Saturday, December 9, 2023

सून मूलगी असावी तर जावंई मुलगा होतो का?

 सून मूलगी असावी तर जावंई मुलगा होतो का? 

सर्वांना नमस्कार आणि नव्याने सासू सासरे होणार्या सर्वच बंधू भगिनींना हे नविन नातं खूप सूखाचे आनंदाचे रहावे यासाठी सदिच्छा.

          या सध्याच्या जगात सासूला आत्याबाई म्हणण्याऐवजी आई किंवा मम्मी म्हटलं जातं.बहुतेक सूनांना आई, मम्मी म्हणणेच योग्य वाटते कारण त्या नात्यात त्या आपल्या आईला शोधत असतात.सासर्यांना बाबा, पप्पा म्हणून आपल्या बापाला शोधत असतात.सासरी रूळण्यासाठी त्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी समजून घेण्यासाठी धडपडत असतात.मनं जपण्याचा प्रयत्न करत असतात.

एका अल्लड हट्टी मूलीचं समंजस सुनेमध्ये रूपांतर झालेले असते.हा एवढा समजूतदारपणा एक मुलगी फक्त आपल्या आईबापाच्या संस्कारांना डाग लागू नये एवढ्याचसाठी करत असते.ती त्या घरची लक्ष्मी असते.ठराविक वेळेनंतर ती सर्वांची लाडकी सून बनते आणि नकळत तिच्या सासूसासर्यांच्या तोंडून शब्द निघतात की, आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हांला सुनेच्या रूपात लेक मिळाली.आणि खरंच ज्या घरातली सून हसतखेळत असते ते घर सूखी असतं.आणि त्यासाठी ती एकमेकांना जपत असतात.बस्स...इतकच तर पाहिजे असते मूलीच्या आईबापाला की आपली पोर सर्वांना जपते तसेच तेही तिला जपतात यातच आईबाबा समाधानी होत असतात पण........

पण मला विचारावंस वाटतं की जशी परक्या घरची पोर आपली सून नव्हे तर मुलगी बनते तसाच आपला मूलगा जाव ई न राहता मूलगा बनतो का हो? 

मान्य आहे तो सासूरवाडीला दोन चार दिवसांसाठी जात असतो पण त्या दिवसांत त्याला हवं नको ते पूरवण्यात थोडक्यात त्याचे  लाड करण्यात चार दिवस निघूनही जातात आणि जाता जाता शुल्लक कारणावरून तो रूसतो, चिडतो आणि तडकाफडकी निघूनही जातो तेव्हा आपल्या सहचारिणीच्या मनाचा विचार तो का बरं करत नाही? तिच्या माहेरच्या लोकांच्या मनाचा, भावनांचा विचार का बरं करत नाही? का त्याचा आत्मा विरघळत नाही बायकोच्या भावनांपेक्षा हट्ट मोठा असतो का, सुनेला बोललं तर तिने रडत रडत स्वयंपाकघरात थांबावे,माहेरच्यांना काही सांगू नये म्हणून दटावले जाते आणि जावयाला एखाद्या गोष्टींविषयी थांबवलं तर त्याने आईबाबाला बहिणभावाला काकाकाकूला सांगावं आणि निघून जावं? आता कुठे गेली समानता? का मुलांना आपल्या आईवडील भावंडाइतकीच सासरची माणसं हक्काची आपली वाटत नाहीत? का तो आधाराचा शब्द आपल्या बापाला देतो तसा सासरच्यांना देऊ शकत नाही? 

सोप्पं नसतं ओ रितीनुसार बावीस वर्षे सांभाळलेल्या लेकराला परक्या घरी पाठवून सूखी ठेव सर्वांना सांगणं.तरीसुध्दा मुलींचे आईबाबा हे करत असतात.मग त्या मुलीच्या सुखासाठी तिच्या आनंदासाठी एक शाश्वत आधार एक विश्वास मायेची साथ का तिच्या पतीकडून मिळत नाही.का फक्त स्त्रियाच समजून घेण्यासाठी धडपडत असतात, का मुलगी सुखात आहे की नाही ही खंत वाटते मुलीच्या आईबापाला, का त्यांना दिल्या घरी सुखी रहा म्हणून दिवस ढकलावा लागतो

का आज कित्येक मुली उच्च शिक्षण घेऊन सुध्दा घरीच कोंडून ठेवतात का त्यांच्यातल्या गुणवत्ता त्यांची स्वप्ने पूर्ण करू देत नाहीत

अनेक प्रश्नांत आजही आईबाबा काळजीत राहतात हे बदलणार तरी कधी? 

