Thursday, November 17, 2022

एकांत

 *शिर्षक— स्वतः च स्वतः ला शोधताना*


एकांत या क्षणी

विचार आला मनी

काय मिळवलं या जीवनी

माणुसकी आणि साधी राहणी


विचार केला सर्वांचाच

हा आणि तोही माझाच

आधार हा मायेचा

विचार केला एकांतात स्वता:चा


स्वतः च स्वतः ला शोधताना

मागे वळून पाहताना

अनुभवाच्या जोरावर चालताना

नवीच जिद्द जन्म घेताना


हर एक क्षण आनंदाचा जगताना

ओठांवर हसू घेऊन फिरताना

स्वतः च स्वतः ला शोधताना

जीवन नव्याने जगताना


खूप काही करायचं राहुन गेलं

खूप काही सांगायचं बोलायचं राहून गेलं

सख्या आयुष्यात समजून घेणे राहून गेलं

स्वतः च स्वतः ला शोधताना जगायचंच राहून गेलं


*सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर*

No comments:

Post a Comment