Friday, April 21, 2023

उन्हाळी सुट्टी

 उन्हाळी सुट्टी (बालगीत)


किती किती मज्जा येते मला

काय सांगू काय केलं दोस्ता तुला 

चिंचा कैर्या पाडून खाऊया चला

क्रिकेट आणि गोट्यांचा डाव मांडू चला 



पोहायला जाताना येते मज्जाच मज्जा

आईने केलेल्या कुरूड्या चाखतो मी अन् आज्जा 

आजीने केल्या शेवया दोरी त्यांची करू

आपल्या आवडीचा आकार शेवयीचा धरू



किती किती छान वाटते मला या दिवसांत

मनसोक्त फिरू चला रानावनात

चिमण्या पाखरांचा किलबिलाट घेऊ ध्यानात

किती किती फिरायचे असते उन्हातान्हात



सायकलीने लावू चल आपण शर्यत 

मागेपुढे होताना येईल फार गंमत

हात सोडून करू चल नवी कसरत

कुणी रागावलं तर जाऊ आपण घाबरत



खेळाची गड्या आपण धमाल अशी करू

नवनवीन गोष्टी वाचून मजा अशी करू

दंगा मस्ती सोबतच आईला मदत करू

अधूनमधून कामाचीही गोडी आपण धरू


नवी पुस्तके नवा वर्ग नवेच अनुभव घेऊ

शिकता शिकता जीवनाची दिशा ठरवू


सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर

No comments:

Post a Comment