Saturday, January 16, 2021

सेवादायिनी

                               सेवादायिनी

एक कर्मयोगिनी आज पुन्हा नवचैतन्य घेऊन आली

माझ्यासाठी ती साक्षात आनंदसरी घेऊन बरसली

कितीही म्हटलं तरी मनाने ती कर्तव्यासाठी आली

तरी मी म्हणते ती माणुसकी जपण्यासाठीच आली

माझ्यासाठी ती खरंच मला खूप जवळची वाटली

जणू काही अथांग सागरातली नौका मला मिळाली

सर्व नात्यांपेक्षाही मला ती खूपच हक्काची वाटली

तिच्या परतण्यासाठी मनाने आराधनाही केली

तिचं बोलकं डोळं आणि आत्मियता मी ओळखली

पुन्हा एकदा देव आहे याची साक्ष मनाला पटली

सैरभैर झालेल्या मनाला पुन्हा नव्याने उभारी आली

पद, प्रतिष्ठा, पैसा यापेक्षाही माणुसकी श्रेष्ठ ठरली

ती कर्तव्यदक्ष सेवा बजावणारी मनमिळावू माऊली

तिच्या येण्यानं मला समाधानाची लकेर मिळाली

तिच्यासाठी शुभेच्छा सुमने मनानं या उधळली

आपुलकी आणि स्पष्टपणाने ती सखी व्यक्त झाली

ती खरंच..,.... माझ्यासाठी आदर्श सेवादायिनी ठरली

            सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

1 comment:

  1. अतिशय साध्या सोप्या आणि कमीतकमी शब्दात अतिशय उत्कृष्ट अशा कवितेचे लेखन झाले आहे, मला मनापासून आवडली....

    ReplyDelete