माझं मी पण
सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद यासाठी की त्यांनी मला भरभरून प्रेम दिले आहे जे खरंच मला आपलं समजतात.जीवनाच्या प्रवासात एक गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे स्वाभिमान! होय स्वाभिमानच...
कर्तव्य पार पाडत असताना अनेक वेळा मन मारून जगावं लागतं.कधी परिस्थिती कधी संस्कार तर कधी जबाबदारी आडवी येते.आपण करत जातो करत जातो म्हणून प्रत्येक वेळी नवनवीन अपेक्षा वाढत जातात.कधी कधी आपण तुटून जातो तरीही कर्तव्य करतो हे असतं आपलं अस्तित्व.
खूपदा वाटतं पुन्हा नव्याने सुरुवात करायची पण जबाबदारी टाळून नाही आणि राहून जाते जगायचं....
का आपल्याला ती साथ मिळत नाही जी प्रत्येकाला सन्मान देणारी असते.जगण्यासाठी आणि प्रत्येक गोष्ट पैशाची असली तरी आपुलकीच्या शब्दांना पैसे लागत नाही ना भाऊ...
एक आईबाबा जेव्हा खचतात ना तेव्हा त्यांना नव्याने उभा होता येत नाही.भोवती कितीही सूखानं गालीचा पसरला असला तरी मनाची आग दाहक असते.म्हणून तमाम लेकरांना सांगावसे वाटते की औषधपाणी आणि खाणं पिणं याशिवाय दोन आपुलकीच्या शब्दांना भूकेले असतात ते आईबाबा,आजी आजोबा.. आणि म्हणूनच आज ज्येष्ठांना खरा सन्मान देऊया त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारून हसत हसवत जगूया याच आजच्या घडीला माझ्या मी पणाच्य सदिच्छा.
ज्येष्ठांना खूप खूप शुभेच्छा.
सौ.मनिषा पिंटू वराळे
धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर
No comments:
Post a Comment