संसार नेमका असतो तरी काय?
जेव्हा लग्न होऊन एक मूलगी आपल्या जीवनात येते, तेव्हा ती त्या सर्व नात्यांना आपलं समजून जगत असते.प्रत्येकाची आवड जपत असते.मनातून एकटी पडलेली असते कारण आजपर्यंत ती एक ही दिवस आपल्या आईवडिलांना आपल्या भावंडांना सोडून राहिलेली नसते.आणि तरीही तुमच्या नव्या घरात सगळे आपलेच आहेत म्हणून जगत असते.तिचा सखा,तिचा जोडीदार तिचं मन जपणारा असावा एवढीच अपेक्षा असते तिची.....
मानवाला जशी पोटाची भूक महत्वाची असते तशीच मनाची भूक महत्वाची असते.शारिरीक भूक पण येनकेन प्रकारे पूर्ण होतच असते पण...... त्यात प्रेमाचा ओलावा असणे आवश्यक असते.आपुलकी गरजेची असते.जपणं महत्वाचे असते.आणि ज्याला बायकोचं मन जपणं जमतं ना त्याला कोणतीही गोष्ट अशक्य नसते.
मान्य आहे मातृपितृ भव आईवडिलांना जपलच पाहिजे भावंडांना सुध्दा जपलं पाहिजे आणि जी आपल्याला आपलं समजून आली आहे तिला सुखात पाहण्यासाठी सतत काळजी करणारे तिचे आईवडील त्यांना जपलं तर काय होईल ओ?
जी मूलगी आईला बाबाला भावंडांना सोडून सासरच्यांची मनं जपते तर जावयाने ही जबाबदारी का टाळावी? मूलीची दोन्ही घरं तिची हक्काची असतात तर जावयाची का असू नयेत? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.बायकोची आवड जपणं तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणं यात चूकीचं काय आहे, तिच्याशी रोज थोडा वेळ गप्पा मारत बसले तर बिघडते कुठं? समानता फक्त बोलण्यापुरती न वापरता आचरणातून सिध्द केली पाहिजे.केली बायकोला मदत तर आईनं का नाराज व्हावं, आणि बायको माहेरी जाऊन यावी यात चूकीचं काय आहे? प्रत्येक बापाला आपलं मूल प्रिय असतंच की मग स्वतःच मूल आलं नाही तर आसवं गाळायचं आणि दूसर्याच्या मूलाला पाठवायचच नाही आणि पाठवलं तरी बंधने घालायची हा कोणता न्याय?
नव्या जोडप्याला जसा एकांत महत्वाचा असतो ना तसाच मन जपणारा जोडीदार सुध्दा हवाहवासा वाटतो.तिच्या एका हास्याने घराचा स्वर्ग होणार असेल तर काय हरकत आहे तिचं मन जपलं तर...ती कामवाली बाई नाही की मूलं जन्माला घालणारी मशीन नाही ती एक माणूस आहे घरची लक्ष्मी आणि सर्वस्व अर्पण करणारी देवता आहे म्हणून जमेल तसे बोलून बघा संसार सुखाचा आनंद घ्या आणि मग सांगा की, संसार नेमका असतो तरी काय..........
सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर
Khup Chan 👌
ReplyDelete