विषय. शाळा
शिर्षक. माझी शाळा 🏫
धन्य धन्य ती माझी शाळा
जशी माऊली लावते लळा
शाळा मला खूप आवडायची.मी जेव्हा शाळेत जायची तेव्हा पहिले मला गुरूजी,बाईंची भिती वाटायची.पण नंतर नंतर ते आम्हाला खूप आवडू लागले.तेव्हांच शिकवणं आजच्या सारखं नव्हतं तर,छडी लागे छम छम विद्या येई घम घम असं होतं.
वर्गात आल्यावर बाई खूप छान शिकवायच्या.माया करायच्या.छान छान गोष्टी कळतील अशा सांगायच्या.मला आजही आठवतं की, त्या नेहमी म्हणायच्या मुलींनी शिकून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे.स्वावलंबी बनले पाहिजे.
आज इतक्या वर्षांनंतरही आम्ही संपर्क साधत होतो.एकमेकांची विचारपूस करत होतो.आम्ही काही तरी धडपड करत संसार चालवत आहे आणि विशेष म्हणजे आम्ही लिहितोय या गोष्टीचा त्यांना खूप अभिमान वाटला होता.२०१८ला अचानक येऊन मला आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता.त्यावेळी बोलताना आपल्या भाषणात त्यांनी आवर्जून माझा उल्लेख केला होता.
आईसारखी काळजी त्यांच्या शब्दाशब्दांतून जाणवत होती.आणि माझं वैयक्तिक मत आहे की एखाद्याला आर्थिक मदत करण्यापेक्षाही शब्दांचा आधार लाखमोलाचा असतो जसं फक्त लढ म्हणा या कवितेसारखं!
वाईट गोष्ट एवढीच आहे की परवा त्या गेल्या आणि एक आधारस्तंभ ढासळल्यागत आमची अवस्था झाली.बाईंनी अगदी मनापासून आमच्यावर प्रेम केलं आहे हे अखेर पर्यंत त्यांनी जपलं होतं.त्या एक आदर्श शिक्षक आहेतच पण एक आदर्श आई, मैत्रिण मार्गदर्शक सुध्दा होत्या.त्यांनी शाळेत असताना आम्हाला मैदानी खेळ सुध्दा शिकवले होते.त्यांच्यासारखा गुरू मिळणं आम्ही आमचं भाग्य समजतो.म्हणून मला शाळा आणि शिक्षणाची गोडी आजही आहे.
सौ.मनिषा पिंटू वराळे
धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर
No comments:
Post a Comment