Friday, April 22, 2022

माणुसकी

                       माणुसकी

जातीपातीत अडकण्यापेक्षा माणुसकी जपली तर बरं होईल

गटतट बघण्यापेक्षा गरिबी बघितली तर बरं होईल

आलिशान बंगल्यामधली फक्त मजा बघत राहतील

आणि साध्या घरातला कर्ता तरणा मात्र बळी जाईल

कोरोनाने त्रासवलय महागाई मात्र बळी घेईल

शिकलेला बेरोजगार मात्र व्यसनी होऊन फिरत राहील

नेत्यांसाठी तो फक्त एक कार्यकर्ता म्हणून फिरेल

घरची उपासमारी बघून तोच नैराश्य ग्रस्त होईल

धार्मिक तिढा करण्याआधी सुधारणा केली तर बरी होईल

शिकलेल्यांना रोजगार संधी दिली तर बरी होईल

वृक्षसंवर्धन आणि पाणी वाचवलं तर वसुंधरा वाचेल

तुमच्या आमच्यांची लेकरं आनंदाने तेव्हाच नाचतील

डिजिटल इंडिया जरी झाला तरी झोपडीत दिवा तेव्हाच लागेल

जेव्हा संविधानाचे महत्व प्रत्येक माणूस मनापासून जपेल

श्रध्दा ठेवा पण अंधश्रद्धा बाळगू नका हे समजेल

तेव्हाच आजचा यूवक सशक्त भारत घडवू शकेल

शिवरायांसारखा विचार जेव्हा प्रत्येक पुरुष करेल

परस्त्री मातेसमान मानून स्त्री ची इज्जत वाचवेल

भारतीय संस्कृती तेव्हा प्रत्येक मुलीत जिजाऊ दिसेल

देशहितासाठी प्रत्येक पत्नीत रमाई वसेल

शिकलेल्या मुली तेव्हा स्वाभिमानाने फिरतील

समानतेचे वारे सुरक्षित राहून त्या भोगतील

तोरा तिचा तेव्हा झाशीच्या राणी सम असेल

प्रत्येक क्षेत्रात सुरक्षित ती नारी...नरांसोबत वावरेल


Wednesday, April 13, 2022

भिमाच्या कर्तृत्वानं

                 भिमाच्या कर्तृत्वानं

मन माझं गेलंया आनंदून

बा भिमाच्या जयंतीनं

साजरी करूया सारी मिळून

बा भिमाच्या कर्तृत्वानं

चला जय भीम बोलूया एकीनं

अशी समानता दिली बाबानं

दिलं मुलींना समतेचे दान

बा भिमाच्या कर्तृत्वानं

रजा आरोग्याच्या भोगता अभिमानानं

रजा पगारी भोगता की सुखानं

आणि वागता समानतेनं

बा भिमाच्या कर्तृत्वानं

२वर्ष ११महिनं१८दिसं लिहीलं त्यांनं

या भारताचं संविधान

शिक्षणाचं बळ दिलया जीवाचं करून रानं

बा भिमाच्या कर्तृत्वानं

अशी तलवार चालवली लेखणीनं

अशा आमच्या विश्वरत्न बाबानं

कोटी कोटी सलाम तनमनानं

बा भिमाच्या कर्तृत्वानं

सौ.मनिषा पिंटू वराळे कोल्हापूर