सून मूलगी असावी तर जावंई मुलगा होतो का?
सर्वांना नमस्कार आणि नव्याने सासू सासरे होणार्या सर्वच बंधू भगिनींना हे नविन नातं खूप सूखाचे आनंदाचे रहावे यासाठी सदिच्छा.
या सध्याच्या जगात सासूला आत्याबाई म्हणण्याऐवजी आई किंवा मम्मी म्हटलं जातं.बहुतेक सूनांना आई, मम्मी म्हणणेच योग्य वाटते कारण त्या नात्यात त्या आपल्या आईला शोधत असतात.सासर्यांना बाबा, पप्पा म्हणून आपल्या बापाला शोधत असतात.सासरी रूळण्यासाठी त्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी समजून घेण्यासाठी धडपडत असतात.मनं जपण्याचा प्रयत्न करत असतात.
एका अल्लड हट्टी मूलीचं समंजस सुनेमध्ये रूपांतर झालेले असते.हा एवढा समजूतदारपणा एक मुलगी फक्त आपल्या आईबापाच्या संस्कारांना डाग लागू नये एवढ्याचसाठी करत असते.ती त्या घरची लक्ष्मी असते.ठराविक वेळेनंतर ती सर्वांची लाडकी सून बनते आणि नकळत तिच्या सासूसासर्यांच्या तोंडून शब्द निघतात की, आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हांला सुनेच्या रूपात लेक मिळाली.आणि खरंच ज्या घरातली सून हसतखेळत असते ते घर सूखी असतं.आणि त्यासाठी ती एकमेकांना जपत असतात.बस्स...इतकच तर पाहिजे असते मूलीच्या आईबापाला की आपली पोर सर्वांना जपते तसेच तेही तिला जपतात यातच आईबाबा समाधानी होत असतात पण........
पण मला विचारावंस वाटतं की जशी परक्या घरची पोर आपली सून नव्हे तर मुलगी बनते तसाच आपला मूलगा जाव ई न राहता मूलगा बनतो का हो?
मान्य आहे तो सासूरवाडीला दोन चार दिवसांसाठी जात असतो पण त्या दिवसांत त्याला हवं नको ते पूरवण्यात थोडक्यात त्याचे लाड करण्यात चार दिवस निघूनही जातात आणि जाता जाता शुल्लक कारणावरून तो रूसतो, चिडतो आणि तडकाफडकी निघूनही जातो तेव्हा आपल्या सहचारिणीच्या मनाचा विचार तो का बरं करत नाही? तिच्या माहेरच्या लोकांच्या मनाचा, भावनांचा विचार का बरं करत नाही? का त्याचा आत्मा विरघळत नाही बायकोच्या भावनांपेक्षा हट्ट मोठा असतो का, सुनेला बोललं तर तिने रडत रडत स्वयंपाकघरात थांबावे,माहेरच्यांना काही सांगू नये म्हणून दटावले जाते आणि जावयाला एखाद्या गोष्टींविषयी थांबवलं तर त्याने आईबाबाला बहिणभावाला काकाकाकूला सांगावं आणि निघून जावं? आता कुठे गेली समानता? का मुलांना आपल्या आईवडील भावंडाइतकीच सासरची माणसं हक्काची आपली वाटत नाहीत? का तो आधाराचा शब्द आपल्या बापाला देतो तसा सासरच्यांना देऊ शकत नाही?
सोप्पं नसतं ओ रितीनुसार बावीस वर्षे सांभाळलेल्या लेकराला परक्या घरी पाठवून सूखी ठेव सर्वांना सांगणं.तरीसुध्दा मुलींचे आईबाबा हे करत असतात.मग त्या मुलीच्या सुखासाठी तिच्या आनंदासाठी एक शाश्वत आधार एक विश्वास मायेची साथ का तिच्या पतीकडून मिळत नाही.का फक्त स्त्रियाच समजून घेण्यासाठी धडपडत असतात, का मुलगी सुखात आहे की नाही ही खंत वाटते मुलीच्या आईबापाला, का त्यांना दिल्या घरी सुखी रहा म्हणून दिवस ढकलावा लागतो
का आज कित्येक मुली उच्च शिक्षण घेऊन सुध्दा घरीच कोंडून ठेवतात का त्यांच्यातल्या गुणवत्ता त्यांची स्वप्ने पूर्ण करू देत नाहीत
अनेक प्रश्नांत आजही आईबाबा काळजीत राहतात हे बदलणार तरी कधी?
सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर
No comments:
Post a Comment