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर 

Thursday, October 12, 2023

संसार नेमका असतो तरी काय?

 संसार नेमका असतो तरी काय?

जेव्हा लग्न होऊन एक मूलगी आपल्या जीवनात येते, तेव्हा ती त्या सर्व नात्यांना आपलं समजून जगत असते.प्रत्येकाची आवड जपत असते.मनातून एकटी पडलेली असते कारण आजपर्यंत ती एक ही दिवस आपल्या आईवडिलांना आपल्या भावंडांना सोडून राहिलेली नसते.आणि तरीही तुमच्या नव्या घरात सगळे आपलेच आहेत म्हणून जगत असते.तिचा सखा,तिचा जोडीदार तिचं मन जपणारा असावा एवढीच अपेक्षा असते तिची.....

 मानवाला जशी पोटाची भूक महत्वाची असते तशीच मनाची भूक महत्वाची असते.शारिरीक भूक पण येनकेन प्रकारे पूर्ण होतच असते पण...... त्यात प्रेमाचा ओलावा असणे आवश्यक असते.आपुलकी गरजेची असते.जपणं महत्वाचे असते.आणि ज्याला बायकोचं मन जपणं जमतं ना त्याला कोणतीही गोष्ट अशक्य नसते.

मान्य आहे मातृपितृ भव आईवडिलांना जपलच पाहिजे भावंडांना सुध्दा जपलं पाहिजे आणि जी आपल्याला आपलं समजून आली आहे तिला सुखात पाहण्यासाठी सतत काळजी करणारे तिचे आईवडील त्यांना जपलं तर काय होईल ओ? 

        जी मूलगी आईला बाबाला भावंडांना सोडून सासरच्यांची मनं जपते तर जावयाने ही जबाबदारी का टाळावी? मूलीची दोन्ही घरं तिची हक्काची असतात तर जावयाची का असू नयेत? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.बायकोची आवड जपणं तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणं यात चूकीचं का‌य आहे, तिच्याशी रोज थोडा वेळ गप्पा मारत बसले तर बिघडते कुठं? समानता फक्त बोलण्यापुरती न वापरता आचरणातून सिध्द केली पाहिजे.केली बायकोला मदत तर आईनं का नाराज व्हावं, आणि बायको माहेरी जाऊन यावी यात चूकीचं का‌य आहे? प्रत्येक बापाला आपलं मूल प्रिय असतंच की मग स्वतःच मूल आलं नाही तर आसवं गाळायचं आणि दूसर्याच्या मूलाला पाठवायचच नाही आणि पाठवलं तरी बंधने घालायची हा कोणता न्याय?

नव्या जोडप्याला जसा एकांत महत्वाचा असतो ना तसाच मन जपणारा जोडीदार सुध्दा हवाहवासा वाटतो.तिच्या एका हास्याने घराचा स्वर्ग होणार असेल तर काय हरकत आहे तिचं मन जपलं तर...ती कामवाली बाई नाही की मूलं जन्माला घालणारी मशीन नाही ती एक माणूस आहे घरची लक्ष्मी आणि सर्वस्व अर्पण करणारी देवता आहे म्हणून जमेल तसे बोलून बघा संसार सुखाचा आनंद घ्या आणि मग सांगा की, संसार नेमका असतो तरी काय..........

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर 

Sunday, October 1, 2023

माझं मी पण

            माझं मी पण

सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद यासाठी की त्यांनी मला भरभरून प्रेम दिले आहे जे खरंच मला आपलं समजतात.जीवनाच्या प्रवासात एक गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे स्वाभिमान! होय स्वाभिमानच...

कर्तव्य पार पाडत असताना अनेक वेळा मन मारून जगावं लागतं.कधी परिस्थिती कधी संस्कार तर कधी जबाबदारी आडवी येते.आपण करत जातो करत जातो म्हणून प्रत्येक वेळी नवनवीन अपेक्षा वाढत जातात.कधी कधी आपण तुटून जातो तरीही कर्तव्य करतो हे असतं आपलं अस्तित्व.

खूपदा वाटतं पुन्हा नव्याने सुरुवात करायची पण जबाबदारी टाळून नाही आणि राहून जाते जगायचं....

का आपल्याला ती साथ मिळत नाही जी प्रत्येकाला सन्मान देणारी असते.जगण्यासाठी आणि प्रत्येक गोष्ट पैशाची असली तरी आपुलकीच्या शब्दांना पैसे लागत नाही ना भाऊ...

एक आईबाबा जेव्हा खचतात ना तेव्हा त्यांना नव्याने उभा होता येत नाही.भोवती कितीही सूखानं गालीचा पसरला असला तरी मनाची आग दाहक असते.म्हणून तमाम लेकरांना सांगावसे वाटते की औषधपाणी आणि खाणं पिणं याशिवाय दोन आपुलकीच्या शब्दांना भूकेले असतात ते आईबाबा,आजी आजोबा.. आणि म्हणूनच आज ज्येष्ठांना खरा सन्मान देऊया त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारून हसत हसवत जगूया याच आजच्या घडीला माझ्या मी पणाच्य सदिच्छा.

ज्येष्ठांना खूप खूप शुभेच्छा.

सौ.मनिषा पिंटू वराळे

धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर 

Sunday, June 18, 2023

बाप

 बाप

बाप माझा बापासारखा कधी वागलाच नाही

म्हणून मायबाप दोन्ही कर्तव्य आईनेच निभावली

लेकरांची गरज बापाला कळलीच नाही

म्हणून आईच घ्यायची चिमणी होऊन पंखाखाली

सताड डोळ्यांनी बापानं कधी पाहीलच नाही

आईनं आणलेला घास सुध्दा खाऊ दिला नाही

दारूच त्याची दुनिया संसार कधी म्हटलाच नाही

म्हणून आईने कधीच हिंमत हरली नाही

कंबर कसून चारी मूलं सक्षम बनवली

परिस्थिती पुढं ती कधी नमलीच नाही

कण्याला पडलेली मण्या एवढंच बाप बोलायचा

शिव्या हासडत दिवस रात्र बसायचा 

केलेल्या अन्नाचं सुध्दा नासाडी करायचा

कधी कधी चुलीतच पाणी ओतायचा

भरपावसात घराबाहेर काढायचा

तेव्हा आईच पदराखाली घ्यायची

पावसात भिजलेली आसवं सुध्दा पाऊस होऊन गळायची

तेव्हा आईच हिंमतीने पुढं येऊन समजावायची

लोक फादर डे साजरा करतात पण आमच्या साठी आमची आईच गॉड फादर व्हायची

कुणी कितीही मला हलक्या काळजाचं म्हटलं तरी...

