👩⚕️ 💊💉 सेवा 💉💊👩⚕️
सेवा देणारे किती साहसी असतात ते डाॅक्टर ..👩⚕️
त्यांच्या बरोबरीने काम करतात त्या सिस्टर..👩⚕️
त्यांच्या साठी रुग्ण सेवेतच दिसत असतो ईश्वर..🤲
म्हणून सदैव असतात त्या कार्यतत्पर..
असो सेवक सेविका किंवा आशा आणि परिचर ..
ध्यास फक्त एकच रुग्ण बरा व्हावा सूकर..
किती धाडसी असतात ते सफाई वर्कर्..
स्वच्छता आणि समृद्धी साठी झटतात ते शूटर ..
आयूष्य लागले पणाला कोरोनाचा असा कहर...
तेवढ्यात नवा रोग आला दूषित करतो रोग्यांची नजर..
कुठे कुठे धावणार आहे आरोग्य यंत्रणा कोण करेल विचार..
तरीही बिनधास्तच बोलत असते आपलं सरकार..
कोण घेईल काळजी आरोग्य यंत्रणेची होऊन जबाबदार..
व्हावे सारे कूशल मंगल रहा घरी सुरक्षित चालावा कारभार..
करा नाकाबंदी किंवा लाॅकडाऊन पण व्हा सर्वांनीच जिम्मेदार..
आणि बंद करून टाका हे कोरोनाच्या असूराचं दार..😷😷
सौ. मनिषा पिंटू वराळे. धरणगुत्ती, तालुका :-- शिरोळ ,जिल्हा:-- कोल्हापूर..
No comments:
Post a Comment