स्वप्नपूर्ती
आमची स्वप्नपूर्ती स्वागताला आसुसलेली
त्यात माझ्या गुरूंची चाहूल लागलेली
माणुसकी म्हणून जीवापाड जपलेली
आपुलकीच्या नात्याने घट्ट विणलेली
वाटलं मनाला करावा आपण पाहूणचार
पण अगतिक मन झालं होतं लाचार
कित्येक वेळा भेटीचा केला विचार
पण..सारंच अशक्य झालं ओढ मात्र अपार
सकाळी सकाळी वाटलं भेटेल शुभविचार
खिन्न मनाने करत राहिले कर्तव्य अपार
न सांगता हळूच देव निघून गेला दूर
अन् मनाला सतत लागली हुरहूर
खूप काही सांगायचं, बोलायचं असतं
हसत खेळत जीवन जगावस वाटतं
पण बंदिवान मी माझ्या संसारात
सतत असते मी माझ्या कामात
क्षणाचं आयुष्य भरभरून जगावं
होता होईल तेवढी माणुसकी जपावं
रोज नव्या दमाने झालं गेलं विसरून जावं
स्वप्नपूर्तीत या देवाचं वास्तव्य सदैव रहावं
सौ.मनिषा पिंटू वराळे
धरणगुत्ती
तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर