Saturday, August 20, 2022

आमची अम्मी

                    आमची अम्मी

हसतमुख स्वभावाची बोलकी हास्य विनोद करणारी

मजेमजेतून आरोग्य शिक्षण देणारी

प्रत्येक परिस्थिती हळूवार हाताळणारी 

अशी आमची अम्मी आहे बोलक्या स्वभावाची

तिच्या नजरेतून खूप काही जाणवत असतं

तिची घालमेल तिचा त्रास सारं काही दिसत असतं

अशी आमची अम्मी तिला खूप काही माहिती असतं

घाईघाईने आवरणं तिच्या अंगवळणीच दिसतं

कामाच्या व्यापात तिचं स्वतः कडे लक्ष नसतं

दर्दी यातना तिच्या उरात लपल्यासारखं वाटतं

तरी हसतमूखानं बोलणं तिनं सोडलेलं नसतं

आरोग्य शिक्षणाच्या प्रवाहातला प्रवास तिचा

पोहणं,बुडणं तरी ध्यास कर्तव्य निष्ठेचा

खूप मैत्रिणी मिळाल्या असतील हा विजय माणुसकीचा

कर्तव्य दायिनी अशी अम्मी शब्द तिचा आपुलकीचा

खूप काही करायचं राहून गेलं तरी दिसते समाधान

प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जेचे देते ज्ञान

अशी खूप विरळा माणसं आहेत जे विसरतात भान

म्हणूनच वाटतो मनिषाला त्यांचा खूप खूप अभिमान


सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर


Friday, August 5, 2022

मेनोपॉज एक समस्या


लेख लेखन

विषय. मोनो पॉज एक समस्या


आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आनंद शोधावा लागतो हेच खरे.बाईची जीवन रोज सकाळी नव्या दमाने सुरू होते आणि संध्याकाळी कोमेजून जाते.वयाच्या चाळीशी नंतर जवळ जवळ सर्वच स्त्रियांना हा अनुभव येत असतो.मासिक धर्म जाण्याच्या मार्गावर असतो त्यामुळे कधी खूप जास्त तर कधी कधी ना च्या बरोबरीने त्रास होत असतो.

            काही वेळा अति रक्त स्त्राव होऊन बाई एका अशा अवस्थेत येऊन पोचते की डॉ क्टर तिचा अविभाज्य भाग काढून टाकायला सांगतात.सततच्या त्रासाला कंटाळून ती काढून ही टाकते.पण ....

      पण नंतर एक वेगळाच अनुभव तिला यायला लागतो.भरलेली हवा क्षणात फूस्स व्हावी तशी ती आतून बिच्चारी पोकळ होते.एखादं काम करताना लगेच थकून जाते.दमतेजणू काही हरवलंय अशी निष्क्रिय समजून जगते.

कधी कधी घामाने चिंब भिजून जाते तर कधी लाजाळूने मिटलेल्या पानासारखी आकसते.

           अशावेळी तिला समजून घेणे आवश्यक असते.तिच्या हळव्या मनाला आधार देत तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.कारण तिच्या एवढी सहनशीलता इतर कुणातही नसतो.फक्त तिच्या वेदना समजून घेणे आवश्यक असते.येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगता आले पाहिजे.


   सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर