बाप
बाप माझा बापासारखा कधी वागलाच नाही
म्हणून मायबाप दोन्ही कर्तव्य आईनेच निभावली
लेकरांची गरज बापाला कळलीच नाही
म्हणून आईच घ्यायची चिमणी होऊन पंखाखाली
सताड डोळ्यांनी बापानं कधी पाहीलच नाही
आईनं आणलेला घास सुध्दा खाऊ दिला नाही
दारूच त्याची दुनिया संसार कधी म्हटलाच नाही
म्हणून आईने कधीच हिंमत हरली नाही
कंबर कसून चारी मूलं सक्षम बनवली
परिस्थिती पुढं ती कधी नमलीच नाही
कण्याला पडलेली मण्या एवढंच बाप बोलायचा
शिव्या हासडत दिवस रात्र बसायचा
केलेल्या अन्नाचं सुध्दा नासाडी करायचा
कधी कधी चुलीतच पाणी ओतायचा
भरपावसात घराबाहेर काढायचा
तेव्हा आईच पदराखाली घ्यायची
पावसात भिजलेली आसवं सुध्दा पाऊस होऊन गळायची
तेव्हा आईच हिंमतीने पुढं येऊन समजावायची
लोक फादर डे साजरा करतात पण आमच्या साठी आमची आईच गॉड फादर व्हायची
कुणी कितीही मला हलक्या काळजाचं म्हटलं तरी...
आईच माझी ताकद व्हायची तेव्हाही आणि आताही
म्हणून म्हणते सारीच मला की मी आईची भक्त आहे
कारण तिच्या चरणी नतमस्तक तिचेच मी रक्त आहे
सौ.मनिषा पिंटू वराळे, धरणगुत्ती
तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर
No comments:
Post a Comment