आईच माझी ताकद व्हायची तेव्हाही आणि आताही

म्हणून म्हणते सारीच मला की मी आईची भक्त आहे

कारण तिच्या चरणी नतमस्तक तिचेच मी रक्त आहे


सौ.मनिषा पिंटू वराळे, धरणगुत्ती

तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर

एक बाप असाही

 एक बाप असाही

पाहीला मी एक बाप मूलांसाठी राबताना

ऊन पाऊस वादळ वारा अंगावर झेलताना

लेकरांना शिकवून स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करताना

त्यासाठी स्वतः उपाशी राहून घरादाराला पोसताना

भल्या पहाटे उठून मूलींना शिक्षणासाठी पाठवताना

हळूच चार पैसे हातात त्यांच्या देताना

खूप मोठी अधिकारी बनावीत यासाठी कष्टताना

पाहीला मी एक बाप एकटाच रडताना

हातातोंडाशी आलेला घास निसटून जाताना

हतबल बाप हरलेला शून्यातून विश्व निर्माण करताना

होईल का जाणिव कधी त्याच्या लेकरांना

समजून घेऊन वागतील का बापाच्या विचारांना

प्रत्येकाला आपलं समजून कर्तव्य निभावताना

म्हातारी आईबापांना लेकरं समजून जपताना

पाहिला मी एक बाप असा कर्तव्यासाठी जगताना

पत्नीशी सुध्दा दूखणं आपलं लपवताना

प्रत्येक नातं जीवापाड जपताना

असा पती असा मूलगा आणि असा बाप समजून घेताना

शब्द शब्द व्हावे स्वर्णफूले गूण त्यांचे गाताना


सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर

Friday, May 5, 2023

मपली माय सवे गूळाच्या गप्पा

 मपली माय सवे गूळाच्या गप्पा 


माय तुझं मन भरून असतं बोलणं

लेकरांच्या कालजीतलं जगणं 

मले माय तुझी चिंता कळली

आणि माणुसकीच्या नात्याने नातं मी जोडली

माय सांग माझ्या अनिल दादाले 

नमस्कार करते उषा वहिणीसह तुम्हाले

दादा जनरीत जाणता हो तुम्ही

पण खरंच या मनिषाले ओळखता तुम्ही

नाती टिकतात विश्वासावर म्हणून ठेवा भरोसा

आपल्या भावाचा का कुणी बळकावेल आडोसा

मपली माय दादा चिंतेचं ओझं वाहते

सर्वांच्या हिताचा विचार ती करते

मले माय तेव्हा संस्कारांची शिदोरी वाटते

भावाबहिणीच्या नात्यात ती मात्र भरडते

म्हणे कुडीत जीव असूतो विष्णूचं घर व्हावं

पांडूरंगाची रूक्मिणी तसं राणीनं रहावं

आब राखून घराचा मानानं जगावं

मपल्या मायचं बोल मी जीवापाड जपावं

रामासारखी सोबत माह्या विष्णूला लाभली

संजिवनी जीवनाची सूखासाठी तूह्या राबली

रहा एकोप्याने बाळाहो आर्त हाक मायनं दिदली

येशूच्या रूपात तिला हरीदर्शन माऊलीने दिली

आता हिच पंढरी आहे आणि तिर्थक्षेत्र सप्ताहाचं

असो येशू किंवा ईश समाधान श्रध्देचं

अभिषेक,राधा आणि शोभिका आहे आवडती

तरी कौतुक भारी मायला निल प्रिन्स नाती जपती

घरदार गोतावळा स्नेह धूदाट वाढवा

जीवाभावाची माणसं मनापासून जपून टिकवा

मायच्या आणि माझ्या गप्पा म्हणे गूळाची ढेप

मूंग्यासारखा विषय निघतो माय मिस्किल हसून बोलली.... बोलूया पुढच्या खेप

माय तुझं मन या लेकीला इवलूसं कळलं

मन राहवलं नाही म्हणून मनिषाने लिवलं



सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर

Friday, April 21, 2023

उन्हाळी सुट्टी

 उन्हाळी सुट्टी (बालगीत)


किती किती मज्जा येते मला

काय सांगू काय केलं दोस्ता तुला 

चिंचा कैर्या पाडून खाऊया चला

क्रिकेट आणि गोट्यांचा डाव मांडू चला 



पोहायला जाताना येते मज्जाच मज्जा

आईने केलेल्या कुरूड्या चाखतो मी अन् आज्जा 

आजीने केल्या शेवया दोरी त्यांची करू

आपल्या आवडीचा आकार शेवयीचा धरू



किती किती छान वाटते मला या दिवसांत

मनसोक्त फिरू चला रानावनात

चिमण्या पाखरांचा किलबिलाट घेऊ ध्यानात

किती किती फिरायचे असते उन्हातान्हात



सायकलीने लावू चल आपण शर्यत 

मागेपुढे होताना येईल फार गंमत

हात सोडून करू चल नवी कसरत

कुणी रागावलं तर जाऊ आपण घाबरत



खेळाची गड्या आपण धमाल अशी करू

नवनवीन गोष्टी वाचून मजा अशी करू

दंगा मस्ती सोबतच आईला मदत करू

अधूनमधून कामाचीही गोडी आपण धरू


नवी पुस्तके नवा वर्ग नवेच अनुभव घेऊ

शिकता शिकता जीवनाची दिशा ठरवू


सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर