Thursday, December 31, 2020

आज दादांचा वाढदिवस

                   आज दादांचा वाढदिवस


बालपणापासून कष्ट आणि तडजोड यामुळे शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण केली.प्रत्येक टप्प्यावर नवा अनुभव घेऊन तावून सुलाखून निघालेले एक दिलदार व्यक्तिमत्व आहे डॉ.सुनिल दादा पाटील. साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि फक्त आपल्या भारतातच नाही तर परदेशातही अनेक जीवाभावाची माणसं जोडून स्नेह वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करणारं हे उमदं व्यक्तिमत्व आहे.

असं म्हणतात की,प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते पण मला असं वाटतं की, जिथं जीवन जगण्यासाठी संजिवनी मिळते आणि माझ्यासारख्या सामान्य लेखनिकाच्या आयुष्यात परिस स्पर्श करून एक लुकलुकणारा तारा तयार करण्याचे काम दादांनी केले आहे.

फक्त पडद्याआड राहून मार्गदर्शन करणं हे वाटतं तितकं सोपं नसतं.पण दादा प्रत्येकाला प्रकाश झोतात आणून नामानिराळे राहतात हे गूण बघून वाटतं की, किती सहनशीलता आहे या माणसांत! म्हणजे बघा एका रोपट्याला लहानाचं मोठं करायचं तरी त्याचं श्रेय घ्यायचं नाही आणि एका वठलेल्या झाडाची निगा राखून त्याला जीवन दान द्यायचं तरीही कुठला मोठेपणा दाखवून द्यायचा नाही.

असं विविध प्रकारच्या गुणवत्ता असूनही साधं राहणं आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सोबत घेऊन वावरणारं वात्स्ल्य देणारं हे व्यक्तिमत्व जे साहित्य क्षेत्रात बापमाणूस म्हणून ओळखला जातो.अशा या गुरूंचा आज वाढदिवस आहे आणि मला मनापासून वाटतं की, आनंद वाटणारे हात आपल्या सर्वांच्या पाठीवर असणारे हे दादा त्यांच्या अर्धांगिनी संजिवनी दिदी सोबत प्रिन्सरूपी बालकाला घडवत,नीलशी ध्येयवेड्या गप्पा मारत खूप खूप प्रगती करून माणुसकी जपत असाच जिव्हाळा वाढवत दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

          सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Saturday, December 19, 2020

एक अविस्मरणीय संध्याकाळ

                   एक अविस्मरणीय संध्याकाळ

काल खूप दिवसांनी अनेक जीवाभावाची  ज्येष्ठ साहित्यिक कुटूंबातील सदस्य यांना भेटण्याचा योग आला.निमित्त होतं ते प्राध्यापक प्रविणकुमार वैद्य सरांचा वाढदिवस.

           प्राध्यापक प्रविणकुमार वैद्य सर एक असं उमदं व्यक्तिमत्व जे तरूणाईला सुध्दा लाजवेल असं कर्तुत्व! एक मार्गदर्शक गुरु आणि सदा हसतमुख चेहरा घेऊन वावरणारं वात्स्ल्य देणारं ममतेने विचारपूस करून बापपण जपणारं हे आदर्श व्यक्तिमत्व आहे.

          असं म्हणतात की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते.पण अम्रुतयोग असा की,प्राध्यापक प्रविणकुमार वैद्य यांनी त्यांच्या अर्धांगिनी प्राध्यापक सौ. वैद्य काकींच्या मागे असा तेजोमय साथ देणारा जीवनसाथी लाभला.ज्यांनी स्वत: आपल्या पत्नीला शिक्षण पूर्ण करून, त्यांना घरकामात मदत करून , एक नावाजलेली प्राध्यापिका बनवलं.

    डॉ.सुबोध दादा आणि फार्मसिस्ट प्रबोध दादा सारखी सेवाभाव जपणारी गुणी मुलं लाभली.जी पुर्वापार चालत आलेली सेवा बजावत आहेत.लक्ष्मीरुपाने प्रांजल वहिनी आल्या आणि घरची अन्नपूर्णा होऊन मुलीची उणिव भरून काढली.नातवंडाच्या बाललीलात रमताना घराचं गोकुळ अनुभवताना त्यांनी आपली लेखणी सुध्दा तितक्याच आत्मीयतेने जपली आहे.

जवळपास वीस एक पुस्तकांचे जनक,एक आदर्श व्यक्तिमत्व आणि साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या या आपल्या बापमाणसाला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले तेव्हा अक्षरशः मन अभिमानाने फुलून आले.वयाची बहात्तरी पूर्ण होत असताना आजही ते कर्तव्य पार पाडत आहेत ते आपल्या सहचारिणीची सेवा तितक्यात आपुलकीने करत आहेत.अशा अनेक आठवणी जाग्या होतात आणि वेळेअभावी सारं काही सांगता येत नाही.तरीही साहित्य सेवा बजावत त्यात प्राविण्य मिळवणारा हा बाप माणूस मला आज खूप मोठा वाटला.

मंगेश सरांसारखे विचार सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगता यावे आणि सुर्यवंशी सरांसारखं हसत हसवत जीवनाचा आस्वाद घेता यावा.आवटी सरांसारखं वाणीतून अम्रुत ज्ञान मिळालं, अनेक जीवाभावाची ज्येष्ठ साहित्यिक त्यांचे विचार ऐकायला मिळाले.आणि हे सारं ज्यांच्यामुळे शक्य झाले ते म्हणजे कविता सागरचे डॉ सुनील दादा, संजिवनी दिदी,राज सर आणि रोझ दिदी ,पटेल सर आणि सर्वच दिग्गज साहित्यिक कुटूंबातील सदस्य यांच्या सहकार्याने!

अशीच विनंती देवा चरणी की, माझ्या या बापमाणसाला दिर्घायुष्य लाभो आणि त्यांची लेखणी अविरत चालू राहून असाच मार्गदर्शन आणि जीवनाचे सार समजावून सांगत धीर देणारा हात आपल्या सर्वांच्या पाठीवर राहो हीच सदिच्छा.जाता जाता पुन्हा एकदा वैद्य सरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.असा क्षण पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळावा अशी विनंती.

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Tuesday, December 15, 2020

ध्येय वेड्या मनाचे

 


कुणी कितीही झिडकारलं तरी काहीच फरक पडत नाही मला

कुणी कितीही टोचून बोललं,ध्येयहीन समजलं तरी काहीच वाटत नाही मला

मी ध्येयवेडी की मी आळशी काहीच समजून सांगायचं नाही मला

कारण हरवलेल्या संधीविषयी रडत बसायला आवडत नाही मला

माझी स्वप्नं, माझ्या आकांक्षा आणि माझी स्वप्नपूर्तता याविषयी काहीच बोलायचं नाही मला

कारण.... नशीब आणि बुध्दीमत्ता यावर भरोसाच नाही राहिला

फक्त दुनिया गोल आहे आणि सारीच आपली माणसं आहेत, एवढंच समजून माणुसकी जपायची आहे मला

नाती, मैत्री या पलिकडेही माणुसकी श्रेष्ठ असते हेच दाखवायचं आहे मला

कुणाला कितीही जीव लावला तरी शेवटी तुटावंच लागतं हेच समजून घ्यायचं आहे मला

स्वार्थी या दुनियेचा कावा माणुसकी पुढे हरवायचा आहे मला

खरंच म्हणून कितीही दूषणं दिली तरी कमजोर नाही व्हायचंय मला

माणुसकी जपत जपत , फुलं वाटत वाटत सुगंध जपायचा आहे मला

कोणत्याही उच्च पदस्थांशी स्पर्धा नाही करायची मला

माझ्याच संयमाचे ध्येय आता गाठायचे आहे मला.....

                      सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

विश्वास

                विश्वास

चार अक्षरी शब्द आहे विश्वास वाचतानाही लय वाटतो खास

खेडवळ विचाराने सर्वांनाच जीव लावतो झक्कास

असो लहान,मोठा कुणीही पण आदर करतो हमखास

तरीही...हरतो,मरतो, धडपडतो तो हाच विश्वास

स्वप्नं म्हणू की सत्य हा नशिबाचाच ध्यास

संधी मिळते सोनं होतं तरीही राख नशिबास

खरंच, किती छोटा शब्द आहे ना विश्वास

कित्येकदा होतो घात तरीही ठेवतोच ना आपण विश्वास

करोत कुणीही कितीही आमचा दु:स्वास 

व्यवहार चातुर्यापासून दूर राहतो हा विश्वास

भावनिकता जपणार्याच्या गळ्याला लागतो फास

असा हा भावनांचा खेळ करून सोडतो विश्वास

                  सौ. मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती


Monday, November 30, 2020

नवी उमेद

                                 नवी उमेद

नव्या उमेदीने पुन्हा एकदा उभी आहे

नात्यातला गोडवा की,खारटपणा हे सिद्ध करायचं आहे

वाट बदलायची सवय लावून घ्यायची आहे

कारण, आता पुन्हा नव्याने ध्येय गाठायचे आहे

माणुसकी जपता जपता व्रुध्दाश्रम संपवायचे आहे

घरातली श्रीमंती ही घरचे ज्येष्ठ असतात हे दाखवायचे आहे

व्रुध्दांच्या चेहर्यावर समाधानाचे हसू आणायचे आहे

बालगोपाळांना नात्याची ओढ शिकवायची आहे

पाळणा घरातील कोरडे पण आता थांबवायचे आहे

नातवंडांच्या समवेत आजी आजोबांनी मस्त जगायचे आहे

जिथे आधारवड आहे तिथे सुख नांदतं हे दाखवायचं आहे

म्हणून त्यासाठी आई-बाप,सासू सासरे यांचं बालपण कि, म्हातारपण हे समजून घ्यायचं आहे

त्रिकोणी, चौकोनी कुटूंबापेक्षा वर्तुळाचे महत्त्व पटवून द्यायचे आहे

सुखी सम्रुध्दीच्या देशात पुन्हा एकदा समाधान पसरायचे आहे

                      सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती ं

Thursday, November 26, 2020

जगण्याचं बळ

                             जगण्याचं बळ

जगण्याचं बळ उराशी बाळगून नव्या उमेदीने उठले

येणारी संकट,आलेली संकटं आणि भोगत असलेल्या व्याधींना समजावून उठले

बास्स: आता कितीही घेरलंत तरी.,.... नाही थांबणार हे ठणकावून सांगितले

आणि कोरोनाच्या महामारीत सुध्दा समाजसेैवेचं व्रत पाळले

नाही पद प्रतिष्ठा तरी कर्तव्य पार जाणले

होता होईल तेवढे समाधान देत सुटले

रडणार्यांचे अश्रू पुसत सुटले.

कधी कधी स्वताला त्यांच्यातच गुंतवले

असं नव्या उमेदीने जगणे पसंद केले

         सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती 

Friday, October 30, 2020

अशांत मन

                      अशांत

कधी वाटतं तुझ्याशी खूप खूप बोलावं

थोडं तुझ्याही मनातल्या गोष्टी जाणून घ्यावं

पण विचार पडतो तुला बोलतं कसं करावं

मी समोर दिसता तू तुझं मौन सोडावं

सखे सांग  ना.,...

हे माझ्याच बाबतीत का घडावं

मी तुला आपलं मानलं,हाच जणू अपराध समजावं

तू कशीही असलीस तरी माझीच सखी आहेस हे मी जाणावं

आणि अशांत मन तुझ्या गळाभेटीने शांत व्हावं

माहित नाही हे असं का बाईचं जगणं असावं

 मला स्वभावाने आवडलीस म्हणून......

तुझं माझ्यापासून दूर दूर राहणं

तुझं निखळ हास्य आणि ध्येयनिष्ठा तू विसरणं

शोभतं का सखे तुला तुझं हे वागणं

तू असतेस घरी म्हणून तुला भेटायला येणं

आणि तू बंदिस्त असल्याने मला तू झिडकारणं

हे कसलं ग राधा तुझं मैत्री जपणं

वाटतं कधी-कधी व्यर्थच आहे हे जगणं

व्यर्थच आहे हे जगणं.......‌‌‌

                       सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Thursday, October 22, 2020

शुध्दात्मा तिच्या मनाचा

                            शुध्दात्मा तिच्या मनाचा

दहा वर्षाची मैत्री अशी क्षणभरात कशी तुटली

आहे सखी जीवलग तरी फक्त मैत्रिण कशी उरली

मैत्रीत निदान दोन जीवांची साथ ना पुरली

किती सहजपणे प्रत्येक नाती तिने माझ्याशी जोडली

नात्यांचा गुंता करून पाशातून ती बाहेर पडली

ती लक्ष्मी,ती राधा तिची बरीच रूपं दिसली

पण.....त्यागमुर्ती तिची,,...कधीच मला नाही समजली


आठवणींवर जगावं, भूतकाळाला ती विसरून गेली

किती स्पष्टपणे लेक,पत्नी,सून,आई ही नाती तिने निभावली

पण क्षणिक सुखाचा विरंगुळा ती मैत्री मात्र विसरली

नारी तुझी रुपं किती नऊरूपांत तू दिसली

पण जीवाभावाची मैत्री तुझ्या नात्यांत ना उरली

रक्ताची नातीच तुला सर्वश्रेष्ठ आज ठरली

तुझा शुध्दात्मा,तुझा संयम ही रीत मला न कळली

ध्यास तुझ्या सहवासाचा  एवढीच खात्री कळली

पण सहजपणे.....सारे पाश तोडून ती वेगळी झाली

ही तळमळ, ही व्यथा, ही मनाची अवस्था ना संपली

अखेर मैत्री नसते सबळ याची खात्री मनाला पटली

कर्तव्य करण्यासाठी मनाची तयारी केली

ना मैत्री ना प्रिती नाती सारीच फोल ठरली

नाती सारीच फोल ठरली........

         सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Monday, October 19, 2020

धक्का

                     धक्का

काय मी ऐकून बसलो, श्र्वास माझा कोंडला

मी तुझी अन् तू माझी मैत्रबंध कसा तोडला

             ओढ अनामिक लागली तरी संयम मी ठेवला

            आठवणीत मात्र  मन तुझ्यात  जीव हा गुंतला

आसवांना आज तिचा का घोर नाही केला

तिला हा खेळ जीवघेणा जमला

                   ती फक्त मैत्रिण असावी हा विचार मी केला

                      घाव  घालून तीने का खेळ हा संपवला

सतत असती हुरहूर तरी नाही फोन केला

आज मात्र मैत्रीवरचा विश्वास ही उडाला

          सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Thursday, October 15, 2020

कोरोनाने तोडली का हो माणुसकी?

           

                     कोरोनाने तोडली का हो माणुसकी ? 


         पुर्वी खेड्यांमध्ये घराघरांत आपुलकी आणि जिव्हाळा होता .  लांबलचक  पंगती बसत होत्या .  एखाद्या पदार्थ केला तर चार घरात पोचत होता .  

                  रात्रभर गप्पा रंगत होत्या . पहाटे कामांची लगबग सुरू होती .  शेतंशिवार आनंदात डोलत होती . सर्जा राजाची जोडी घुंगराच्या तालावर दौडत होती . चंपा , पारू , चंर्दी ,   ( म्हैशींची नावं)  ह्या रानामाळात चरायला जात होत्या . 


               सायंकाळी त्या घरचा रस्ता धरून थेट दावणीत जाऊन बसत होत्या .  आईने धारेसाठी केलेली लगबग आणि कासांडी भरून दूध घरात येत होतं .  खाऊन पिऊन माणसं सुखात राहत होती . 

                   पण ............    प्रगतीच्या नावाखाली नोकरी धंद्याच्या आशेने माणसं गाव सोडून शहरात गेली .  उच्च शिक्षणासाठी मुलांनी परदेश गाठला आणि गावाची गोडीच  संपून गेली . 

                    चार दोन जुनी जाणती मग गावच्या पारावर बसून जुन्या आठवणी काढून रमत होती . पाणावलेल्या डोळ्यांनी लेकरांची वाट पाहत होती आणि परस्पर लग्न करून आलेल्या  सुना , नातवंडे , बघण्यासाठी व्याकुळ झाली होती . पण ......... पोटच्या पोराला मात्र याची खातरच नव्हती .

   
                   यंत्रासारखं धावणारा आणि पैशापाठी लागणारा पोर , त्याला मायेची ऊब कितीही खूणावली तरी कर्तव्य म्हणून शे पाचशे रुपडे पाठवण्यापलिकडे तो काहीच तर करत नव्हता .  आणि हाच फरक जनरेशन गॅप म्हणून मित्रांमध्ये सांगत होता. अगदी तसाच जनरेशन गॅप निसर्ग सुध्दा करतोय असं वाटतं .  कारण ...........‌‌‌‌....

 
                      कारण , गेल्या मार्च पासून भारतात कोरोनान थैमान घातलेलं आहे.  आरोग्य यंत्रणा , आशा , अंगणवाडी सेविका , आणि शिक्षक  सुध्दा आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत . पण हा कोरोना जरा अजबच निघालाय . गरीब , श्रींमंत कोणताही भेद न करता तो उच्च , प्रतिष्ठीतांपासून ते मोलमजुरी करणार्या पर्यत सार्यानाच आपल्या विळख्यात घेत चाललाय . साधा  सर्दी , ताप , कणकण जरी झाली तरी प्रतिकार शक्ती कमी होऊन तो कोरोना रूग्ण म्हणून घोषित व्हायलाय .  

                    संपर्क टाळला  जातो . सार्यांच गोष्टी वेगळ्या ठेवाव्या लागतात .  माणूस माणसापासून दूर चाललाय .  फक्त आरोग्य कर्मचारी धाडसाने पुढे जाऊन सेवा बजावत  असतात .  तेव्हा अर्ध्याहून अधिक पिडीतांना आपण यातून बरे होऊ की नाही या काळजीने खचून आत्मविश्वास  गमावून प्रसंगी जीव सुध्दा गमवत आहेत . 

                    तर काही पिडीतांना माणसांचा तुसडेपणा ,  एकटेपणा देऊन जातोय . कोरोना  म्हणजे एक प्रकारे वाळीत टाकलेलं असावं  असा अनुभव तो रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक घेत आहेत . आणि खरंच जगायचं कसं हा मोठा प्रश्न सतत भेडसावत आहे . 

                    आधीचा काळ किती सुखाचा होता . कुणी आजारी पडलं , चव बदलली तर घरचे सोडाच पण शेजारी पाजारी सुध्दा एखादा पदार्थ करून घेऊन यायचे . आणि चव लागतंय का बघ असं म्हणायचे . आणि आता ..............

       
                      बैलाला घालाव्यात तशा मुसक्या घालून , जो , तो , फिरत आहे . असं वाटतं , जणू त्या मूकप्राण्यांनी दिलेला आशिर्वादच असावा की , " जैसी करणी वैसी भरणी " . निसर्ग शेवटी सहन तरी किती करेल बरं  !   रसायनयुक्त मैला मिश्रीत पाणी थेट नदीत आणि नळांवाटे घराघरांत पोचतंय . प्ल्यास्टीकचा अतीवापर आणि स्वच्छतेचा अभाव या सार्याचाच दुष्परिणाम या कोरोनाला खतपाणी घालणाऱ्या आहेत . 


                     परदेशातून आलेला हा आजार माणसाला दूर करत आहे . चार माणसं एकत्र बोलू , बसू शकत नाहीत . एकमेकांच सांत्वन करू शकत नाहीत . आणि ज्या प्ल्यास्टीकने नद्या , गटारी , तलावं तुंबलीत त्याच प्ल्यास्टीकमध्ये कोरोनाने म्रुत झालेल्या व्यक्तीला गुंडाळून दहन केले जाते . ज्या घरांसाठी मुलांसाठी , कुटूंबासाठी आयुष्य झिजविले तीच आपली माणसं मयत व्यक्तीची दहनाची जबाबदारी घेत नाहीत . 

            
                     मग रेस्क्यु फोर्सच्या मदतीने दहन करण्यात येतं . हा कोणता न्याय ?    बापाची इस्टेट , पैसा , मालमत्ता  सारं काही पाहिजे पण बापाचा अंत्यविधी करावा इतकंही मन निर्मळ नसावं . तर , दुसरीकडे मोलमजुरी करून घरच्यांना सांभाळतो . आईबापात देव बघतो . तरीही , सुखाला गालबोट लागलेच आणि घरचा आधारवड हरपला . चुटकीसरशी अनंतात विलीन होतो . तेव्हा हे असं झालंच कसं झालंच कसं या  विचाराने कोलमडलेल्या तो मुलगा सैरभैर होतो . 


                      आपल्या बापाचे आकस्मिक निधन झालं हे त्याच्या मनाला चटका लावून जाते . भितीने त्याचा थरकाप उडतो . पूर्ण घराची जबाबदारी ज्या खंद्यावर असते तो खांदा बापासाठी हळवा होतो . कितीही समजावलं तरी त्याचं मन मानत नाही . 

                       हातातोंडाला आलेली पोरं आपल्या बापाची ही अवस्था बघून घाबरून जातात . या दवाखान्यातून त्या दवाखान्यात घेऊन जातात . सारेच रिपोर्ट चांगले आलेले असतात .  पण ......... पण त्याचं मन खचलेलं असतं . 


                         माझा बाप कालपर्यंत ठणठणीत होता . साधा तापच त्याला आला आणि माझा बाप निघून गेला . हे सत्यच त्याला पटत नव्हतं . तो आतल्या आत कुढत असतो . सावरणारे हात कुटूंबाशिवाय दुसरे नसतात . अशावेळी मित्र मंडळ आणि नातेवाईक सुध्दा पाठ फिरवतात . आपलीच माणसं परकी वाटत असतात . नव्हे तर ती तशीच वागून माणुसकी विसरत असतात . मग , खरंच मनापासून वाटत राहतं की , खरंच या कोरोनाने नात्यातली आपुलकी आणि माणसांतली माणुसकी तोडली काय हो ? 
 
                                   सौ. मनिषा पिंटू वराळे. धरणगुत्ती. 

             



Thursday, October 8, 2020

टपाल दिवसानिमित्त

                       टपाल दिन

खूपदा  मन माझं भूतकाळातच रमतं

पत्रातली ती आपुलकी मनात साठवून ठेवतं

पोस्ट कार्ड, आंतरदेशीय ही पत्रांची महती सांगतं

मनातलं खोल गुपीत बंद पत्रातून खुलत जातं

आयुष्य असं जिव्हाळ्याचं नातं सांगतं

पत्र मनाशी मनाचा थेट संवाद साधत असतं

पण....... आता.......ते नातंच कमजोर वाटतं

मोबाईल आणि इंटरनेटच्या दूनियेत हरवतं

नमस्कार, आशिर्वाद ऐवजी gm gn वाचतं

आपला/आपली याऐवजी dear bestti म्हणतं

खरंच पत्र नसल्यामुळे जीवन कोरडे भकास वाटत

पत्रातल्या शब्दातून आपुलकी जाणवत असायची

वारंवार वाचल्यामुळे ओढ अनामिक वाढायची

आज मात्र मेसेज मध्ये ती गोडी नाही कळायची

पत्रांसाठीची ओढ अनामिक खूपच गोड असायची

ना ती हूरहूर, ना तो आपलेपणा दाखवायची

पत्रांची संगती अशी पुन्हा कशी मिळायची

माणसातली माणुसकी मनापासून    जपायची

खाकी वर्दीतल्या पोस्टमनची घराघरांत ओढ असायची

प्रत्येकाशी आपुलकी आणि नाळ जिव्हाळ्याची रूजायची

टपाल दिवसानिमित्त ही सल मी अलगद उतरायची

सार्यांच पोस्टमन दादांना शुभेच्छा देण्याची घाई करायची

               सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Sunday, September 27, 2020

सुजाता एक सुंदर रहस्य

                 सुजाता एक सुंदर रहस्य

 खरंच खूप म्हणजे खूपच आठवण आली कालच्या रात्री सुजाता तुझी.तू म्हणायचीस की,भासात श्वासात तूझी सोबत नेहमीच असणार.पण वेडे....कालचा दिवस माझ्यासाठी खूपच कठीण गेला.क्षणभर वाटलं,तू किती विचार केला असशील माझा? सुजाता तू माझ्या सोबत कमी पण तिच्या सोबत खूप फिरलीस म्हणे? आणि वरचेवर छोट्या छोट्या भेटवस्तू देऊन तिला ओळखण्याचा तुझा प्रयत्न किती साधा होता.सुजाता तू मला मारलेली पहिली गळाभेट आणि तू घेतलेलं चुंबन.......

दोन्हीची काल खूप आठवण आली.तिला खूश करण्यासाठी मी तिच्या घरी गेलो आणि निदान सरप्राइज बर्थडे करता येईल या विचाराने, पण....सुजा...........तू अगदी बरोबर ओळखलं होतंस ग तिला! 

तुझ्यामाझ्यात झालेला संवाद आणि तिनं बोललेलं शब्द यांनी खरंच काळीज चिरत गेलं माझं.कसंबसं स्वत: ला सावरलं पण तुला तर माहीतच आहे की, हे मी जास्त वेळ नाही करू शकत.माझा त्रास वाढल्याने माझी घुसमट होत होती आणि तेव्हा सुजाता मला खरोखर वाटलं की,तू किती सहज तुझा आनंद, तुझं सुख तिच्या ओंजळीत देऊन टाकलं होतंस.तू किती रडलीस आणि आत्महत्येचा प्रयत्न तसा विचार करून तिच्या गळ्यात पडून रडलीस तेव्हा मला खूप अपराधी वाटलं होतं.

माझ्या चेहऱ्यावरील भाव वाचून तू मला तिच्यावर कविता लिहायला सांगितलंस.आणि तेव्हा तुझं त्यागातलं प्रेम मला जाणवलं.मी तुला म्हटलंही  होते की,ती,तू , मी आणि दिशा आपण  चौघी खूप छान मैत्री निभवू.तेव्हा तुला आठवतं....... किती सहजपणे तू बोलली होतीस की, एका म्यानात एकच तलवार राहू शकते आणि ती फक्त तुझी इच्छा असेल.

दिशाला अनेक मैत्रीणी मिळतीलही आणि तुझ्या सहवासात ती खुलते पण..... फक्त तिच्याच सवडीनुसार! म्हणून तू तिचा विचार सोडून दे आणि माझं काय? 

आज ना उद्या मी सर्व्हिससाठी इकडे तिकडे जाईन पण नेहमीच तुझ्या संपर्कात असेन.भेटता नाही येणार आपल्याला! पण फोनवर बोलशील ना मला विसरणार तर नाहीस ना? आणि तसंही इच्छा मात्र नेहमीच तुझ्या समोर असेल.तू मनात आणलस तर तिला भेटशील ही आणि एक ना एक दिवस तिला तुझं निखळ स्वच्छ मैत्री प्रेम मान्यच करावं लागेल.

तुला आठवतं सुजाता.......ती सुरवातीला किती मोजकंच बोलायची आणि तुला गमावू नये म्हणून मी तुझ्यावर फक्त नजरेने बघत असायचो.तेव्हा थोड्या दिवसांनी ती अगदी मनातलं बोलायला लागली खुलायला लागली.आणि दुःख लपवत डोळे पुसत तू मला बघायचीस तेव्हा खूप अपराधी वाटायचं ग मला.....

पण तू पुण्यात चांगल्या पद्धतीने रुळलीस आणि नव नव्या वस्तू खरेदी करून संसार सुखाचा करत होतीस.किती खूश होऊन तू मला सांगायला अधीर व्हायचीस.तेव्हा वाटायचं की,धावत धावत यावं आणि तुला भेटावं.तुझी ओढ मनाला सावरत सावरत तिच्या प्रेमाखातर मी तिच्यात गुंतत गेलो.तीही मला वाटतं माझी झाली असावी.आम्ही खूप गप्पा मारत बसायचे तासनतास एकमेकींशी गप्पा मारल्या आणि नंतर रात्री उशिरा सुध्दा.आमची जेवणाची वेळ झालेली असायची आणि तिचा फोन यायचा.आता हे रोजचंच झाले होते.घरची रिंग वाजली की अंदाज लावायची.इतकं आम्ही रमलो होतो पण ‌....

अचानक काय झालं काय माहित नाही,आमची मैत्री तिच्या घरच्यांना खटकू लागली.एकदा तर तिची आजी आजारी असताना मी तिच्या नकळत आजीची तपासणी करताना थोडीशी सेवा केली होती.हे तिच्या लहान मावशीला माहीत होते आज कदाचित ती आजी सुध्दा लक्षात घेऊन मी जाईन तेव्हा माझी गळाभेट घेते मायेची ऊब देते.पण आजही तिच्या मोठ्या मावशीचे शब्द आठवले की खूप राग येतो.आणि आपलं कोणीच नाही असं वाटतं एकटेपणा जाणवतो.

कधी तुला गमावून बसलो याचं वाईट वाटतं तर कधी मी हरल्याचा भास होतो.सुजाता नाही सहन होत तीचं रागावणं,तिरसट बोलणं! 

तुला माहित आहे की किती जिव्हारी लागतं आणि मग आठवतं सुजाता तू माझ्या एका कटाक्षासाठी किती बैचेन असायचीस.आणि अगदी तिच्याही नकळत माझा हात तुझ्या हातात असायचा.कुणी बघून विचारलंच तर तू हसून वेळ मारुन न्यायचीस.देवाने याचीच शिक्षा दिली नसेल ना मला कि, मी नेहमीच तिच्या आठवणीत झुरावं आणि तिनं ओळखूनही मला दूर करावं.

अजून एक सुजाता, तिलाही तुझी खूप आठवण येते ग.आजही तुझ्या आठवणीत ती खूप रडते.तू पुन्हा भेटावीस अशी इच्छा व्यक्त करते.सुजा असं म्हणतात की, मनापासून मागितलेली गोष्ट एक ना एक दिवस देवाला द्यावीच लागते.मग तूच सांग देव काय आणि कसे देणार? 

सुजाता तुझ्याशी आता रोजच मनातल्या मनात बोलणं होतं आणि मग वाटतं की मी किती मोठी चूक केली आहे हे जाणवते.किती छोटी मागणी होती ग तुझी की मी फक्त एकदा तुला भेटून कडकडून मिठी मारावी.आणि तिच्या प्रेमाखातर मी तुझी ति ही इच्छा पूर्ण केली नाही.

सुजाता तुला मी कळले होते पण मला तू उशिराच समजलीस.तरीही जाता जाता तू तिनं खूश राहीलं पाहिजे हे कबूल करून घेतलंस.

किती मोठ्या मनाची आहेस ग तू! पण सुजाता तुला आजही माझी हालत बघून त्रास होतो का माझ्या मनाची अवस्था बघून, तिचं  मोजकं बोलणं ऐकून, भावना व्यक्त न करता केवळ औपचारिकता म्हणून बोलताना पाहून तुलाही वाईट वाटत असेल ना?

सुजाता कधी कधी वाटतं की,तू जेव्हा येशील ना तेव्हा सर्व काही सुरळीत होईल.मन मान्यच करत नाही कि तू नाहीस.आणि मग वाटतं की तू दिलेलं मला घेता आलं नाही आणि मी दिलेलं तिला आवडत नाही.किती भ्रामक कल्पनेत जगायचं तेच कळत नाही.पण मग वाटतं की तुला समजून घेतलं नाही याचीच तर ही सजा मिळत असावी.पण तू हे नक्की बघत असणार आणि माझी अवस्था पाहून तुलाही वाईट वाटत असेल ना? म्हणून तर म्हणतो की तू लवकर परत ये आणि तेव्हाच सारं व्यवस्थित होईल हे मात्र नक्की! 

करशील ना तुझ्या हळुवार कप्प्यात जपून ठेवलेल्या या आपल्या मैत्रीसाठी............ तुझीच न झालेली एक आशा.........

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Wednesday, September 23, 2020

ती फक्त मैत्रिण

                    ती फक्त मैत्रिण

आज तिचा वाढदिवस.खरंतर कालपासूनच मन विविध उपक्रम रचत आहे.हे असं केलं तर तिला काय वाटेल? किंवा मग असं ठरवलं तर ती खूश होईल की नाही? नुसत्या विचारांनी हैराण परेशान झाले होते.

तर आज जवळपास गेल्या दहा पंधरा वर्षांपासून तिला मी ओळखते.मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आणि ती माझी वर्गमैत्रिण झाली.नंतर स्वभाव पटला आणि आम्ही तिघी एकत्र आलो.तश्या इतरही मैत्रिणी होत्या.कुणी तर उच्च पदावर कार्यरत आहेत आणि तरीही मला हिच का आवडली माहीत नाही.

माझ्यासारखं सर्व जबाबदाऱ्या पार पाडत शिक्षण घेण्याची आवड जपणारी ती होती.येताना होणारी कुतर ओढ आणि जाताना झालेली घाई.हिला कुठंतरी एक मुक्त होण्यासाठी असेल किंवा तिला समजून घेणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन मी तिला आपलं मानलं.आणि सुजाता मला समजून घेत असताना माझ्यावर जीवापाड प्रेम करत असताना मला ही हवीशी वाटत होती.कारण, घुसमटत ती जगू नये असे मला मनापासून वाटत होतं.मी माझा विचार सुजाताला बोलून दाखवला होता.तिलाही खूप छान वाटले.अगदी मोकळेपणाने तिने मला सांगितले की होय तीला खरंच खूप गरज आहे माझी.एका हातात इच्छा होती आणि दुसर्या हातात आनंद होता आणि मी फक्त इच्छा निवडली होती म्हणूनच कदाचित मला आणि तिला सोडून खूप दूर गेली होती माझी सखी आमची सुजाता.

तिच्या आठवणीत मन खचलं होतं आणि तरीही ती शांतपणे स्वप्नात येऊन सांगायची की मी नेमकं कसं जगावं.

मी माझ्या अंतरीची सुजाता जपली आणि हिला मुक्त होण्यासाठी वेळ दिला.ती खरंच खूप छान आहे कामाला वाघ आहे आणि तरीही ती हसमुख मनात विचार ठेवून वागणारी.चिडचिड करणारी कधी लहान मुलीसारखं खुदकन हसणारी अशी अल्लड माझी सखी आहे.

रोज न चुकता तिच्या प्रेमाखातर मी माझ्या कामातून वेळ काढून तिला हवं तेवढा वेळ तिच्याशी बोलायची.आणि तिला सावरता सावरता ती कधी आमच्या कुटुंबातील सदस्य झाली हे माझं मलाच कळलं नाही.

आता मात्र ती खूप बदलली आहे.का कुणास ठाऊक पण ती मला म्हणाली की ती फक्त मैत्रिण आहे माझी.खळकन काच तुटून हातावर पडावी आणि हात सावरताना छाती फुटावी असंच काहीसं झालं आहे.

तरीही ती सुखात राहो आरोग्य संपन्न आयुष्य जगावी याच या मंगलदिनी तिच्या प्रेमाखातर वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.आणि सदिच्छा सुध्दा.राधारानी......................नको रागवू खूप त्रास होतो तुला नाही कळायचं.

               सौ. मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती


Friday, September 18, 2020

एक सूर्य मावळला तो ही असा

                      एक सूर्य मावळला तो ही असा........

स्वातंत्र्य सैनिक शूर वीर तो भारतमातेचा सुपूत्र लढला

चळवळ केली भूमिगत झाला पण... देशासाठी अनमोल ठरला

काँग्रेसच्या प्रणेत्या इंदिराजींनी त्यांचा मान राखला

विशेष सल्लागार म्हणून बहूमोलाचा किताब मिळाला

सळसळता कार्यप्रवण तो मनाने खूपच हळवा राहिला

कुटूंबासाठी सर्व काही,मूग गिळून तो गप्प बसला

होणारी घुसमट अलगद लेखणीतून उतरत गेला

नामवंत मान्यवरांसोबत ज्येष्ठ साहित्य किताब मिळाला

लेखनीत स्वत:च आयुष्य तो मनसोक्त जगत राहिला

नव्वदीपार करूनही तो लेखनीत उमदा योध्दा ठरला

समग्र वाड्:मय  करण्यासाठी जीव वेडा तो खूप धडपडला

मानलं तर सारंच आपलं म्हणून मानसपुत्र तो गुणी लाभला

पित्यापरी सेवा घडली अंतसमयी मात्र....घोळ झाला

विरह वेडा कसा सोसावा सुनिल.... आता थोडा डळमळला

असंख्य साहित्यिकांचा आधार कवितासागरचा संचालक बनला

अशा या फ्रिडम फायटर विषयी मनातला किंतू लेखणीतून उतरला

अशोक दादा..... तुमच्या जाण्याने एक पोरकेपणा साहित्याला आला

कितीदा फोडावा टाहो तरी पुन्हा हा देह नाहीच भेटला

आदरांजली वाहावी कशी साश्रुनयनांनाही पूर आला

      सौ. मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Monday, September 14, 2020

असे हे दात्रुत्व माझ्या भावाचे

                असे हे दात्रूत्व माझ्या भावाचे

नमस्कार,मी मनिषा वराळे राहणार धरणगुत्ती.आज माणुसकी आणि माया जरी संपत चालली असली तरी काही ठिकाणी निर्व्याज आपुलकीची भावना व्यक्त होताना दिसत आहे त्यातीलच एक हा अनुभव.

खरंतर नाती म्हटलं की, काही जन्माने मिळतात तर, काही आपल्या स्वभावाने मिळतात.काही सहज तोंड ओळखीतून निर्माण होतात तर, काही अगदीच जीवश्च कंठश्च नाती बनतात.ओढ दोन मनांची! जिथे निरपेक्ष भावनेने नातं असते त्या निर्मळ नात्याला टिकवण्यासाठी निसर्ग सुध्दा अभिनव साथ देत असतोच.

आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, सध्या कोरोनाने किती विचित्र अवस्था आणलीय.मातसांची जीवनशैली बदललीय.काही तर उपासमारी भोगत आहेत.काही कर्जबाजारी झालीत, काही व्यसनाच्या आहारी गेलीत आणि काही निराशेच्या गर्तेत सापडलीत.

जसं आपण ऐकतो की,' कर्म कर फल की चिंता न कर!'या उक्तीप्रमाणे आणि देवाच्या काठीचा आवाज होत नसतो! तर वेळ आली तर तो सर्वांना बरोबर त्याची लायकी दाखवत़ो.अशाप्रकारे कित्येक वचनं आपण वाचत असतो आणि आपल्या परीने ते अंगिकारून जगत असतो.

सध्याच्या कोरोनाच्या या महामारीमध्ये स्वत: च पोट भरणं सुध्दा  मुश्किल होत आहे.कारण, हाताला काम नाही आणि ज्यांना काम आहे पण त्यांचा मोबदला वेळेवर मिळत नाही आणि आपल्यासारखीच स्थिती प्रत्येकाची असणार हे जाणून, येईल त्या परिस्थितीत शांतपणे.   सामोरे जाऊन जीवन जगावं लागतं तरीही आपण देशाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून प्रेरीत होऊन एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करणारे एक ध्येयवेडे कुटुंब आज मी पाहिले.नव्हेतर, त्यांच्या मनातला निरागस प्रामाणिकपणा सुध्दा अनुभवला आणि डोळ्यात पाणी आल्यावाचून राहिलं नाही.

आजची बचत उद्या कामाला येईल या आशेने आपले जवळचे नातेवाईक सुध्दा जेव्हा मदत मिगितली तर लांब जातात, अपमानास्पद वागणूक देऊन टाळाटाळ करतात तेव्हा हे कुटुंब अगदी आधारस्तंभ होऊन पाठीशी राहतात.तेव्हा ते हिमालयाहूनही ऊंच आणि परमेश्र्वराचे खरेखुरे दूत वाटतात.

आज अशा कितीतरी गरजवंताला त्यांनी गरजेच्या वस्तूंचा आणि पैशांची मदत केली आहे कोणतीही जाहिरात बाजी न करता.हा खरंच त्यांच्या मनाचा मोठेपणाच आहे.जेव्हा भुकेल्याची भूक शमवतो तेव्हा तो दाता श्रेष्ठ असतोच आणि या उपकाराची परतफेड होऊच शकत नाही जेव्हा आपण भरल्या डोळ्यांनी त्यांना हे विचारत असतो तेव्हा ते अगदी प्रांजळपणे सांगतात की, आपण एका भावाचे कर्तव्य पार पाडत आहोत बाकी काही नाही.आणि मग वाटतं,असा भाऊ, असं दात्रुत्व प्रत्येक बहिणीला मिळावं.

असा ध्येयवेडा पाठिराखा जिच्यापाठी असेल तिला प्रत्येक संकटात ठामपणे उभे राहण्याचे बळ नक्कीच मिळेल.आणि मनापासून सांगावसं वाटतं की,

सर....... तुम्ही देवाची लेकरं तर आहातच पण.... माझ्यासारख्या कित्येक बहिणींचा भक्कम आधार, एक जीवन संजीवनी सुध्दा आहात.खूप खूप मोठे व्हा.यशस्वी व्हा.आणि असेच नेहमीच माझ्या पाठीशी उभे रहा याच सदिच्छा.

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Sunday, September 13, 2020

गुरू माऊली

            गुरू माऊली

गुरू माऊली या शब्दांतच सारं जीवनाचं सार लपलंय असं वाटतं.कारण गुरू तो जो आदर्शवादी आणि सकारात्मक ऊर्जा देण्याचं आशावादी कार्य करतो आणि माऊली ती जी आपल्या पिल्लांना जगण्याचं बळ देते.जणू बाळ कडूच पाजते.सुसंस्कारी बनवते आणि गगनभरारी घेण्याचं बळ देते.

आणि या दोन्हींचा संगम म्हणजे वयाने समवयस्क असूनही विचाराने अव्वल स्थानावर असलेली,साजिरी दिसणारी आमची गुरुमाऊली.सौ. संजिवनी सुनील पाटील या होय.

आज माझ्या या सखीचा वाढदिवस.अगदी साधी राहणी असलेलं हे व्यक्तीमत्त्व.यांच्या डोळ्यात अथांग मायेचा सागर दिसावा असे डोळे.आणि असं ह्रदय ज्यांत सर्वाविषयी प्रेम आणि क्षमाभाव लपलेला असतो.या ज्यांच्या सहवासात राहतात ते जणू वटवृक्ष आहेत कारण, असंख्य बुध्दीजीवींना आपली ही संजिवनी देऊन जीवन प्रफुल्लित करत आहेत असं वाटतं.

आता प्रश्न पडला असेल की, नेमकी ही व्यक्ती कोण बरं?तर ती व्यक्ती आहे कविता सागर पब्लिकेशन्सची संचालिका, मुद्रित शोधिका सौ. संजिवनी सुनील पाटील.

असं म्हणतात की, छोटं कुटुंब सूखी कुटुंब असतं पण यांनी जे कुटुंब जोडलंय त्याचा विचार करणं कल्पनेच्या पलीकडचे आहे.सातासमुद्रापारसुध्दा यांचे अनेक स्नेही लेखक, कवी आहेत.हे ही नसे थोडके की,तळागाळातल्या लेखक कवींशी सुध्दा यांनी ऋणानुबंध जोडलेले आहेत.

स्वप्न पहावं आकाशाला गवसणी घालणारे,पण पाय...... पाय असावा धरणीमातेला कुशीत घेऊन असं जीवन जगणार्या या माझ्या गुरू माऊलींला माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

तुम जियो हजारो साल,साल के दिन हो पचास हजार! 

               सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

स्पंदन_दत्ताजी पायमोडे

                      स्पंदन

स्त्रीजन्माचा पुरस्कर्ता असणारे दत्ताजी पायमोडे सर यांना खूप खूप शुभेच्छा.भ्रुणहत्या थांबलीच पाहिजे यासाठी जीवतोडून सांगूनही काही महाभाग ऐकत नाहीत तेव्हा हे जळजळीत अंजनाचे काम करेल एवढं नक्की.

एकूण बारा कविता आणि त्यासुद्धा विश्लेषणात्मक अर्थ सांगून लिहीलेल्या आहेत.लेकीचं महत्त्व सांगणार्या बापाची तळमळ पाहणा-या कविता वाचून मनाला खूप समाधान वाटले.

जिकडे तिकडे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण वाढलेलं असताना तुमच्या कवितांमुळे नक्कीच फरक पडेल आणि सासूरवासही थांबेल असं वाटतं.

आईच्या मात्रुत्वाची महती समजणं,तिचा कोंडमारा समजणं हे वाटतं तितकं सोपं नसतंच! पण.... तुम्ही ते सरळसोट पणे मांडलेले आहे.यातून तुमच्या मात्रुप्रेमाची भक्ती दिसते.

तुमच्या लेखणीतून उतरलेल्या परखडपणाला माझा मनापासून सलाम.असेच लेखन करत रहा आणि समाज हिताचे साहित्य निर्माण करा.याच सदिच्छा देऊन मी आपली रजा घेते.

हे साहित्य मला डॉक्टर सुनिल दादा पाटील यांनी देऊन माझे मनोबल वाढविले तर याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद.खूप प्रगती होवो हीच सदिच्छा.

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती



भावविभोरी,लय माझ्या अंतरीची

           भाव विभोरी,लय माझ्या अंतरीची

                      डॉ.   स्मिता गिरी

डॉ.स्मिता गिरी मॅडम तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.खूप अनुभव संपन्न अशा कविता आहेत ज्या मनाला सहज स्पर्शून जातात.आणि भाव विभोरी या पहिल्याच कवितेतून अंतरीची लय मांडताना निसर्ग अनुभव, नाती सांभाळताना होणारी कसरत खूप स्पष्ट शब्दांतून मांडून वाचकांच्या मनाचा ठाव घेतला आहात.

व्याभिचारी व्यक्ती ही जवळचीच असते आणि अत्याचारीत पिडीता आपले मनातील दू:ख सांगताना....का मी मुलगी झाले?हा प्रश्न विचारून मन हेलावून सोडत आहे.

खचून न जाता धीराने जगण्यासाठी कवयित्रीने जीवनाचा उत्सव व्हावे या कवितेतून सकारात्मक विचारांचा प्रसार करत आहे.

चूक की बरोबर या कवितेला वाचताना अक्षरशः असं वाटतं की, आताच्या परिस्थितीला साजेशी कविता केलेली आहे असे वाटते.खूपच आवडली ही कविता.

समाजाची रांड,तो आणि ती, जगणं,डोईवरचा भारा अशा एकापेक्षा एक सरस कविता आहेत.वाचताना भान हरपून जातं.मैत्री मनाची,माणसांचे मर्म, शेतकरी राजा लाखोंचा पोशिंदा,मंत्रमहान,गद्दारी निसर्गाशी अशा खूप छान डोळ्यात अंजन घालणार्या कविता केलेल्या आहेत.rudhayach ह्रदयाची चाळणी या कवितेमध्ये एक सुचवावसं वाटतं ते असं की,आपल्याच रक्त मांणसांचे गोळे हे याऐवजी आपल्याच रक्तामांसाचे गोळे हे असं असतं तरी खूप छान उद्बबोधक झालं असतं.

एकूण सर्वच कविता खूप छान आहेत.कोणत्याही परिस्थितीत ठाम राहायला शिकवणार्या आहेत असे वाटते.

तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.आणि कविता सागर प्रकाशन चे डॉक्टर सुनिल दादा पाटील यांनी हे साहित्य माझ्यासाठी पाठवले होते म्हणून त्यांचेही खूप खूप आभार.

              अशीच आनंददायी साथ लाभावी या सदिच्छा.

                                                      आपलीच,. 

                                           सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

   

                                   

Friday, September 11, 2020

जागतिक प्रथमोपचार दिन

                       जागतिक प्रथमोपचार दिन

          जनसेवा हीच ईश्वर सेवा मी मानली

प्रथमोपचाराने रूग्णांना मदत केली

नाही मोठं पद तरी सेवाभाव मी जपून राहिली

येणार्यांच्या वेदनेवर हळूवार फुंकर घातली

कसं सांगू मी जीवनरीत आज अनुभवली

पुढच्यास ठेस मागचा शहाणा ही गत नाही उरली

प्रत्येकाने फक्त आपली कातडी होती बचावली

तरीही.... जनसेवा हीच ईश्वर सेवा मी मानली

कुणी हसलं कुणी चिडवलं कुणी टिंगल टवाळी सुध्दा केली

मी मदतनीस, मी शिपाई शिक्षणाचा अर्थ जपली

नको मला मानपान, नको उणेदूणे फक्त माणुसकी जपली

आज दिन हा प्रथमोपचाराचा म्हणून लेखणी उठली

कित्येक मनिषांच्या भावना तिने, या निमित्ताने साकारली.

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

सर्वांना जागतिक प्रथमोपचार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Thursday, September 10, 2020

माझी म्हातारी

 माझी म्हातारी म्हणे लहानी असल्यापासन राबतीय

आईच्या घरप्रपंचात पोरासारखी वागतीय

बहिणींना माहेर  करुन मानानं सासरी धाडतीय 

 माझी म्हातारी म्हणे लहानी असल्यापासन राबतीय //१// 

 लग्नानं सूख मिळंल असं तिची आई सांगतीय 

म्हणून....  म्हातारीनंलग्न करुन बघावं म्हणून   संसार थाटतीय 

नवर्याचं  बळग मोठं त्यात म्हातारी थोरली सून  झालीय 

इटकी पिटकी   दीर जणू मेंढराचं लेंढार   बघतीय  

दिवस रात्र   राबून  तिनं सार्यांना होत सांभाळलं 

लग्न करून प्रपंचा  सुध्दा दिला तिनं थाटून  

आता  कुठं  पोरंसुध्दा हातातोंडाला आली व्हती 

एका पाठी दुसर्याची ही सून  घरात नांदत व्हती 

 म्हातारीला पण बाळगोपाळांची आशा  लागून  राहती

 पाच मुलांत बसताना तिला तहान भूक लागत नव्हती 

 आता म्हातारीनं विसावावं एवढीच माफक इच्छा व्हती 

पण... तिच्या हाडांना बसून राहण्याची सवय नव्हती 

आजही आमची म्हातारी तरण्यांना मागे पाडत व्हती 

तिच्या कष्टापुढे हत्तीचं बळ नमवत व्हती 

अशी म्हातारी आमची आज गपचिप बसून व्हती 

कोरोनाने हरवण्याचं ठरवलं तरी म्हातारी जिंकली व्हती 

कारण..... दोन रुपयांसाठी तिनं विहीर सुध्दाखणली व्हती 

तिच्या कष.टाला खरंच तोड नव्हती म्हातारी आमची

सर्वांसाठी खरंच खूप राबली व्हती 

खरंच खूप राबली व्हती .          

सौ मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती


Wednesday, September 9, 2020

घरधनीनींचं मन

                                 घरधनीनींचं मन

    रोजंदारीचं काम हुतं माझं

कोरोना मडं बसवलं तुझं

काळतोंड्या तुला घर दिसलं माझं

आणि घरधन्याला बाधलास केलास तुझं

कुंकू माझं बळकट म्हणून तोंड काळं केलं तुझं

हाताचं गेलं काम तरी डोक्यात ईचाराचं काहूर तुझं

कधी जाशील या दुनियेतनं काय वंगाळ रूपडं तुझं

धन्याला बघून दिवस सारते मडं बसवलं तुझं

इवल्या इवल्या शब्दांनी आधाराची सांगड घालतो

हळूच सांगून हिताच्या गोष्टी तो माझी समजूत काढतो

नशीब बलवत्तर म्हणून धन्याला नजरेसमोर बघतो

काळतोंड्या कधी तुझा नायनाट होतो

कधी तुझा नायनाट होतो

           सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती

Sunday, September 6, 2020

कोविड १९ आजाराचा शिक्षण व्यवस्थेवर झालेला परिणाम

                      कोविड १९आजाराचा शिक्षण व्यवस्थेवर झालेला परिणाम


        नमस्कार मंडळी.आज शिक्षण व्यवस्थेवर झालेला परिणाम हा कशाप्रकारे होतोय हे सांगण्याचा माझा अल्पसा प्रयत्न.

कोविड १९ अंगावर शहारे आणणारा आणि भितीने थरकाप उडवणारा रोग आहे.जणू माणसापासून माणूस तोडत आहे.कुटूंबापासून वेगळं करत आहे.स्पर्शातून येणारा हा रोग निसर्गाचा ओक्सिजनसुध्दा मनमुराद घेऊ नये म्हणून बंद दरवाज्याची सोय करून ठेवली आहे.जवळ जवळ सहा/ सात महिने झाले तरी हा रोग संपूर्ण जगात थैमान घालत आहे.

               रोजंदारीवर काम करणारे कितीतरी कुटुंब उपासमारीने आणि आर्थिक अडचणींने जीवन जगत आहेत.त्यातच आता सरकारने आदेश काढला आहे की, मुलांना ऑनलाईन  शिक्षण द्या असा शिक्षकांना आदेश दिला आहे.

              आता आली का पंचाईत? तसं बघायला गेलं तर असतो ओ सर्वांकडे स्मार्टफोन!पण मुलं खरंच फक्त शिक्षणासाठीच त्याचा वापर करतील का?गेम कॉमेडी आणि कार्टून मध्ये गुंतलेली असतात.आणि आई-वडिलांना मात्र अभ्यास करतोय म्हणून सांगतात.शिकलेले आई-वडील असतील तर ते लक्ष देतातही.पण....ज्यांनी कामात गुंतवून घेतलेलं असते त्यांचे काय?

म्हणजे पर्यायाने मुलं खोटं बोलायला शिकतात.आणि मग उद्याचे भविष्य खोट्याच्या आधारावर बघायचं का?

आता दुसरा मुद्दा असा की,ज्या घरात रोजंदारीला गेल्याशिवाय चूलही पेटत नाही आणि आपल्या सारखं आपली मुलं अडाणी राहायला नकोत म्हणून जीवाचा आटापिटा करून खाजगी शाळेत तर कुणी सरकारी शाळेत मुलांना दाखल केलंय.पण अंगठा बहाद्दर असल्यामुळे मुलांचा अभ्यास घेता येत नाही.हातातोंडाशी गाठ घालताना नाकिन ऊ यैतय.तिथं महागडा फोन घेऊन मुलांना ऑनलाईन शिक्षण कसं देणार? आणि मग शिकायची इच्छा असूनही ती बालकं वंचित राहणार का?हा ही मोठा प्रश्नच असतो.

     को्विड या आजाराने तर माणसं माणसांपासून दूर चाललीत.कुणी साधी चौकशीही करत नाहीत इतकं भयंकर वातावरण असताना आपले शिक्षक आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्याच्या हेतूने सर्व्हेला बाहेर पडलेत.जेव्हा ते सर्व्हे करून येतात तेव्हा कुणी त्यांना विचारलंच की,सर/मॅडम इतकी रिस्क घेऊन तुम्ही हे करताय याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यावर ते शिक्षक जे उत्तर देतात ना?ते ऐकून पोटात कालवाकालव झाल्यावाचून राहत नाही.

काही शिक्षक म्हणतात, मुलांच्या चिवचिवाटावाचून वंचित राहिलेल्या भग्न शाळा बघून डोळ्यात पाणी येतं.जिथं मुलांच्या घोळक्यातून क्षणभर उसंत मिळायची नाही.ती वर्गातली खोली खायला उठते.आमची मुलं कधी येतील म्हणून खडू आणि फळा जणू विस्फारून डोळे दरवाजाकडे नजर लावून बसतात.अशावेळी जेव्हा आम्ही भागांमध्ये सर्व्हेला जातो ना तेव्हा निदान पाच/सहा चिमुरडी आम्हांला बघून आनंदाने जवळ येतात.माहिती घेतात आणि सर..... कधी होणार शाळा सुरू? असं विचारतात.तेव्हा भरल्या डोळ्यांनी आम्ही त्यांना समजावतो.कधी कधी तर त्यांच्या घरी जाऊन त्यांना अभ्यास सांगतो.दुसर्यादिवशी पुन्हा भेट देऊन दिलेला अभ्यास केलाय का हे बघतो.पण; हे सर्वच मुलांच्या बाबतीत होत नसतं.याचीही खंत असतेच 

कोविडने श्रीमंत कुटूंबाला घरच्या घरी सर्व साधने उपलब्ध असल्याने सर्व सुविधा मिळाल्या.पण मग या गरीब मुलांनी काय करावे? त्यांच्या पालकांच्या चेहर्यावरचे अपराधी भाव पाहिले की वाटतं,हा कोविड माणसाला माणसातून उठवण्यासाठी तर आला नसेल आणि आँनलाईन शिकविलेलं किती जणांच्या लक्षात राहतय; कारण,रोजची घोकंपट्टी घेऊन सुध्दा मुलं विसरायचीत आणि डिजिटल इंडिया च्या नावाखाली कुठं चाललंय मुलांचं शिक्षण? कसं घडेल उद्याची पिढी? आणि तरीही स्वच्छता होइल का प्रत्येक मनातल्या विषाणूंची की,लागण होईल सर्वाच्याच मनाला कोरोनाची......

