दायी / मावशी
सर्व सामान्यांसारखीच देश सेवेचं व्रत घेतलेली
इतर मावश्या जेमतेम पण मी जराशी शिकलेली
झाडलोट करणं परशी पुसणं खर्चासाठी पाणी भरलेली
दिसायला दणकट पण आतून पोखरलेली
होय मावशीच मी कूणी दखल न घेतलेली ||धृ ||
किरकोळ उपचार आणि सांग काम्यासारखी सज्ज झालेली
कूणी दूखावलं तरी हसून सारं विसरलेली
नको नको म्हणता नाही काळजी मूळे पूढे झालेली
काही गोष्टी अनुभवातून तर काही कर्तव्यातून शिकलेली
होय मावशीच मी कूणाच्याही गणतीत नसलेली ||१||
समाजसेवेतून देशसेवेचं समाधान बाळगलेली
चिंताग्रस्तांच्या चेहर्यावर थोडंसं हसू आणलेली
प्रत्येक अधिकारी घरच्या माणसांसारखं समजलेली
प्रत्येकात माणुसकी आहे व्यवहार नाही हे मानलेली||२||
गरजेनुसार कूणी डावा तर कूणी उजवा हात समजलेली
कूणी हक्काची समजून लेकीसारखी माया लावलेली
कूणी घरच्या माणसांपूढे माझं महत्व सांगितलेली
कूणी माझ्या सेवेचं महत्त्व जाणून हीन मानलेली
होय मावशीच मी कर्तव्यासाठी जगलेली ||३||
एखाद्या रंग कर्मी सारखी पडद्यामागे राहिलेली
प्रत्येकाच्या सूखासाठी मनापासून धडपडलेली
धाडस किती ही असलं तरी नशिबाने मागे पडलेली
कूणी खिजवलं तरी डोळ्यांत आसू दडपलेली
होय मावशीच मी कळत असूनही नसल्यासारखं वागलेली ||४||
कितीही झाला अपमान तरी खालमानेने जगत आलेली
तोंड नाही पाठ द्यावी हे शिक्षण घेतलेली
होईल की आपलं पण चांगलं ही आशा धरलेली
प्रत्येक खडतर प्रवासात जिद्दीने वाटचाल केलेली
होय मावशीच मी! हितशत्रूमुळे त्रासलेली ||५||
कधी कधी शून्य नजरेने आत्मविश्वास हरवलेली
कधी दूखण्याने तर कधी अडचणींनी त्रासलेली
कधी कधी आपल्याच माणसांनी केलेला घात स्विकारले ली
तर कधी पश्चातापात होरपळून गेलेली
होय मावशीच मी! दिशा हीन आयूष्यजगलेली ||६|| स्वतः:च्या स्वप्नांचा आणि जबाबदारीत कूचंबणा झालेली
भविष्यापेक्षा वर्तमानाचा विचार करून थांबलेली
ध्येय असून ही लाचार लाजिरवाणे जगलेली
प्रत्येकाच्या हास्यांचा विषय बनलेली
होय मावशीच मी! जनसेवेचे व्रत घेतलेली
किती ही हिणवलं तरी दूर्लक्ष केलेली
फक्त माणसांतली माणुसकी जपण्याचा प्रयत्न केलेली
वृध्दांच्या सेवेत आत्मिक आनंद मानलेली
सतत कोणत्या तरी अडचणीत सापडलेली
होय मावशीच मी! जिला सर्वांनी सूखी समजलेली ||७||. मूलांच्या सूखी आयूष्यांसाठी सतत प्रयत्न केलेली
शिक्षणाचे महत्त्व सतत सर्वांना सांगत सूटलेली
पूस्तकांवर मौल्यवान वस्तू सारखं प्रेम केलेली
होय मावशीच मी! सतत व्यवहार शून्य वागलेली ||८||
सौ . मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती जिल्हा कोल्हापूर