सदरक्षणाय खलनिग्रहणाय
सेवा द्यायचीच तर अगदी तन,मन, धन अर्पण करून.अशाच एका सैनिकाचे हे देशप्रेम!
खूप कष्टातून प्रविण शाळा शिकला.आईवडिलांनी प्रसंगी उपासमार भोगून त्याला शिक्षणासाठी पैसे पोचवले.त्याच्या आत्मविश्वासाने तो पोलिस दलात भरती झाला होता.त्याच्या हुशारीने तो प्रत्येक सेवा कार्यतत्परतेने बजावत होता.आता दिवस रात्र ड्युटी करून तो ही होता थोडा थकला.आईवडिलांच्या आठवणीने डोळ्यांच्या कडा पाणावल्या.वर्षभरात एकदाही तो आईवडिलांकडे गेला नव्हता, म्हणून आता दिवाळीची सुट्टी घेऊन तो जाणार होता.
रजा ही मंजूर झाली होती. आई बाबांसाठी कपडे घेतले होते.भावाबहिणींसाठीही खरेदी केली होती.आनंदाने त्याने सामानांची आवराआवर करून ठेवली होती.इतक्यात वरून निरोप आला."तातडीने सेवेत हजर रहा " भरल्या डोळ्यांनी त्याने सामानांवरून नजर फिरवली अन् अंगावर वर्दी चढवली.
अचानक दंगल झाली होती.दगडफेक आणि लाठीमार सुरू झाला होता.तो गर्दीला शांत राहण्याचे आवाहन करत होता.पण .....त्याचा आवाज पोचतच नव्हता.तो जीवाच्या आकांताने शांत राहण्याचा सल्ला देत होता.पण.....कुठून एक दगड आला अन् त्याच्या डोक्याला लागला.डोक्यांतून रक्ताच्या धारा वाहू लागल्या.
तो रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच निपचिप पडला.त्याचा जनतेला शांत रहा म्हणून सांगणारा हात तसाच वरच्या बाजूला होता.आणि......आणि रक्ताने भिजलेल्या वर्दीने पुन्हा एक पूत्र गमावला. आणि हिच आठवण " सदरक्षणाय खलनिग्रहणाय" वचनाची ठेवून गेला.
सलाम त्यांच्या सेवेला.
सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर फोन नंबर ७०५७२२५४०७
No comments:
Post a Comment