अक्षर कोलाज
पायगुण प्रकाशन अमरावती या प्रकाशन संस्थेने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत सामावून घेऊन अक्षर कोलाज नावाचे सर्वोत्तम पुस्तक डॉ.सुनिल दादा पाटील यांनी लिहिलेले आहे.
खरोखरच जो अभ्यासपूर्ण तळमळीने लिहीतो तोच खरा लेखक असतो आणि सुनील दादा हे त्यातलेच एक आहेत.जी तळमळ,जी सल मनातून खदखदते आजुबाजूला जे घडत आहे त्यातून दुःखी झालेले मन, न्याय व्यवस्थेची दुरावस्था या सर्वांवर त्यांनी लेखणीतून प्रहार केलेला आहे.
आजच्या तरुण पिढीसोबत पालक वर्ग सुध्दा तंत्रज्ञान मोबाईलच्या विळख्यात अडकलेला आहे.त्यापासून सावध राहण्यातच कशी योग्यता आहे हे ही सुनील दादांनी सांगितले आहे.शिक्षणाचे महत्व सांगताना ते म्हणतात की, शिक्षकांना फक्त शिकवण्यासाठीच ठेवावं , तसं न करता शासन त्यांना जनगणना,लसिकरण , इलेक्शन ड्यूटी, सर्व्हे या सारख्या अनेक कामांत गुंतवून शिक्षकांची कुचंबणा करत आहे हे त्यांच्या शब्दाशब्दांतून खदखदताना दिसतेय.
एकूण तेहत्तीस प्रकरणांतून त्यांनी गर्भापासून ते स्वर्गापर्यंतच्या जीवांची घुसमट तसेच होणारे अत्याचार आणि नुकसान सविस्तर मांडली आहे.व्यसनाधिनता , कुपोषण, बेरोजगारी सारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर त्यांनी लेखणी चालवली आहे.पुरूषप्रधान संस्कृती मध्ये महिलांची होणारी घुसमट, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची,सायबर गुन्ह्यांमध्ये तर किती तरी धोके घडत आहेत.त्यापासून सावधगिरीचा सूचकपणा त्यांनी दिलेला आहे.पर्यावरणाची सुरक्षितता त्यांचा होणारा र्हास त्यातून ओढवणारी आपत्ती,झालेले नुकसान नाहक बळी गेलेले जीव यातून खदखदणारं दू:ख त्यांनी प्रहारी प्रमाणे मांडलेले आहे.सालानुसार प्रत्येक गोष्टींची माहिती खर्च यांचा ताळमेळ त्यांनी अभ्यासपूर्ण मांडलेला आहे.त्यांच्या लेखणीला सलाम.
२४मेला जागतिक भाऊ दिवस असताना रखरखत्या उन्हात येऊन त्यांनी ज्या आत्मियतेने मला अक्षर कोलाज ची आव्रुत्ती दिली, त्यांच्या या द्रुढविश्वासाला , मायेला माझा सलाम. डॉ.डी.एम.चांगाडे सरांविषयी असलेल्या गुरू प्रेमाला माझी निळी सलामी.सुनिल दादा दिवसेंदिवस प्रगती पथावर यश मिळवत रहा एवढीच अपेक्षा! तुमच्या उत्तम वाणीने सर्वांना आपल्यासोबत नेताना एक सच्चा पाठीराखा भाऊ भेटतो.तुम्हांला सूख समाधान आरोग्य लाभावे याच सदिच्छा भेट देऊन आपल्याला भरभरून शुभेच्छा देऊन थांबते.
सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती कोल्हापूर
आभारी आहोत, प्रतिक्रिया खूपच बोलकी आणि अभ्यासपूर्ण आहे. धन्यवाद
ReplyDelete