आयुष्य जगताना
या एवढ्याशा आयुष्यात खूप काही चांगले काही वाईट अनुभव आले.जगणं, माणुसकी,नाती, मैत्री आणि छंद या सर्वांनी मिळून आनंद कमी पण दू:ख भरपूर दिले.हसण्याबागडण्याच्या वयात जबाबदारी पेलली.सासुरवास कसा असतो तो नकळत्या वयापासून भोगल्यामुळे खूप कमी लोक माझ्या आयुष्यात घनिष्ठ बनली.जी मला हक्काची नाती वाटतात आणि त्यांनाही मी तितकीच महत्त्वाची वाटते.
हे सर्व सांगण्याचा उद्देश इतकाच की त्या मोजक्या माणसांपैकी तुम्ही सुध्दा एक आहात.वयाने लहान असूनही एका पोक्त माणसांप्रमाणे आपल्या सर्व स्टाफला समजून घेऊन हसत खेळत मैत्रीपूर्ण वातावरणात काम करून घेता ही तुमची खासियत आहे.
सर्वांना समजून घेऊन अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करता.जितकी अधिकारी वाणी तितकाच बालीश स्वभाव हे खूप छान वाटत.आपली प्रत्येक आशा आपल्या कुटुंबातील सदस्य आहे हे मनाला भावलं जेव्हा तिर्हाईत व्यक्ती वाकडं बोलली तेव्हा तुम्ही सडेतोड उत्तर दिले.अन कळले की, अरे आपल्या कार्यमंदिराला कुटूंबाप्रमाणे जपणारी कुटुंब प्रमुख खूप छान आहे.
काम केलंच पाहिजे पण हसत खेळत मनमिळाऊ स्वभाव ठेवून माणुसकी जपून हे लय भारी वाटलं.
वयाने लहान पण अनुभवाने महान असणार्या सेवाभावी उपकेंद्राच्या सर्वेसर्वा डॉ.स्वप्नाली पाटील मॅडम तुम्हाला प्रकट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत याच सदिच्छा.
*सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर*
No comments:
Post a Comment