...😘 आई एक अकल्पित ठेव 😘...
काल संजिवनी ताईंच्या आईला भेटण्याचा योग आला , निमित्त होतं , प्रिन्सचा वाढदिवस 🧁! प्रिन्स नऊ वर्ष चा एक निरागस,बालक, तरीसुद्धा ! दूर दृष्टी असणार एखाद्या विषयी खूप अगतिकपणे बोलणारा सर्वाशी जवळीक साधणारा ... थोडासा खोडकर पण , खूप सारा विचार करणारा , जणू ज्ञानाच्या सागरातला अनमोल हिराचं ! अशा या छोट्या देवदुताच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक साहित्यिक विचारवंत जमलेले असताना , एक दुग्धशर्करा योग जुळून आला तो म्हणजे कविरत्न विजयकुमार बेळंके सरांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलं ...💐
ज्या माऊलीनं मला माध्यमिक शिक्षण घेत असताना शिकवलं होतं . जी उमेद आम्हां विद्यार्थ्याच्या मनात भरली होती. त्या सर्व गोष्टी आज जशाच्या तशा डोळ्यासमोर उभ्या राहिल्या आणि जीवनाचा अभ्यास एखाद्या चलचित्राप्रमाणे डोळ्या पुढून सरकत गेलो . खूप काही मनात सुरू होतं . काय सांगावं, कुठं थांबावं , याचा विचार करता करता वेळेचं भान ठेवणं गरजेचे होतं ! आणि SHORT BUT SWEET अशा अर्थाचं मनोगत व्यक्त करून मी स्थानापन्न झाले . मनात विचारांचे काहूर माजले होते. का कोणास ठाऊक ? एक वेगळंच विश्व मनाला सारखं मोहित करते होतं राहून राहून मन बालपणात शिरत होतं . आणि ती माऊली मला साक्षात वात्सल्य देवता भासत होती.
काही वेळाने एक शिडशिडीत बांधण्याची व्यक्ती माझ्या समोर आली अन् नावाने हाक मारली ! मी तिला ओळखलं नव्हतं . पण तीने ज्या अगतिकपणे माझ्या कविता ह्या माझ्या नसून तीच्या जीवनातील घटना आहेत , असं सांगितलं . तेव्हा वाटलं , खरंच बाईचं बाईपण कुठं ही गेलं तरी सोसावंच लागतं. मग ती महलों की रानी असू दे कीं झोपडीतील दिनवाणी .
अनेक साहित्यिकांना ज्यांनी जगण्याची संजिवनी दिली होती. त्या कवितासागरच्या संचालिका , मुद्रितशोधिका संजिवनी ताई पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या .
वाचनावेड🧾 इतकं होतं की स्वयंपाकाचं भान उरत नव्हतं . खाणं पिणं कळत नव्हतं. आजू बाजूच्या लोकांचा विसर पडावा इऊ देहभान विसरून अफाट वाचन करणारी ती माऊली ! एका अपघातानंतर तंद्रीत गेल्या सारखी वागत होती . कोणत्या पुस्तकात कुठल्या पानावर , काय लिहीलं हे अगदी अचूकपणे ती सांगत होती . आपल्या तिन्ही लेकरांना तिनं उच्च विद्या विभूषित करून क्लासवन अधिकारी बनवलं होतं . पण पतीच्या अकस्मित जाण्याने त्या आतून तुटल्या होत्या .
बोलण्यातला लाघवीपणा आणि शिक्षणावरचं अतूट प्रेम जाणवतं होतं . एक खंत सतत मनाला बोचत होती की होती , की का आपण शिक्षणापासून वंचित राहीलो ..... आणि एक समाधान ही होतं की, आपली मुलं आपापल्या कार्य क्षेत्रात स्थिरस्थावर झालीत . खरंच एक आगळा वेगळा अनुभव अनुभवला जो माझ्यासाठी प्रेरणा देणारा आणि अनमोल होता .👍👍
💗 सौ. मनिषा पिंटू वराळे . धरणगुत्ती
ता. शिरोळ , जिल्हा . कोल्हापूर ... 😊
No comments:
Post a Comment