🏞️माझं गाव*🏞️
*शिर्षक. आठवणीतला गाव*
खूप छान आहे माझं गाव
धरणगुत्ती आहे त्याचं नाव
गावात नाही व्यसनाला वाव
दारूबंदी करून राहीला राव
गावात आहे लक्ष्मी माता ग्रामदैवत
बिरोबाची आहे भोळ्या मनाला सोबत
महादेव बसलेत आधार होऊन चौकात
महाबली हनुमान उभे भर रस्त्यात
गावात शाळा जशी शाळेत असावं गाव
हुशार इथली पोरं त्यांचं चोहीकडे गाजतय नाव
वेगवेगळ्या उपक्रमाला ग्रामपंचायत करते धावाधाव
गावचा विकास व्हावा एवढाच प्रस्ताव
हिरवीगार झाडी सांगते गावाची समृद्धी
वृक्षसंवर्धन करून वाढवत आहोत वृध्दी
सुखसमाधान इथं मायेची नदी
अशा गावात राहते मी माळामदी
लोकसेवा करते आरोग्य जपते
रोगराई टाळण्यासाठी गावाला आरोग्य शिक्षण देते
गावाच्या विकासासाठी हर एक माणूस झटते
असं माझं गाव मला खूप छान वाटते
*सौ.मनिषा पिंटू वराळे .
धरणगुत्ती कोल्हापूर*
No comments:
Post a Comment