🤝 नातं मनाचं मनाशी🤝
लहानपणी खेळता खेळता अनेक बालमित्र मैत्रीणी भेटतात. आणि तो अजाण जीव त्यांच्यांत रमून जातो. कधी शाळेपर्यंत, कधी हायस्कूल पर्यंत ,तर काही जीवश्च आजन्म सोबत करतात , हेच ते मैत्रीचं नातं आपण स्वतः निवडत असतो. आणि टिकवण्याचा , जपण्याचा प्रयत्न करत असतो.
समाजप्रिय म्हणून मान्यता असलेला मानव प्राणी हा जन्माने खूप सारी नाती घेऊन जन्मतो. आईशी नाळेच नातं असल्यामुळे कदाचित तो मातृप्रिय म्हणून ओळखला जातो. आजोबा—आजी , काका– काकी , मामा–मामी , बहिण–भाऊ ही नाती आपसूकच त्याला आईवडिलांमुळे त्याला मिळत जातात.आणि एक सुसंस्कारी आयुष्य तो जीव जगू लागतो .
निसर्ग नियमाप्रमाणे शिक्षण , लग्न , संसार , जबाबदारी, पार पाडत असताना ... तसेच नोकरी वर सुध्दा तारेवरची कसरत होत असते . ती स्त्री मनाची ! सहजोडीदार व कुटुंबिय समजदार असतील तर ती स्त्री निभावून नेतेचं ! पण .. जर प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचं असेल तर मात्र तिची घुसमट होते. ती कुढत असते , आधार शोधण्याचा नादात कधी भरकटते , तर कधी भक्कम सोबत ही मिळते .
आणि.. जेव्हा अशी सोबत मिळते . तेव्हा ती मनातुन मोकळी होत असते. असाच एक अनुभव यानिमित्ताने सांगावासा वाटतो. जो सत्य असून भावनिक दृष्ट्या माझ्यासाठी नवं संजीवनी देणारा ठरला . असं म्हणतात की , त्यांच्याच आयुष्यात संघर्ष जास्त असतो .. जो त्या संघर्षाचा सामना करतो .
कोरोनाच्या महामारीने सारी दुनिया होरपळून निघाली . जणू प्रत्येक हुभर्यापर्यंत हा रोग पसरला . वैद्यकीय सेवेत सेवा देत असल्याने माझ्यासह माझे कुटुंब ही त्या विळख्यात सापडले. कुठेतरी पुण्य असल्याने म्हणा किंवा वडिलधार्यांचा आशिर्वाद म्हणा सेवेतील अधिकारी मंडळीमुळे योग्य उपचार मिळाला. पण...... तो घेत असताना जे मानसिक खच्चीकरण होतं होते, तेव्हा मानसिक आधाराची खरी गरज होती. आणि खरोखरंच आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की साहित्य सेवेचा डॉ. आमच्या कुटुंबाचा आधार वड ठरला.
स्वतः जोखिम घेऊन त्या १४ दिवसांत त्यांनी आमचं जे मनोबल वाढलं ते शब्दात सांगण्यासारखं नाही इतकं अनमोल होत. त्यांचा आठ वर्षाचा मुलगा माझ्यासाठी तर देवदूतच ठरला. त्याने माझ्यासाठी ज्या ज्या सदिच्छा दिल्या , त्या त्या हळूहळू पूर्ण होत आहेत. एखाद्याला सर्दी ताप आहे म्हटल्यावर कोसो दूर पळणारे मित्र , भाऊबंद आणि नातेवाईक यानिमित्ताने त्यांचे खरे चेहरे दाखवून गेले . जिवलग! आणि जिवघेण यातला फरक अनुभवायला मिळाला .
