सेवादायिनी
एक कर्मयोगिनी आज पुन्हा नवचैतन्य घेऊन आली
माझ्यासाठी ती साक्षात आनंदसरी घेऊन बरसली
कितीही म्हटलं तरी मनाने ती कर्तव्यासाठी आली
तरी मी म्हणते ती माणुसकी जपण्यासाठीच आली
माझ्यासाठी ती खरंच मला खूप जवळची वाटली
जणू काही अथांग सागरातली नौका मला मिळाली
सर्व नात्यांपेक्षाही मला ती खूपच हक्काची वाटली
तिच्या परतण्यासाठी मनाने आराधनाही केली
तिचं बोलकं डोळं आणि आत्मियता मी ओळखली
पुन्हा एकदा देव आहे याची साक्ष मनाला पटली
सैरभैर झालेल्या मनाला पुन्हा नव्याने उभारी आली
पद, प्रतिष्ठा, पैसा यापेक्षाही माणुसकी श्रेष्ठ ठरली
ती कर्तव्यदक्ष सेवा बजावणारी मनमिळावू माऊली
तिच्या येण्यानं मला समाधानाची लकेर मिळाली
तिच्यासाठी शुभेच्छा सुमने मनानं या उधळली
आपुलकी आणि स्पष्टपणाने ती सखी व्यक्त झाली
ती खरंच..,.... माझ्यासाठी आदर्श सेवादायिनी ठरली
सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती
अतिशय साध्या सोप्या आणि कमीतकमी शब्दात अतिशय उत्कृष्ट अशा कवितेचे लेखन झाले आहे, मला मनापासून आवडली....
ReplyDelete