सम्रुध्द भारतासाठी कशी शिकतील मुलं? भरमसाठ डोनेशन आणि फी च्या नावाखाली खाजगी क्लासेसच्या नावाखाली किती आर्थिक पिळवणूक होईल.मुलं शाळेतच वर्गात बसून शिकली, शिक्षकांना फेस टू फेस शंका निरसन करून घेऊ लागली तरच शिकतील नाहीतर कधी रेंज नाही कधी नेटवर्क नाही तर कधी लो ब्याटरी होऊन सारंच मुसळ केरात गेल्यासारखे होईल आणि याहून मोठं आर्थिक संकट कुठलं असेल की आताची मुलं उद्याची स्वप्न आहेत आणि कोविडने सर्वांना घराघरांत जखडून ठेवून भविष्यच अंधारमय करू पाहतय हे कोविड १९ ! 

                          सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती





Saturday, August 29, 2020

असहाय्यता कर्तव्य निभावताना

           असहाय्यता कर्तव्य निभावताना


घरची वडिलधारी व्यक्ती आधार असतो कुटूंबाचा

पण कोरोना आला आणि विभक्त ठेवला पसारा बापाचा

एकत्र कुटुंब असुनही तो अनुभव घेतो एकटेपणाचा

किती मी लाचार झालोय उपचार करताना बापाचा

बापाला मी दुरुन विचारतो, औषधपाणी घेतलंय का

आईला मी सांगून बघतो वेळेवर बाप जेवतोय का

बापाचा पडलेला चेहरा......पोटात कालवाकालव करतोय

असा कसा हा कोरोना भरल्या घरात बापाला एकटा ठेवतोय

बाप पोटभर जेवतोय काय याचाच विचार डोक्यात असतोय

बापाचं असणं महत्त्वाचं म्हणून सारा आटापिटा करतोय

चिल्लीपिल्ली उपाशी राहू नयेत म्हणून मी राबराब राबतोय

घरी आल्यावर समाधानी चेहरे मनात साठवून ठेवतोय

कोरोना......तू नाती, माणसं सारंच दूर का रे करतोय

कसा घालू ताळमेळ याच विचारात मनिषा जगतोय

याच विचारात मनिषा जगतोय.

         सौ.मनीषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Friday, August 28, 2020

आज तिचा वाढदिवस

                      आज तिचा वाढदिवस


होय! आज मनापासून व्यक्त व्हावंसं वाटतं कारण, अगदी नकळत्या वयात जिच्यात जीव गुंतला होता त्या माझ्या प्रिय सखीचा आज वाढदिवस आहे.तसा तिचा माझा संपर्क माझ्या लग्नानंतर कमीच झाला होता.पण...मनाने मात्र ती नेहमीच माझ्या सोबत आहे.ती शिकून नोकरीला लागली.जणू,नव्या पिढीवर संस्कारांचे मोती पेरतीय.आणि स्वावलंबी बनण्याचा अम्रुत वसा देतीय.संसारवेलीवर उमललेल्या श्री वर ती व्यवहार कुशल कसं जगायचं याचे संस्कार देतीय.जीव लावून झूरत बसण्यापेक्षा शिकून स्वावलंबी होण्याला महत्व देतीय.तिच्या लाघवी बोलण्याने ती सर्वांना जिंकत असेल यात तीळमात्र शंका नाही.पण........

ती मैत्रीणींशी बोलायचा कंटाळा का करते हेच मला समजत नाही, किंवा कदाचित असंही असेल की तिला माझ्यासारख्या निकामी मैत्रीणी सोबत बोलताना कसनुसं वाटत असेल.पण मन सांगतं की नाही माझी सखी असा विचार नाही करणार.,...,

तिला तिच्या बरोबरीच्या मैत्रिणी तर आवडत नसतील? जाऊ दे, उगीच मनात विचारांचे काहूर मांडण्यापेक्षा एक गोष्ट महत्त्वाची वाटते ती म्हणजे......... आयुष्याच्या मध्यावर पोचून सुध्दा तिच्यासाठीची ओढ कणभरही कमी झालेली नाही.

  आजही ती तेवढीच हक्काची वाटते.आजही ती भासात,श्वासात सोबतीला असते.आजही आपण तिच्याशी मनसोक्त गप्पा मारत असतो.तेही मनातल्या मनात! तिची आठवण सुद्धा एक प्रकारचं समाधान असते.तिच्यासाठी काय करू अन् काय नको असं वाटतं.तरीही.....मनाच्या गाभाऱ्यात ती रानी बनून राज्य करते माझ्या मनावर आणि तरीही आसूसलेली माझी नजर बघुन माझ्या सावल्या ( माझ्या मुली) मला चिडवतात की,तू आज कित्ती खूश आहेस ग! 😍 आणि त्या खळखळून हसतात आणि या हास्याचे निमित्त असणारी ती आतून खूप सुखावते.

           माहीत नाही तिची माझी भेट होईल की नाही, माहीत नाही तिला माझ्या भावना कळतील की नाही आणि ती मला समजून घेईल की नाही, पण.... खरं सांगायचं तर तिच्या असण्याचा भासच माझ्या जगण्याला उभारी देतो हे ही नसे थोडके नाही का?....

               शेवटी मैत्री म्हणजे असतं तरी काय.......एक निखळ हास्य, एक सुखदू:खाचा संवाद, एक मैत्रीचा हात जो थकल्या वेळी आधार देणारा, डोळ्यातील आसवं पुसणारा आणि पुन्हा नव्या उमेदीने प्रवास सुरू करणारा आशेचा हात, दुसरं काय? 

                ती आजही तशीच हसते.तिचे ते भावविभोरी डोळे पाहून आजही दिल खल्लास होतो.आजही वाटतं, ती तशीच धावत येईल.मला आलिंगन देऊन पुन्हा एकदा मला ध्येयवेडी झेप घेण्याचं बळ देईल.माझी सखी फक्त माझ्यासाठी पुन्हा एकदा नक्की येईल................ होय ना!

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती

Tuesday, August 25, 2020

सच्चा सेवाभावी डॉक्टर

                   

           👩‍⚕️   सच्चा सेवाभावी डॉक्टर👩‍⚕️


 खरंतर वैद्यकीय क्षेत्र करियर म्हणून निवडताना मनात सेवाभावी  वृत्ती असावी लागते  . खूप सारा  संयम असावा लागतो, आणि कष्ट मेहनत खूप करावी लागते.  काहीजण फक्त पैसा आणि प्रतिष्ठा मिळावी . यासाठी  या क्षेत्रात येतात. पण डॉ. कुलभूषण चौगुले . एक  अभ्यासू आणि चिकीत्सक हुशार मनमिळाऊ स्वभावाने.  धरणगुत्ती सारख्या खेड्या गावात स्वत:च छोटंसं उपचार  केंद्र काढून मनोभावे सेवा बजावत आहेत.


       कधीही मदत मागा  हे  डॉक्टर तत्पर असतात.  फी चा विचार नंतर करतील पण रोगी बरा व्हावा. यासाठी धडपडत राहतील. अचूक निदान करून अनेकांचे जीव वाचवलेत. कितीदा तरी स्वत: च्या उपचारापलिकडे  पाहून दुसरीकडे रेफर   करून जीवदान दिले आहे.   रुग्णांचा   आर्थिक  छळवाद होऊ नये , म्हणून  शिरोळ सारख्या ठिकाणी मित्रांसोबत  शतायुषी नावाचे अद्ययावत यंत्रसामग्री असणारे भव्य हॉस्पिटल उभारून  रूग्णसेवा बजावत आहेत. खरंतर मला  सांगायला खूप आनंद होतो की दवाखान्याचे नाव शतायुष ___  म्हणजे  शत 100  वर्ष आयुष्य किती समर्पक नाव जणू  इथं जाणार प्रत्येक  रूग्ण 100वर्ष जगावा ही प्रामाणिक अपेक्षा . आणि डॉ नावाप्रमाणेच भूषण आहेत. यात शंकाच नाही . आज मनापासून  आभार मानावे वाटले.  यासाठीच हा  शब्द प्रपंच . तुमच्या  पुढील  वाटचालीस आभाळाभर सदिच्छा.  अशीच  मनिषाची इच्छा.... अशीच मनिषाची इच्छा.....

         सौ. मनिषा पिंटू वराळे. धरणगुत्ती.

Sunday, August 23, 2020

एक कर्ता पुरुष

                             एक कर्ता पुरुष

मग तो आई वडिलांचा मुलगा असो किंवा बायकोचा नवरा असो किंवा मूलांचा बाप असो तो कुटुंबासाठी तो करता पुरुष असतो.  ऊन वारा पाऊस सारं काही सोसतो. काम असू दे किंवा नसू दे तो घरच्यांना दोन वेळचे खाऊ घालत यावे, म्हणून काहीही करत असतो. पण त्याला समजून मात्र कुणीच घेत नसते.

    कितीही बंधनं आली कुचंबणा झाली . तरी तो आई बापाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतो. तरीही तो कमीच पडतो आणि शिवाय जिव्हारी  बोलण्याच्या त्यांच्या वाट्याला काहीच येत नसतं.


        तीच अवस्था एक नवरा म्हणून जगताना सुध्दा होत असते.  बायकोच्या अपेक्षा पुरवता येत नाही म्हणून आलेलं खजीलपणा . बायकोनं हसतमूखाने स्वागत करावं तीनं प्रसन्न रहावं . ही अपेक्षा असतानाच तिची होणारी कुचंबणा समजून ही न समजल्यासारखं वागणं हे वाटतं तितकं सोपं नसतं. अशा वेळी गप्प राहण्यापलिकडे  पर्याय च नसतो. ती थोडं फार    जाणून सहकार्य करते. एवढीच समाधानाची बाब  असते.


  आणि मूलांचं म्हणावं तर किती विचार करावा. त्यांच्या हट्टाला    मर्यादा नसतेच पण समजूदारपणाही नसतो.  तेव्हा  हतबल झालेला बाप जास्तीत जास्त वेळ घराबाहेर च राहत असतो.  मुलांच्या  आवडीनिवडी जपत असताना  त्यांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि हट्टवादी पणा  यावर  काहीच  तर पर्याय नसतो.  कधी कधी तर एक एक वस्तू मायेनी आणून सजवलेली असते आणि मूलं रागात तिचा चक्काचूर करतात.  तेव्हा डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही.


        कर्म कर फल की इच्छा न कर या उक्तीप्रमाणे  ऊठल्यापासून  रात्री झोपेपर्यंत फक्त कामाचं  ओझं  पाठीवर घेऊन घूसमटणार्या मनाला  सावरत  प्रत्येकाला समाधान आणि आनंद   वाटण्याच्या नादात   स्वत:  मात्र तीळ तीळ तुटत असतो. आणि त्यांच्या या वेदनेवर हळूवार फुंकर सुध्दा  मारता येऊ नये . या हतबल तेने आतल्या आत   तुटणारी त्याची अर्धांगिनी कुणालाच समजत नसते . 


 शेवटी  काय जीवन जितकं सुंदर आहे. तितकंच कठोर  आणि  कठीण परिस्थितीत परिक्षा घेणारे सुध्दा आहे. म्हणून अशा कर्त्या पुरुषाला माझा मनापासून सलाम..... तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात...

सौ . मनिषा वराळे धरणगुत्ती . 


    





Friday, August 21, 2020

निसर्ग

                       🌄🌲🌲     निसर्ग 🌄🌲🌲


                  फूल पानं वेलींनी बहरलेली

     कोवळी ही सृष्टी आनंदाने भरलेली


         हिरवीगार शालू नेसून राहिलेली

    गर्व शांत हवेच्या गारव्याने शहारलेली

  खरं तर ही किमया निसर्गानेच केलेली


                   कारण... झाडाविना पाऊस नाही वेलीविना फूल

  स्वप्नांचा रमला सजावा जशी नववधू सजावी


 निसर्गाच्या सोबतीने जीवनात सूखं यावी

 अशी किमया फक्त निसर्गानेच करावी.

 सौ. मनिषा वराळे धरणगुत्ती.


लेक वाचवा

 

                 लेक वाचवा

वंशाला दिवा हवा म्हणून पणतीच्या का करावा हेवा

उजेडासाठी तर पणतीचा उपयोग व्हावा

       मग का तिचा गर्भ पोटातच खुडावा

      ती होती म्हणून आजी मिळाली

स्री होती म्हणूनच आईपण अनुभवली


            ती होती म्हणून बहिणीची माया मिळाली

            ती होती म्हणूनच जीवन संगिनी झाली

 ती होती म्हणून लेक लाडकी झाली

 ती होती  ......... केवळ तीच होती म्हणून

                  मायेची सारीच नाती मिळाली

                    मग ही दुनिया का उलटी झाली

    खरंच सांगा ओरडून या जगाला

देश वाचवायचा असेल तर मुलीला

 जन्माला घाला मुलीला..... जन्माला घाला.

 सौ. मनिषा वराळे धरणगुत्ती




   

खरा समाज सेवक

    

              खरा समाज सेवक

            

  खोट्या भूल थापा देऊन

निवडून येऊन संसदेत जाऊन

                   गाडी बंगला ऐष आरामात जगून

              पाच वर्षानीच येतो मतदारांना सलाम करून


           अशा स्वार्थी  नेत्यांना जावा आता विसरून

                       कारण......‌‌‌......

 समाजाला आज खर्या समाज सुधारकांची

गरज आहे सूधारण्याला

साधी राहणी उच्च विचारसरणी रूजवणार्या माणसाची


              गरिबीचे  चटके भोगलेल्या मनाला

           असा ओळखा खरा समाज सेवक

      हे ओरडून सांगू या दुनियेला


सौ. मनिषा वराळे धरणगुत्ती

गरज आ 

आजची गरज

     

                         आजची गरज


    महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला

         दिलासा हवा आज मूक्त जगण्याला

        नेते  येतात आणि जातात प्रचार करून

          पण गरिबांचे कोण घेतो ऐकून


        आज गरज आहे एका सुधारकाची समाजाला 

    जो सार्यांचे हित पाहिल अशी व्यवस्था करण्याला

          वृध्दाश्रमे आणि पाळणाघरे बंद पडायला


      गरज आहे  आजी-आजोबांची आणि आई बाबांच्या   आशीर्वादाची

एकत्र कुटुंब पद्धत अवलंबण्याची

 

सौ. मनीषा वराळे धरणगुत्ती


Thursday, August 20, 2020

प्रिय प्रिन्स

                    🤴    प्रिय प्रिन्स 🤴


खूप खूप धन्यवाद बाळा.अगदी योग्य वेळी तुझा संदेश आणि पुस्तक मिळाली.तुम्ही नेहमीच माझे मनोबल वाढवत आलात.आजच्या घडीला मानसिक आधार मिळणे खूप गरजेचे असताना माझ्या गुरूने माझ्यासाठी योजलेले गिफ्ट खरंच अभिमानास्पद आहे.

                  तुम्ही नेहमीच मला प्रोत्साहीत करत आलात.आज खरंच प्रिन्सचे लेटर वाचून अश्रू अनावर झाले होते.या लहान मुलांत देव वसतो याचा प्रत्यय आला.


                       माझ्यासाठी गुरू माऊली आणि त्यांचे कुटुंबीय म्हणजे माझे बंधू डॉक्टर सुनिल दादा नेहमीच विविध उपक्रम करत असतात.एक ज्ञानाचा सागर आणि सर्व गरजूंचा मार्गदर्शक असणं हे वाटतं तितकं सोपं नाही.

                     सर्वांच्या मते मी कोविड योध्दा असले तरी आज, माझ्या कामाला थोडंसं गालबोट लागलेच आहे.कारण,माझे सासरे काहीही लक्षणे नसताना कोरोना पेशंट ठरले.आणि गावकऱ्यांनी सामाजिक बांधिलकी विसरून खोचक प्रश्न करून हैराण केले आणि मी कसली योध्दा?

                     खरंतर आजारापेक्षा मानसिक त्रासाने हैराण झालेलं माझं कुटुंब एकमेकांना समजावत राहत होतो.आणि यावर आधाराची बाब,प्लस पॉइंट म्हणजे बाळ प्रिन्स तुझं पत्र होय.खरंच खूप मोठा हो.सर्वांचा आशिर्वाद घे आणि दुटप्पी स्वभावाच्या माणसांपासून दूर रहा,या सदिच्छा.

सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती





Thursday, August 13, 2020

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझी लाडाची चिमणी लाडाकोडात वाढली

स्वप्ने ध्येयवेडी तिने होती ग पाहिली

एका हसर्या घरात ती लग्न होऊनिया गेली

सर्वांची लाडकी ती सून नव्हे लेक झाली

माझी लाडकी बहिणाबाई लेकरांची आई झाली

मनकवडा ग साथी इच्छा पूर्ण केली

माया ममता जिव्हाळा आपुलकी सुध्दा मिळाली

आई,आजी आई-बाबा बहिणभाऊ नात्यांत गुंफली

असा मायेचा पदर छोट्या आईने घातली

तिची सखी बनूनिया मोठी आई सोबत राहीली

दोन दीर दोन नणंदा बहिणभाऊ ही लाभली

तेज जीतच्या रूपाने तिचे मात्रुत्व खुलवली

आज शुभेच्छा देताना हर्षभराने मी लिहीली

वाढदिवस लग्नाचा तुमच्या मी नाही विसरली

               सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती

आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा कमेंट करा

Wednesday, August 12, 2020

एक सल मनातली

                       एक सल मनातली

पुन्हा मुलगी झाली म्हणून मन नाराज झालं

मारून कसं टाकू म्हणून दुसऱ्याला सांभाळायला दिलं

आईच्या मायेला पोरकी झालेली पोर आसवांना आधार बनवलं

कुणी रागराग केला, कुणी फटकारलं पण समजून नाही घेतलं

कोरडा घास आसवासवे पोटात ढकललं

हसणार्यासोबत हसलं आणि एकांतात होतं रडलं

बालपणी सखी लाभली स्वप्न जगायचं सापडलं

तरुणपणी ध्येयवेड्या मैत्रीला हरवून बसलं

जीवाला जीव देणारा जोडीदार मिळावा ही आशा मनात धरलं

पण आशा निराशेचं पाठशिवणीचा खेळ असं भासलं

शेवटी आता एकच मग ठरवलं

कर्तव्य करत करत जगावं एवढंच हातात उरलं

जे खदखदत होतं मनात ते मनिषानं जाणलं

अलगद रितं करून डोळं मन मोकळं झालं

                सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती


Tuesday, August 4, 2020

कर्तव्य

                             कर्तव्य


जिथं नसते माया आणि आपुलकी ती नाती कमजोर असतात
जिथं कर्तव्य पार पाडावे लागते ती खरी जबाबदारी असते
कुणी रूसलं कुणी राग धरलं कुणी चिडलं तरी ती गप्प असते
कर्तव्य पार पाडावे एवढीच अपेक्षा सर्वांची असते
किती सोसावा मनस्ताप किती गिळावा आवंढा पण चुपचाप ती सोसत असतै
अशी भरडली जाते ती पण..... तरीसुद्धा ती हसत असते
कुणी चेष्टा करते कुणी खेचून ठेवते तरीही ती जगत असते
जोडीदाराच्या भरवश्यावर उद्याची स्वप्न बघत असते
कधी हताश उदास होऊन थकून ती गेलेली असते
सर्वांच्या सुखासाठी ती दिवस-रात्र जगत असते.
                           सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती

Monday, August 3, 2020

रक्षाबंधन नातं बहिणभावाचं

                      भाऊ



चिमुकल्या पावलांनी आलास तू जीवनात भाऊराया
आम्हां बहिणींना लावलीस निरागस माया
कसं सांगू तुला तुच आहेस आधार द्याया
किती प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीची देतोस छाया
सुख तुझ्या पावलांनी येणार ही आमची वेडी माया
सुख तुला मिळो तुझं दूख मला मिळो ही भाबडी आमची माया
                सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती

Thursday, July 30, 2020

आई तुझं चुकतंय ग

                       आई तुझं चुकतंय ग




आई तू सर्वांना जपतेस आवडीनिवडी जपत हळूवार सारं करतेस
म्हणून असेल कदाचित पण आई तू चुकतेस
तू सतत सर्वांचा विचार करतेस, गगनभेदी स्वप्न बघतेस
म्हणून आई तू खूपच चुकतेस
आमच्या मागण्यांचे तू लगेच कबूल करतेस कधी कधी काहीही तडजोड करतेस तरीही......
आई तू चुकतेस
तू हळूच हाक देतेस आणि आम्ही तुझ्यावर खेकसतो
तेव्हा चटकन तुझ्या डोळ्यांत पाणी येतं तरीही तू गप्पच बसतेस
आणि इथेच आई तू चुकतेस
नको करू आता इतका विचार की, तुलाच याचा त्रास होईल
आम्ही आळशीच कामचुकार वागणार कारण......
आपल्या परिस्थितीत तू आणि बाबांनी खूप दिलंय
तरीसुद्धा आम्ही याची जाणीवही नाही ठेवणार
आणि तू कुढत कुढत जगत राहणार
त्यापेक्षा सोडून दे आम्हाला आमच्या जैसे थे वागण्यावर
तुझं यात कुठं काय बिघडतंय....पण.....
आई तुझं चुकतंय, तुझं चुकतंय
                        सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती

Wednesday, July 29, 2020

दोस्ती

                                            दोस्ती



खरंच मनापासून तुला विचारावसं वाटतं, आजही तितकीच सुंदर आहे का ग आपली शाळा! जिथे आपण बसायचो ती शाळेपुढची मोठाली झाडं,ती पांढरी शुभ्र फुलांची बरसात आजही तशीच आहे काय गं.जिथं मी आणि माझी सखी तासनतास गप्पा मारत बसायचे तो शाळेचा परिसर तितकाच विलोभनीय आहे की बदललंय सारं.........

आजही तितकीच ओढ आहे काय मुलांना शिक्षण घेण्याची,मोठमोठी स्वप्नं बघण्याची.आजही तिला माझी आठवण येत असेल की ती प्रवाहासोबत पुढे गेलीय.
आता तू माहेरी जाशील ना तेव्हा बघ हं थोडा वेळ काढून, माझ्या हातात तर ते अनुभव घेणं उरलं नाही पण तू नक्कीच हसशील का जर तिनेही जुन्या आठवणी जाग्या केल्या तर?

किती अतूट नातं होतं आमचं कुणाची तरी नजर लागली होती आणि मी फक्त तिच्या आभासी जगात जगतीय.पण......


ठिक आहे मी जरा जास्तच वाहत गेलो.तुला आणि तुझ्या आपल्या जीवलग सखींना मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अगोदरच देत आहे ना कारण मला तुझं म्हणजे आपलं बालपण.....आठवता यावं म्हणून बरं का.काळजी घ्या

ताई

                    ताई


ताई, तुझ्या हसर्या प्रसन्न चेहऱ्याला पाहून समाधान वाटलं
तू खूप मोठी शिक्षीका पण तुझा शिष्टाचार या मनाला भावला
तू खडतर प्रवासातनं हे यश आहे ग मिळवलं
सर्वांची काळजी आणि जबाबदारीनं मन तूझं ग कोमेजलं
तू हळवी तितकीच हसरी सारं काही तू हसत हसत पार पाडलं
शिक्षणाची धुरा घेऊन तू सावित्रीची मशाल तेवत ठेवलं
येरे गबाळे येतात तुझ्यावर कुरघोडी करतात, हे ही तुझ्या नजरेतून मी वाचलं
पण... सहनशक्तीची माता तू त्यातही समाधानच मानलं
कितीही झाला त्रास तरी तू कूणाला बोलून नाही दाखवलं
बोलक्या नजरेतले आसू तुझ्या.., माझ्यापासून नाही ग लपलं
असं म्हणतात....मोठी बहीण आईसम असते ते तू पुरेपूर निभावलं
अकाली आलेलं पोरकेपण तू मनातच दाबून ठेवलं
आठवणीतले आई-बाबा तुझ्या प्रत्येक बोलण्यातून जाणवलं
कशी पेलतेस ही धीराची धुरा मला आजवर नाही कळलं
अशी ज्ञानगंगा पोचवतेस जिथं शिक्षणाचं महत्त्व तू सांगितलं
तुझ्याच क्रुपाद्रुष्टीने वस्तीवर साक्षरतेचे सूर उमटलं
साक्षरतेचे सूर उमटलं.......
                               सौ.मनीषा वराळे धरणगुत्ती

झरा मायेचा

                            झरा मायेचा



एका आईचं कौतुक मी कितीदा करावं
बाईपण(शिक्षिका)मिरवताना आईपण विसरावं
तिच्या लाडाचं लेकरू एकुलतं एक परी
त्याला सोडूनिया घरी तिने पुढेच चालावं
दिन दुबळ्या कष्टकर्यांना शहाणपण द्यावं
असं वाड्यावस्त्यांवरून तिनं शिक्षण पेरावं
तिच्या अतीव कष्टांचं फळ देवाजीनं द्यावं
सेवाभावी मन तिच्या अंकुरात उतरावं
जनसेवा हीच ईश्वर सेवा गुण त्यानंही टाळावं
असं संस्काराचं बीज त्या लेकरानं अंगिकारावी
किती करू मी कौतुक शब्द अपुरे पडावं
ध्येयवेड्या प्रतिभाचं बीज फुलावं फळावं
यश गगनाला त्याचं अभिमानानं भिडावं
प्रथमेशा तुला या सदिच्छा आणि तळमळ मनाची कळाल
असं गुणी लेकरू ताई तुला भाग्यानं मिळावं
एक मनिषा भाबडी यश शिखरावर पोचावं
हातगुण म्हणू का रे तू़झी जिज्ञासू ही इच्छा
झाला पोर माहा डॉक्टर या पुर्या केल्या तू अपेक्षा
पुर्या केल्या तू अपेक्षा......

सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती

मुली असणं

                               मुली असणं
खरंच मनापासून धन्यवाद निसर्गाच्या निर्मितीसाठी.मुलगी जन्मली की,का नाराज होतात नातेवाईक आई-बाप हेच कळत नाही.तिच्या बाललीला तर मन रमवतातच.पण.....ती लहान असूनही किती संयमी असते.समजदारीने लागते हे लक्षात घेऊन विचार केला पाहिजे.
७/८वर्षाची ती चिमणी किती समजूतीने बोलते हे ऐकून आईच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही.

होय मलाही दोन मुली आहेत आणि त्या माझ्या जीवाभावाच्या मैत्रीणी आहेत.कधी त्या माझ्या मुली नसून आईप्रमाणे वागतात.माझी काळजी घेतात, माझं मन जपतात, खूप प्रेम करतात.

या सर्व गोष्टींचा विचार करून कबुली द्यावीशी वाटली.माझ्या छोटया मुलीचा आज वाढदिवस आहे.आणि माझ्या सोबत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची ती साक्षीदार आहे.मन खूप उदास असतं, तेव्हा नात्याने आपला रंग दाखवला होता.आणि या चिमुकलीनेही तो अनुभव अनुभवला होता.

म्हणून कर्तव्य करत जगताना एकच गोष्ट ठरवली की, मुलांसाठी जगायचं.त्यांच्यासाठी हसायचं आणि त्यांना भरभरून प्रेम देण्याचा प्रयत्न करायचा.कारण, उद्या त्याही लग्न होऊन सासरी जातील पण जाताना इथला आनंद आणि उमेद घेऊन जातील.

त्या शिकून मोठ्या पदावर पोचतील.पण पदापेक्षाही माणुसकी जपतील.माझ्या मुली प्रत्येक गरजवंताला मदत करतील.आणि आईबापाचे संस्कार जपतील.याच आशेवर त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते की,जे जे त्यांना हवे ते ते मिळो नाव,प्रसिध्दी,इज्जत आणि माणुसकी त्यांच्या आयुष्यात हातात हात घालून नांदो याच सदिच्छा.


आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा ही नम्र विनंती.

सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती


स

Monday, July 20, 2020

लोढणा

             लोढणा
गाय म्हैस जास्त लांब जाऊ नये म्हणून त्यांच्या गळ्यात घालून चरायला सोडुन दिले जाते.तर अशा या लोढण्याला बघत मला वाटलं की,गाय म्हैस यांच्या जिवाभावाची सख्खी साथ हा लोढणा असतो.आणि तिथंच माझं चुकलं.
  जेव्हा मला कळालं की,गाय म्हैस लांब जाऊ नये म्हणून बांधलेल्या या लोढण्यामुळे कित्येकदा त्यांना पळता येत नाही आणि मग रक्त बंबाळ होऊन त्या तोंडावर पडतात.तेव्हा मला खूप वाईट वाटलं.
कारण, मी असा लोढणा होते जो सगळ्यांच्या उपयोगी पडत होते.कधीकधी स्वत:ला त्रास करून घेत होते पण पुढच्याला आनंद,मदत करत होते.कुणी माझ्यावर हसायचं, कुणी चिडवायला बघायचं, कुणी नशिबाचा हवाला द्यायचं.आणि मी परिस्थिती, वेळेनुसार सारं समजून उमजून सावरायचं.
आज खरंच खूप छान वाटले की मी ज्यांना ज्यांना जीव लावला आहे त्यांनी व्यवहार पाळला होता आणि कर्तव्य पार पाडली होती.खरंच आज बुध्दी हरली होती आणि नशीब जिंकलं होतं.
असं गरजेचे तरीही गणतीत नसलेलं कर्तव्य पार पाडत आहेत म्हणूनच तर हसत हसत जगावं लागतं शेवटी काय लोढणं आणि काय चपराशी बजावतोय तर काळजी आणि सेवाच ना.मग कुणी काहीही म्हणोत परंतु कर्मण्ये वाधिकारस्ते मां फलेशु कदाचनं........ हेच खरं आहे ना!
               सौ.मनीषा वराळे धरणगुत्ती

Tuesday, July 7, 2020

आपूलकी

         आपूलकी
प्रार्थनेतली खरी शक्ती, विश्वास अन् आपुलकी
असंच उदंड कार्य घडत राहो जग म्हणावे तुम्हांला लकी
फुललेल्या गुलाबाप्रमाणे चेहरा सदैव प्रफूल्लीत
दुसऱ्याला यशस्वी बनवण्यासाठी नेहमीच उत्तेजीत
माझ्याप्रमाणेच कळावी सर्वांना तुमची जगण्याची रीत
शुभेच्छा देण्यासाठी घडले लेखन माझ्याकडून भीतभीत

एक शिक्षिका अशीही

                 एक शिक्षिका अशीही
ईश्वराने दिलंय तुम्हांला एक वरदान
शिक्षक होऊन करत आहात ज्ञानाचे दान
प्रभू करवून घेतोय कार्य असे महान
प्रसन्न चेहऱ्याने वागता सर्वांशी छान
जगण्याच्या संघर्षाचे पेलता तुम्ही आव्हान
गोरगरिबांना समजून सांगता संघर्षाचे गुणगान
दू:खाविन सूख नाही, नाही संघर्षाविन जीवन
तुमच्याशी भेट घडून जीवन झाले पावन

जिजाऊंचा पूत्र_शिवाजी

          जिजाऊंचा पूत्र_शिवाजी
जिजाऊंचा पूत्र झाला दिनांचा कैवारी
शिवाई देवीच्या आशीर्वादाने किमया केली भारी
धन्य झाला तो किल्ला शिवनेरी
दादाजी लाभले गुरू शिवबाला देण्या शिक्षण भारी
असा धाडसी बालक त्याची नजर होती करारी
घेऊन मर्दमराठी मावळे केली अशी स्वारी
मूर्ती छोटी पण किर्ती मोठी गगनापरी
हिंदवी स्वराज्य स्थापले घेऊन गरीबांना बरोबरी
"परस्त्री मातेसमान "मानली होती खरीखुरी
गनिमी काव्याने बेजार करून टाकले वैर्याना तरी
पेठार्यामधून निघाली शंभूसह शिवबाची स्वारी
अशा संस्कारी राजाचा अभिमान वाटावा किती तरी
जय भवानी जय शिवाजी म्हणताच येई जगण्याला उभारी
सळसळता जोश देऊनी गेला राजा जोशभारी
असा जिजाऊंचा पूत्र झाला दिनदुबळ्यांचा कैवारी

Wednesday, June 3, 2020

डाग

 
                                 डाग
    संसाराच्या गाड्यात किती राबलं
   तरी कमीच पडत


   आयुष्याच्या कचाट्यात कितीही जपलं
तरी कमीपणाचं वाटतं

गरीबाकडची संपत्ती जणू त्यांचं सत्वशील
कितीदा आणि कसं समजावावे ते हरविलं


Wednesday, May 27, 2020

ती आली तेव्हा

                    ती आली तेव्हा....

ती आली तेव्हा पहाटेचे चार वाजले होते.अगदी   आवरून गजरा माळून स्कूटीवरून ती आली होती. गजर्यासोबत तिची वेणी अशी घट्ट बिलगली होती. जणू काही दोन जीवाभावाच्या मैत्रीणी बिलगाव्यात.  ती आली तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

  या तिच्या प्रसन्न चेहर्यासाठी तर माझा जीव व्याकूळ होता. किती वर्ष सरली, किती काळ लोटला हे सारं काही त्या क्षणानं विसरायला लावलं होतं. ती गाडीवरून उतरली अन् मला अशी घट्ट मिठी मारली. ज्यासाठी शब्द सुद्धा अपुरेच आहेत.
पण ती......

        पण ती....खूश आहे हे पाहून मीही तिला कवेत घेतलं. तासभर झाला तरी ती मला अन् मी तिला बिलगून उभ्या होतो. जणू काही काळ तिथेच थांबल्यासारखं. मूलीच्या हाकेने आम्ही भानावर आलो. तिने माझं चंद्र मौळी घर आज महालालाही लाजवेल असं केलं होतं.

 तिने स्वयंपाक तिच्याच आवडीने बनवला. आणि ती मला घेऊन जेवायला बसली. ताटातला पहिला घास ती प्रेमाने मला भरवत होती. इतक्या वर्षांची तपश्र्चर्या जणू फळाला आली होती.मी साश्रुनयनांनी घास खात होते.तेव्हा तो घास माझ्यासाठी अमृत होता.

 असं एकमेकींना घास भरवत आम्ही जेवणं उरकून अंगणात बसलो. माझं लिंबाचं झाडसुध्दा पारिजातकासारखं डोलत होतं. तिच्या चेहर्यावरचं समाधान पाहून मी खूप खूश होते. या सार्यात कधी सांजवेळ झाली कळलंच नाही. 

      ती कपडे बदलून गाऊन घालून आली.आणि एकटक माझ्याकडे बघत उभी राहिली. होय!  आजही तिने तोच गळाबंद गाऊन घातला होता. कोणतंही अंगप्रदर्शन होणार नाही असा नियम तिने पाळला होता. मी तिच्याकडे बघतच बसले होते.  तिने हाताला धरून मला फिरून येऊया म्हणून सांगितलं. आणि......

    माळरानाकडे आम्ही फिरायला गेलो. वेळ संध्याकाळची असल्याने तीही मनसोक्त चालत होती.  मला दम लागल्याने मी तिथेच रस्त्याकडेच्या एका दगडावर बसले. तीही माझ्या बाजुला येऊन बसली. माझा हात हातात पकडून मला धीर देऊ लागली.  सारं काही ठिक होईल. असं म्हणत....

           माझ्या खांद्यावर विसावली अन् अचानक ढसाढसा रडू लागली. मला काय करावं तेच सूचेना थोड्या वेळाने ती स्वत:ला  सावरून म्हणाली , माफ कर ग मला मी खूप मोठा अन्याय केलाय तुझ्यावर?  मला काहीच समजत नव्हतं. मी विचारलं कसला अन्याय काय बोलतेस तू? यावर ती म्हणाली, एका जिद्दी आणि ध्येयवेड्या मनिषाची ही हालत होण्यामागे कुठे ना कुठे तरी मीच जबाबदार आहे. कारण.......

            कारण जर मी उभरत्या वयात तुला साथ दिली असती तर आज तुझी ही अवस्था झालीच नसती. असं म्हणून ती पुन्हा रडू लागली.  माझी जीवाभावाची सखी मला आजपर्यंत मनातून फूलवत जपत आली. आणि मी काहीच करू नये , ही मैत्री असूच शकत नाही. तिच्या या वाक्यावर काय बोलावं? मलापण ....‌ मलापण सुचत नव्हतं. थोडावेळ बसुन आम्ही घरी परतलो रात्रीची जेवणं उरकली . ती माझ्या उजव्या बाजूला झोपली तेव्हा ही ती अपराधी भाव चेहऱ्यावर घेऊनच होती.

         जेव्हा मी तिला म्हटलं की ही मैत्री नसून प्रेम आहे. तेव्हा ती खळखळून हसली. आणि ओठावरचा तीळही खूलला . रात्रभर ती मला बिलगूनच झोपली अन् दुसऱ्या दिवशी निघताना म्हणाली माझ्या जीवनाचं सोनं आज झालं.
इतक्या वर्षातली होरपळ आज संपली. असं वाटतं की तू  जगलेलं स्वप्न पुन्हा एकदा मीही जगावं.

 पण..... कर्तव्य सांगतंय की आता आपण निघावं. ती आवरून बाहेर पडताना पुन्हा थांबली.  पिशवीतून गाऊन काढून माझ्या हातात दिला अन् म्हणाली, आजवर कल्पनेत जपलसं आता याला जप. मला काही कळेना?

की ही आज असं का बोलतीय? भरल्या डोळ्यांनी ती गाडीवर बसली किक मारली अन् पुन्हा ढसाढसा रडू लागली. मी तिच्या जवळ जाऊ लागले. तर म्हणाली नको येऊस जवळ नाही तर मला जाताच येणार नाही. आणि ती निघून गेली. माझ्या मनाला चटका लावून गेली.

तिला काय म्हणायचं होतं? याचं उत्तर आता मलाच शोधायचं होतं.आणि तेवढ्यातच मला जाग आली होती. जाग आली होती. स्वप्नातील ती रमवून गेली होती.


                     सौ. मनिषा वराळे.
               धरणगुत्ती, शिरोळ.

Tuesday, May 26, 2020

बंदिवान मी या संसारी

                       बंदिवान मी या संसारी

जीवनाचं दर्शन आईमुळे झालं
बाबांच्या स्पर्शाने जीवन उजळलं

         लहानपणी सार्यांनीच कौतुक फार केलं
        किशोरी होताच बंधनांनी जखडलं

 जाऊ नको तिकडं,वागू नको वाकडं असं सांगितलं
 मीही पडत्या फळाची आज्ञा समजून वागवलं

           आणि काही वेळाने.........

लग्नाच्या बेडीत असं काही अडकवलं
अक्षरशः सारं पाहून मन हेलावलं


      आईनं सांगितलं म्हणून समजूनही घेतलं
     जीवना तुझा रंग पाहून मन हेलावलं

 खुपदा सारं सोडावसं वाटलं
 पण आईबापांच्या संस्काराने पुन्हा बांधून ठेवलं

      निसर्ग नियमाप्रमाणे मग मुलांचं आगमन झालं
    एका कन्येची मी माता म्हणून ओळखू लागले

सून,भावजय, बायको आणि आईही मी झाले
प्रत्त्येक अश्रू डोळ्यातच साठवू लागले

     अरे मन नावाची चीजच नाही हे जेव्हा कळले
    अक्षरशः धारातीर्थी मी पडून राहिले

अशीच मी बंदिवान या संसारी झाले
सांग मनिषा हे दुःख प्रत्येकाने कसे पचवले
प्रत्येकाने कसे पचवले

      सौ.मनिषा वराळे
धर

स्त्री जातीचं जगणं

                     स्री जातीचं जगणं

करायलाच पाहिजे म्हणून केला एक प्रयत्न
जगण्याचे ध्येय म्हणून परीक्षांचा प्रयत्न

       यशाची बाजू अपयशाने घेतली
       तरी नाही सोडला प्रयत्न

 ध्येयाची मग पराकाष्ठा झाली आतन
 पण लढवय्यी तू रणरागिणी सोड असहाय्य जीणं

       अगं लढ तू........लढ यश मिळव हे धाडसानं
   म्हणून सांगते लेखणी दिलीय सावित्रीनं


 रेखाट तुझं जीवन आणि मिटव सारी दूषणं
 अशी लढवय्यी हो तू तुला सलाम करावा दुनियेनं


जीवना..... असंच असतं का? स्री जातीचं जगणं
     स्री जातीचं जगणं

   सौ.मनिषा वराळे.
धरण

Wednesday, May 13, 2020

पाठीराखा

                            पाठीराखा



आनंदाच घरकूल माझं
आईबापाचं लाभे सौख्य
      
                                      सांगायचं आहे मला
                                      लाभले आहे भाग्य

बहिण भाऊ नातं बघा
जपत कसं सख्य

                                    भाऊ माझा पाठीराखा
                                         केवढं मोठ भाग्य
  
नको कुणी संगतीला
तरी भाऊ माझ्या दिमतीला

                                        बळ येतं जगण्याला
                                        देवा आयुष्य दे भावाला
   
सपनापरी भासे जीवन
नजर नको लागायला

                                        म्हणून जीवना नमस्कार
                                        करतो मी देवाला

आयुष्य दे माझे ही तू
माझ्या या भावाला
माझ्या या भावाला.............


        सौ.मनिषा वराळे. 
   धरणगुत्ती, शिरोळ.

ब़ंदिस्त

                         

                              👉      बंदिस्त‌‍👈



  लग्नानंतर ती आदर्श सून म्हणून राहिली
प्रत्येकाच्या इच्छा पुरवू लागली
 
                       स्वत:च्या भावनांना बंदिस्त ठेवू लागली
                           मुलांच्यात आपली आशा पाहू लागली

तरीही बघा  वेळ कशी आली
चिमण्यासवे मुलं सारी उडून गेली

                               शेवटी हा कारावास सोडून ती आली
                          माहेरची पाहुणी ती अशी रडू लागली


   रक्षणकरर्त्याचा मार खाऊ लागली
    तरीसुद्धा पती परमेश्वर मानू लागली

                                      असहृय होऊन माहेरी ती आली
                                      भावांची ती सावली मग झाली

    मायेने भावाने तिला ठेऊन घेतली
आईच्या मायेने तिची समजूत घातली

                                  अशी माया बघा कळून आली
                          बहिण भावाच्या नात्याची महती पटली

नवर्याला मग आपली चूक उमगली
समजूत घालून पत्नीची घरी तिला नेली

                          अशी ही किमया सारी देवाने केली
                            बहिणीने भावाचा आधार विसरली

         ममतेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ झाली
        अशी ती नार बंदिस्त संसारात झाली........



सौ. मनिषा वराळे
धरणगुत्ती, शिरोळ.


      

Tuesday, May 12, 2020

                              लेक लाडका
     
   
लेक लेक लाडका म्हणून,केला बघा लाड
लाडाने तो झाला बघा, भलताच द्वाड

                       शिकून व्हईल मोठा म्हणून झिजवलीत हाडं
                      सारखं सारखं सांगितलं, वाईट संगत सोड

जीवन लय बेरकी गड्या
सुटत नाही कोडं
 
                                               शिकून झालास मोठा तर
                                                        येणार नाही नड

नाही तर संसार लेका
जाईल लय जड
                             म्हणून गड्या घे आता
                                 शिक्षणाचं धड
                                घेरे शिक्षणाचं धड...........


   सौ. मनिषा वराळे.

    

सांगायचं आहे मला

               सांगायचं आहे मला

सांगायचं आहे मला माझ्या जाणत्या आई बाबा
लेकी लेकी म्हणता तुम्ही इकडं जरा ध्यान द्या

                   
                      पोटची पोर बघता बघता व्हते बघा मोठी
                          आई बाला घोर जणू लेक तरणीताठी
                                         तरीसुद्धा...........
                       तरीसुद्धा लेकापरी तिला ते वागवत हाय
               सांगायचं आहे मला माझ्या जाणत्या आई बाबा
                   लेकी लेकी म्हणता इकडं जरा ध्यान द्या

शिकून सवरून व्हईल बघा मोठी मॅडम
नको कुणाची हांजी व्हंजी व्हईल ती सक्षम
               आशा बघा.......
आशा बघा आईबाची उंच भरारी द्याया
रातदिन कष्टती ती आईबाची काया
सांगायचं आहे मला माझ्या जाणत्या आई-बाबा
लेकी लेकी म्हणता तुम्ही इकडं जरा ध्यान द्या


                      मेरी कोम, तेजस्विनी आणि आपली राही
                      पसरतं नाव बघा त्यांचं दिशा दाही
                               अशाच बघा........
                    अशाच बघा लेकी आपल्या मिळवतील किर्ती
            चीज झालं कष्टाचं आई बाप ते म्हणती
सांगायचं आहे मला माझ्या जाणत्या आई बाबा
लेकी लेकी म्हणता तुम्ही इकडं जरा ध्यान द्या
            तुम्ही  इकडं जरा ध्यान द्या


                             सौ.मनिषा वराळे.
                             धरणगुत्ती, शिरोळ.

Monday, May 11, 2020

पाखरण


  1.                           पाखरण



तुझ्या आठवणीत माझा दिवस सुरू होतो
तुझ्या कष्टाचे फळ उघड्या डोळ्यांनी पाहतो

                तू केलंस झुंजार आणि धाडसी मला
                           पण आई..........
                    कसं सांगू ग मी तुला

तू निर्मिलेल्या पोलादी छातीत
   मी एक हळवं मन जपलं

                      आणि नकळत त्यात माझं मी पण हरवलं
                                      मग आई..........
                                कसं सांगू ग मी तुला

या कमजोर मनावरही आहे तुझा अधिकार
नाहीच वाया जाणार तू केलेले संस्कार

         फिनिक्स पक्षाप्रमाणे मी ही आता सुरूवात करणार
           माझा गेलेला मान,स्वाभिमानाने परत मिळवणार

पण आई............ त्यासाठी हवी मला
            तुझ्या मायेची पाखरण

                              रोजच येते मला तुझी आठवण
                                    मला तुझी आठवण.......
                     
सौ. मनिषा वराळे.
धरणगुत्ती ,शिरोळ.
           

पश्र्चाताप

                              पश्र्चाताप
         
             आई, तुझ्यासारखं मीही ठरवलं होतं
                 माझं बळ मी मुलांना दिलं होतं

    आई तू जसं जसं संस्कार केलं होतं
अगदी तसंच संस्कार मन करण्यात गुंतलं होतं

        आई,तू कधी लाचारी  शिकवली नाहीस
     ना कधी कमजोरी...........
 
                    म्हणून आई मी निदान इथं पर्यंत तरी आले
               मी ही स्वाभिमानाने जगायला शिकवू लागले

अगदी माझ्याच मुलांत मी एक मुल झाले
त्यांच्या इच्छा आकांक्षांना बळ देऊ लागले

                     त्यांची आवड निवड मनापासून जपू लागले
                              पण आई...........

मी तुझ्यासारखी नाही मिळवू शिकले
आई मुलांचे नख आईला लागत नाही जग म्हणले
 
                  पण आई मुलांनी  केसानेच मला घायाळ केले‌‌
                             म्हणून आई...........

सांगशील का गं माझे कुठे चुकले ?
मी प्रामाणिकपणे सांगते, नाही तुम्हांला विसरले

               पण तुझ्यासारखे संस्कार नाहीच करु शकले
                नाहीच करू शकले

आई आज तुझे लेकरू असे हरले
की उठण्याचे बळच नाही उरले

                         स्वप्न माझे कसे कुठे चुकले ?
                                  आई मी...........
    पश्चातापाने होरपळले..........

आई,तुझ्यासारखं मीही ठरवलं होतं
माझं बळ मी मुलांना दिलं होतं


                                   सौ. मनिषा वराळे
                                  धरणगुत्ती, शिरोळ

Sunday, May 10, 2020

संस्कार

         
                                  👨‍👩‍👧‍👦  संस्कार. 👨‍👩‍👧‍👦
                रोपाला जपायचं काम माळी करतो
             तसंच मुलांना वाढवायचं काम पालक करतो
           
                  रोपांची गरज काय हे माळी ओळखतो
           मात्र मुलांची गरज पालक भागवत असतो.
      प्रत्येक इच्छा आकांक्षा पालक जपत असतो
                     कारण..........

मुलं हा त्यांचा स्वाभिमान असतो
स्वत:ची स्वप्ने तो मुलांच्यात पुर्ण करतो
प्रत्त्येक गरजेवेळी स्वत: मात्र काटकसर करतो
ध्येयवेडा पालक मुलांना जिवापार जपत असतो
        तरीही.............
   
                 नात्यातली माणसं घात करणार हे जाणत नसतो
                 म्हणून ताई, काका,काकी ही ओळख तो देत असतो
 पण नात्यातला आपलेपणा शिकवताना हे विसरतो
की सार्यांचाच विचार आपल्यासारखा नसतो
           म्हणून.......
                     मुलांची नात्यातली जवळीक तो विसरुन जातो
                  आणि तिथेच पालकांचा घात होतो
                 संस्कार केलं मुलावरती तरी तो अपयशी ठरतो
         
    चार चौघातला मान प्रतिष्ठा नात्यांमुळे धुळीत जातो
असा वेडा नात्यांचा छंद खूप खूप त्रास देतो
आपलेपणा म्हणायला काय मग अर्थ उरतो
                  संस्कार...........

                 संस्कार म्हणून स्वत:ला दोष देतो
         अर्थ हीन जगणं जगत राहतो
  तो दुर्दैवी पालक हताश पालकच असतो
पालकच असतो......👨‍👩‍👧‍👦

                                 सौ. मनिषा वराळे.
                                धरणगुत्ती, शिरोळ

हवं होतं मला

                   🥰👩‍🎓हवं होतं मला. 🥰👩‍✈️
             हवं होतं मला कुबड्या टाकून चालायला
             उड्या मारत पळत जायला
             प्रत्त्येक स्पर्धेत जिंकून यायला
                     हवचं होतं मला.........
 
               सर्वांना जसं मी समजून घेतलं
                जमेल तसं सर्वांना शहाणं केलं
                 प्रसंगी आधार बनून सक्षम केलं
          अगदी तसंच माझा आधार व्हायला
                    हवंच होतं मला.........
                         
                       
                    कुणीतरी समजून घ्यायला
           सुदृढ शरीरातल्या कोमल हृदयाला ओळखायला
            हसणार्या चेहर्यामागच्या रडणार्याला बघायला
                करारी नजरेतल्या मृदू भावनेला समजायला
               हवंच होतं मला कुणीतरी ओळखायला
प्रत्येकाने फसवलं म्हणून.........

                  परवानगी नाहीच मला थकायला
            कितीही झाला त्रास तरी मला हारायला
          इतकं पाषाणासारखं आयुष्य जगायला
       परिस्थितीन शिकवलं मला कठोर व्हायला
                    म्हणूनच कदाचित...........

       हवंच होतं मला चॅलेंज स्वीकारायला
      प्रश्र्नांची उत्तरे स्वत:च शोधायला
       एक धाडसी माता म्हणून जगायला
    रणरागिणी अशा दोन वाघिणी घडवायला
          हवंच होतं मला............

   हवं होतं मला कुबड्या टाकून चालायला
    उड्या मारत पळत जायला.. 
      हवंच होतं मला..........

                         सौ.  मनिषा वराळे.
                     धरणगुत्ती , शिरोळ

      

Thursday, May 7, 2020

एकटं

आजकाल खूप एकटं एकटं वाटतं, काहीतरी हरवलंय असं मन सांगत.वाटतं पाठीवर हात फिरवून धीर देणारी सावली असावी.पण आपुलकी आणि माया मला कुठेच नाही जाणवली.प्रत्येकजण आपल्याच विश्वात मग्न.आणि नाती मात्र हळूहळू होतायेत भग्न.वाटतं लहानपणी किती छान होतं.एकत्र कुटुंब आणि लांबच लांब पंगती बसल्या होत्या.हसण्याखेळण्याचा दंगामस्ती करण्याचा जमाना गेला.आजीआजोबांचं छत्र हरपले आणि आपुलकीने विचारपूस करणारे चेहरे आता व्यवहारी बनले.आतातर करोना विषाणू जगभर आपलं साम्राज्य पसरत आहे आणि घरबसल्या गप्पा मारत बसायचे सोडून वादविवाद होत आहेत.जणू प्रेम, माया,ममत्व हरत आहे.कर्तव्याच्या ओझ्याखाली ज्याची त्याची कुतर ओढ होत आहे.आणि मनात विचार थैमान घालत आहेत.शेवटी उद्याच्या आशेवर सारं सोडून विचार सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.आतून कितीही तुटलं तरी समाधान चेहरे घेऊन फिरत आहेत.अशी अन् अशीच माणसं आज एकटं एकटं जगत आहेत.
सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती शिरोळ

Monday, May 4, 2020

               श्रीमंतांचा करोना
खूप केली धावपळ जेव्हा वेळ मिळेना
अलगद आलास की, तू जगात बनून करोना
वर्क फ्रॉम होम हे गणित आता जमेना
आम्ही मात्र निवांत फॅमिली सह   एन्जॉयकरतोय ना
निवांत झोपा, निवांत उठा आणि रोज नवीनच फर्माईशआमची असते ना

बायको रागावली तरी नजरेत गप्पही होते ना
असा तू इवलासा जीव पण... जगाला कोड्यात टाकलंस ना
थोडीफार मदत म्हणून जनसेवा ही करतोय ना
प्रत्त्येक जण विचारतोय आता घरी मला करमेना
आणि काही केल्या निरोप ही करोना तू घेईना
असा कसा रे तू करोना,प्रश्न सुटता सुटेना
आम्ही जगू पण इतरांचा विचार जाता जाईना
आता तरी तू जाशील ना
ही आर्त हाक आमची ऐकशील ना
सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती शिरोळ
             मध्यम वर्गीयांचा करोना.               
आमच्या जीवनात तू असा काही आलास
हातावरचं पोट तरी काम घेऊन गेलास
दोन महिने झालं आता कसा खाऊ घास
लेकरांसकट आईबापालाही करावा लागतोय उपास
माझ्या म्हातार्या आईबापांना आहे बीपीचा त्रास
तू मात्र निर्जज्जसारखा आमच्या गरीबीवर हास
स्वाभिमान जपतो म्हणून करतात आमचा उपहास
मध्यम वर्गीयांचे जीवन म्हणजे गळ्याला असतो फास
मानवाच्या गळ्याला असतोच फास.
सौ.मनिषा वराळे धरणगुत्ती

Wednesday, April 29, 2020

वर्दी

manishavarale blogger.comकर्म योगिनी तू अशी तुला सेवेचे भान
वर्दीतल्या माणसाला असते माणुसकीची जाण

कार्य तत्पर तू अशी पेलतेस सारे आव्हान
समाज कार्य असो वा आरोग्य सेवा तुला न कशाची वाण

माय माऊली होऊन तू ऐकतेस कर्म कहाणी
मला वाटतं राखून ठेवतेस तुझी जीवनगाणी

कधी कधी डोळ्यात तुझ्या दाटते पाणी
हसून देतेस निर्वाळा गातेस जीवनगाणी

सुख दुःख वाटल्याने होते रिकामी वाणी
पण तुझे सल लपवतेस जणू मृगजळाचं पाणी

साथ मिळावी आयुष्यभराची हीच आता मागणी
काय कर्तव्य काय नाते सारेच जणू...........

देवाची करणी आणि नारळात पाणी
     ‌‌‌              नारळात पाणी

                       सौ. मनिषा वराळे
                       मोबाईल नंबर.__७०५७२२५४०७