्द शिक्षकांना सुध्दा खूप आवडायचे.नंतर मुलं हायस्कूलला गेली आणि पुन्हा एकदा मला थांबावं लागलं.पण वाचनाचे वेड स्वस्थ बसू देत नव्हतं.कधी घरच्यांनी पेपर आणून दिला तर त्याचा फडशा पाडायची.इतकं अधाशीपणे वेड होतं वाचनाचं!

यातूनच एक सुवर्णसंधी मिळाली जी नवोदित कवी, लेखकांसाठी होती.जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये 'सावित्रीच्या लेकी"! या कार्यक्रमात मी माझी पहिली कविता"कन्यारत्न" सादर केली.जी संजय सुतार सर आणि सुनील दादा यांच्या सहकार्याने मी सुरुवात केली होती.

तिथून मग शब्दकळा,परिमळ,पहाटपावलं आणि समग्र वाड्मय या कविता संग्रहांना पुस्तक रूपाने प्रसिध्द केले.आणि माझी स्वत:ची ओळख स्वत:शी झाली ती या साहित्य क्षेत्रातील मान्यवर आधारस्तंभ असलेल्या डॉ. सुनील दादा पाटील या थोर माणसांमुळे आणि त्यांच्या अर्धांगिनी संजिवनी दिदी यांच्या सहकार्याने.

असं वाटतं की, देवळात गेल्यावर जेवढं समाधान मिळते त्याहून कित्येक पटीने अधिक मानसिक आत्मबल यांच्या संपर्कात राहिल्याने मिळते.अजून एक गोष्ट अशी की, सुनील दादा ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले त्यांच्या जीवनाला जणू परिस स्पर्श झाला असं मला वाटतं.कारण,हा साधा सुधा माणूस खूप दूरद्रुष्टीकोन ठेवणारा, सर्वांचं हीत जपणारा भावनिक कनवाळू माणूस आहे.आणि अशा या सच्च्या मनाच्या माणसाचे मन समुद्रासारखेच अथांग आहे.

माणसं जोडायचीतच पण ती अशा आपुलकीने की, ती पुढे जाऊन एक मोठं कुटुंब व्हावं.आणि त्या कुटूंबाचं एक विशाल वटवृक्ष झाला आहे ज्यामध्ये मोठं साहित्यिक जोडले गेले आहेत.इथं कुणी लहान मोठा नसतो ना गरीब श्रीमंत!

इथं सारी समान असतात.खरी मुळं ही कष्टांवर,गरीबींवर रूजल्यामुळे प्रत्येकजण यांचा (सुनील दादा) कुटुंब सदस्य असतो.आयुष्यात मोठं पद नाही मिळालं.मानसन्मान पैसा आडका याची कधी अपेक्षा नाही केली.पण......माणसाची माणुसकी,प्रेम, जिव्हाळा या गोष्टींची आस होती.आणि ती या संजीवन ज्ञान सागराच्या माध्यमातून मला मिळत गेले.

अखंड सागरातून एखाद्याच शिंपल्यात मोती सापडावा तसा हा मोती आमच्या सर्व साहित्यिकांना नशिबाने सापडला.आणि मला माझा विश्वास आहे की एक ना एक दिवस माझा हा ज्ञानसागर . मला नक्कीच, साहित्यातील सर्वोच्च स्थानावर पोचवण्यासाठी मदत करेल. कारण, बुडणार्याला काठीचा आधार तर असतोच , पण माझ्यासारख्या धापणारीला आजीवन , संजीवनच तर दिलंय ना माझ्या या ज्ञानमाऊलींनी कधी कधी जेव्हा खूप एकटेपण येतं. , आणि कोणताही आधार सावरायला नसतो ना , तेव्हा मला दादांचा चेहरा आठवतो .

त्यांचा हसरा चेहरा आणि आसवांनी गर्दी केलेले डोळे आठवतात.आणि तेव्हाच एक प्रिन्स रूपी आशावाद, भविष्य सांगावं तसं सहजगत्या बोलतो आणि जगण्याची उमेद येते.

        वाटतं खूप प्रवास करायचा आहे. खूप वाचायचं आहे.खूप लिहायचे आहे.अगदी जगातल्या शेवटच्या कोपऱ्यात राहणा-या माणसाचं सुध्दा दू:ख हलकं करायचं आहे.पण...त्याआधी स्वताला सावरायचं आहे.या ज्ञानसागरातील एक शिंपलं म्हणून आजन्म जगायचं आहे.त्यासाठी या गुरुवर्यांची सदैव सोबत हवी आहे.

                 सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती


Friday, January 1, 2021

गौरी

                             गौरी


गौरी ही आईवडीलांच एकुलतं एक अपत्य. सालस, मनमिळावू स्वभावाची गोड मूलगी.गौरी नावाप्रमाणेच गोरीपान. ध्येयवेडी आणि स्मितहास्याने सर्वांना आपलंसं करणारी ही मूलगी खरोखरच खूप कष्टाळू आहे. घरकाम करत शिक्षण पूर्ण केले.स्वावलंबी जीवन  हसतमुखाने कसं जगावं याचं हे जीवंत उदाहरणच म्हणावं लागेल.

                गौरी माझ्या मूलाच्याच वयाची! पण तिचा समंजसपणा पाहून वाटतं की, खरंच मूलं असावीत तर गौरीच्या  स्वभावाची.काहीही तक्रार नाही, परिस्थितीचं भान ठेवून वागणारी.अनेक कलागुणांनी संपन्न.आईबाबाला समजून घेणारी गौरी.

           आज तिनं मला एक आश्र्चर्याचा धक्काच दिला.आज व्हाट्सअप द्वारे प्रत्येकांनी शुभेच्छांचा वर्षाव करत असताना गौरी चक्क माझ्या कामावर जाण्याच्या वेळेला स्वत:चं काम करत रस्त्याला डोळे लावून माझी वाट बघत होती.माझ्या येण्याची चाहूल सुध्दा तिच्या मनात जपून ठेवली होती.

               पावलांचा आवाज तिने मनात जपला असावा.मी तिच्या  घराजवळ येताच तिने पटकन येऊन माझे पाय धरले आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.अगदी अचानक हे सारं बघून मला आश्र्चर्याचा धक्काच बसला.मनाला वेगळंच समाधान वाटलं.

 तिला खूप सार्या शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन मी माझ्या कामावर आले.येताना मनात विचार आला की, माझ्यासारख्या मावशीचं काम करणाऱ्या बाईमध्ये या मुलीनं काय बघितलं जे आतापर्यंत माझ्या मुलांनी सुध्दा बघितलं नाही.

   खरंच शिक्षणापेक्षा नशिब मोठं असतं हे मनात घर करून राहिलेली मी ! माझ्यात मात्र तिनं शिक्षणच बघितलं असावं.आणि अजून एक..... कदाचित ती चमकसुध्दा जी सहसा कुणाला दिसत नाही.ती गौरीला दिसली असावी.

असो, गौरीने तिच्या आयुष्यात खूप यश मिळवावं आणि सुखी संपन्न आयुष्य जगावं अशीच माणुसकी जपावी याच तिला नवीन वर्षाच्या सुरुवातीला सदिच्छा......

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती