Monday, November 30, 2020

नवी उमेद

                                 नवी उमेद

नव्या उमेदीने पुन्हा एकदा उभी आहे

नात्यातला गोडवा की,खारटपणा हे सिद्ध करायचं आहे

वाट बदलायची सवय लावून घ्यायची आहे

कारण, आता पुन्हा नव्याने ध्येय गाठायचे आहे

माणुसकी जपता जपता व्रुध्दाश्रम संपवायचे आहे

घरातली श्रीमंती ही घरचे ज्येष्ठ असतात हे दाखवायचे आहे

व्रुध्दांच्या चेहर्यावर समाधानाचे हसू आणायचे आहे

बालगोपाळांना नात्याची ओढ शिकवायची आहे

पाळणा घरातील कोरडे पण आता थांबवायचे आहे

नातवंडांच्या समवेत आजी आजोबांनी मस्त जगायचे आहे

जिथे आधारवड आहे तिथे सुख नांदतं हे दाखवायचं आहे

म्हणून त्यासाठी आई-बाप,सासू सासरे यांचं बालपण कि, म्हातारपण हे समजून घ्यायचं आहे

त्रिकोणी, चौकोनी कुटूंबापेक्षा वर्तुळाचे महत्त्व पटवून द्यायचे आहे

सुखी सम्रुध्दीच्या देशात पुन्हा एकदा समाधान पसरायचे आहे

                      सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती ं

2 comments:

  1. खूपच छान आत्ता सध्याच्या काळात अस नाही जर आजी आजोबा घरी असले तर पाळणा घराची गरजच नाही राहणार .मुलांना त्यांचं प्रेम मिळेल आणि आजी आजोबा यांना छत अस जर झाले तर व्रुद्धाश्रमाची पण गरज नाही लागणार

    ReplyDelete
  2. खूपच छान विचार आहेत. जर दोन्ही generation मधील लोकांनी एकमेकांशी संवाद साधला व एकत्र राहिले तर generation gap राहणार नाही व पाळणा घर आणि वृद्धाश्रम यांची गरज भासणार नाही.

    ReplyDelete