👩 स्त्रियांचे आरोग्य 👩⚕️
“ स्त्री कधीही कुणाला न समजलेली
कधीही कुणाला न जाणवलेली
आई , बहिण , बायको या नात्यात भेटलेली
स्त्रीचं ती अलौकिक मातृत्व लाभलेली ”
लहानपणी बापाच्या धाकात , तरुणपणी नवर्याच्या आणि म्हातारपणी मूलांच्या मर्जीने वागणारी ही स्त्री खरंच खूप सोशिक आहे . आताच्या आधुनिक युगात मात्र जरी स्त्रीने आधूनिकतेचं मास्क वापरलं असलं, तरी आतून मात्र तिच कालची आहे .
“ नारी तू नारायणी
ओठांत हसू डोळ्यांत पाणी”
आपल्या सुसंस्कृत भारत देशात स्त्रीला देवी मानतात . आणि स्वराज्यात शिवाजी महाराजांनी परस्त्रीला माता मानलं आहे .
गेल्या पाच– सहा वर्षांपासून एक सततचा भेंडसावणारा प्रश्न म्हणजे स्त्रियांचे आरोग्य होय .
आजकाल फिगर मेंटेन्सच्या नावाखाली अनेक किशोरवयीन मूलींच्या खाण्याच्या सवयी चूकीच्या बनल्या आहेत . ज्यामुळे अनेक शारीरिक तक्रारी वाढत आहेत . खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे हिमोग्लोबिनची कमतरता वाढत आहे .
यासाठी शासकीय आरोग्य सेवेमार्फत मुलांमूलींना मोफत गोळ्या वाटल्या जातात. तसेच दर सहा महिन्यांनी जंतनाशक मोहीम सुध्दा राबवली जाते. अशक्त मूली आणि टिव्ही आणि मोबाईलचा अति वापर यामुळे मूलामुलींच्या वागण्याबोलण्यात बदल होत आहेत .
स्त्रियांना सुध्दा मासिक पाळीत त्रास होण्याचे प्रमाण वाढत आहे. गर्भाशयाच्या आणि गर्भाच्या कमजोरी वाढत आहेत. चाळीशीपुर्वीच मातृत्वाचं प्रतिक असणारं गर्भाशय काढण्याची वेळ येत आहे. स्त्रियांमध्ये कॅन्सरचा धोका वाढत आहे.
मानसिक ताणतणाव वाढल्यामुळे व घरात होणारी कुचंबणा यामुळे स्तनांचा कॅन्सर व गर्भाशयाचा कॅन्सर भीती दाखवत आहे. मासिक तक्रारी अंगावर काढल्यामुळे अनेक भयावह आजारांना सामोरे जावावं लागत आहे . पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धती नसल्यामुळे वागण्या बोलण्यातील सहजता मोकळेपणा कुठेतरी हरवत चालला आहे . असे मला वाटते..
आजही कित्येक कुटुंबांमध्ये महिलांसाठी सॅनिटरी, नॅपकिन आजही म्हणावं तितक्या मोकळेपणानं खरेदी केली जात नाहीत . अयोग्य आहार, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव , अवेळी खाणं – पिणं , यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत .
स्त्रियांमध्ये मासिक पाळी , गर्भावस्था , मोनोपॉज , अशा अनेक गोष्टी घडत असतात . पुरुषांच्या मानाने स्त्रियांमध्ये पित्ताशयातील खडे , अर्ध डोकेदुखी , संधीवात अॅनिमिया , मूत्राशयाचा संसर्ग , स्तनांचा कॅन्सर , गर्भाशय मूखाचा कॅन्सर , होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.
अधिक तेलकट पदार्थ , चरबीयुक्त पदार्थांचे अधिक सेवन , पालेभाज्यांचा अभाव यामूळेही लठ्ठपणा वाढत आहे . व आपोआप चं वजन वाढ ही होतं आहे . त्यामुळे अधिक भार पडून झीज होतं आहे. त्यातूनच कंबरदुखी , गुडघेदुखी ,यासारखे आजार ही बळावत आहेत .
सध्या कोणतेही दडपण न घेता स्त्रियांनी स्वतः च्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. स्वतः च्या स्तनांची तपासणी करायला शिकले पाहिजे . काही गूप्तांगाच्या तक्रारी असतील तर वेळीच दाखवले पाहिजे . पाळीच्या चार – पाच दिवसांनी ही तपासणी करता येतो . पण .. बहुतेक स्त्रिया संकोचून तपासणीला तयार होत नाहीत आणि नको ते संकट ओढवून घेतात .
जबाबदार्या तर प्रत्येकालाच असतात पण ... पण त्या पार पाडण्यासाठी स्वतः सक्षम राहणे खूप गरजेचे आहे . तेव्हा कोणताही संकोच न बाळगता प्रत्येक स्त्रीने जाणीव पूर्वक स्वतः कडे लक्ष देऊन निरोगी राहिले पाहिजे , व मूक्त भरारी घेण्यास शिकले पाहिजे .
तूझ्यात आहे शक्ती भारी
तूच आहेस सबला नारी
जन्मा येण्याचं कारण तू
नात्यांमधली गुंफून तू
आजच्या युगाची प्रगती तू
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू
ध्येयवेडी अशी मनिषा तू
संकल्पांची स्वामिनी तू
सौ . मनिषा पिंटू वराळे .
धरणगुत्ती , तालुका:— शिरोळ , जिल्हा:— कोल्हापूर
मो . नं . :— 7057225407