आपण ऐकतो की गरज पडली तर अर्धा रात्रीला मदतीला येईन . पण खरी गरज असतान , आपल्याच माणसांनी फोन न उचलत , तोंड फिरवून जाणं, किती जीवघेण असतं, हे फक्त अनुभवणारी व्यक्तीचं सांगू शकते. असं म्हणतात की.... रक्ताची नाती सर्वश्रेष्ठ असतात , असतील ही , आहेत ही , पण ..... कधी कधी ती आभासी मृगजळ ही असतात . अशावेळी फक्त नाळेशी जोडलेली नाती म्हणजे आपले आई-वडील, आणि भाऊ खंबीर पणे उभे राहतात .
आणि खरंच मी मनापासून देवाचे आभार मानते की ...., असे दोन सच्चे भाऊ त्याने माझ्या जीवनात पाठवले. व माझा पाठचा भाऊ माझ्यासाठी संरक्षण कवच बनून , त्याने मला जे सहकार्य केलं ते सुध्दा शब्दात सांगता येणारं नाही. या आधी मी फक्त आईवडिलांच्याच ऋणात राहणे पसंत करत होते. पण.... आता या घडीला मी या तीन देवदूतांची आजन्म ऋणी राहीन. त्यापैकी पहिला आहे , तो माझ्या पाठचा लहान भाऊ विजय होय , त्यानंतर दुसरा आणि तिसरा आहे तो म्हणजे माझा श्वास ज्यांनी नवीन संजीवनी देऊन दिर्घायुष्य बनवला. तो माझा देवचं !
माझ्या असंख्य अडचणींवर मात करणारा प्रत्येक क्षणी नव्या संकटातून बाहेर काढणारा माझा भाऊ डॉ . सुनिल दादा पाटील. जे कवितासागर प्रकाशनाचे प्रकाशक असून माझ्या जीवनातला अंधार मिटवून त्यांनी माझं सुख, माझं सौभाग्य जपण्यासाठी , मला जी काही मदत केली आहे ती निःशब्द करणारी असून हे धाडस फक्त आणि फक्त एक मोठा भाऊचं करू शकतो.
जो रक्ताच्या नात्यापेक्षा ही कितीतरी पटीने ते आज या दूबळ्या बहिणीसाठी आपलं कर्तव्य अगदी निस्वार्थ पणे पार पाडत आहेत. आणि म्हणूनच ते मला महाभारतातल्या श्री कृष्णापेक्षाही श्रेष्ठ वाटतात , आणि राहतील ही.
बाळाला काय हवं ? हे फक्त आई सांगू शकते . पण बहिण कोणत्या अडचणीत आहे ? हे फक्त एक सच्चा भाऊच जाणू शकतो. असा अनुभव मला या सुनिल दादांनी दिलेला आहे . स्वतःची बायको आजारी असूनही ते आमच्यासाठी वेळात वेळ काढून सेवा द्यायचे , मन जपायचे आणि एवढ्या आभाळासारख्या मनाचा मोठेपणा असणारा भाऊ मला लाभला. हेच माझे नशीब समजते.
सध्याच्या व्यवहारी जगात स्वार्थाने बरबटलेली नाती असताना . एखाद्याच्या जीवाची रक्षा करावी . यासाठी रात्रंदिन देवाकडे याचना करणारे माझे तिसरे बंधू श्री . राज धुदाट सर !
या दोन्ही जोडप्याकडे बघितलं की आव्हानांना सामोरे जायची प्रेरणा मिळते. जेव्हा मीच काय कोणीही अडचणीत असले की , पहिला पाणी यांच्याच डोळ्यात येते. मग ही नाती मला मिळाली म्हणून मला मनापासून वाटतं की हे नातं जे जोडलयं ते या देवदूताची जे नेहमीच माझ्यासाठी वंदनीय आहेत. असं हे नातं मनाचं मनाशी !!
सौ. मनिषा पिंटू वराळे .
धरणगुत्ती , तालुका :— शिरोळ , जिल्हा :— कोल्हापूर
पिन कोड नंबर :— ४१६१०२
फोन नंबर:— ७०५७२२५४०७
No comments:
Post a Comment