Monday, March 13, 2023

शिवबा हा प्रिन्स

        शिवबा हा प्रिन्स

खूप मोठा हो बाळा तू जसा लहानगा शिवबा

तुझ्याभोवती मित्र गोळा जसे असतील ते मावळा

राजपूत्र तू या घरचा प्रिन्स तुझे नाम बा

खूप माणसं जोडून जग विसरू नको गोतावळा 

प्रेम मिळावं आजी आजोबा अन् काका काकींचे 

ऋणानुबंध निर्माण व्हावे भावाबहिणींचे 

असंख्य असती नाती तरी तू जपणूक कर भावनांचे

आपुलकी अन् प्रेम ओळख नको ढोंग नात्याचे

पैसा प्रतिष्ठा पद ही मिळेल बंध असतील दृढतेचे 

नको भ्रष्टाचार अन् भूलथापा ध्येय तुझ्या जीवनाचे

नकोस होऊ दुटप्पी तू रहा नेहमी लोभसवाणा 

मिठास असावी शब्दांत अन् करारी तुझा बाणा

घे गगन भरारी चिमुकल्या समतेचा होऊन पुजारी

न्यायहक्कासाठीच लढ किर्ती तुझी होईल भारी

सातारच्या चार हो म्हातारा पण....नियत कधी बदलू नको

बुलढाण्याचा वाघ जरी तू गाव धरणगुत्ती विसरू नको

खेड्यातील ही माणसं आम्ही आपुलकी तू नाकारू नको

सत्यशोधक हो तू लेका वाट वाकडी शोधू नको

दूर्दम्य इच्छा शक्तींवर सूख वाटण्या विसरू नको

मन दुखेल शब्दांनी असा शब्दतीर ही चालवू नको

वेल भिडावा गगनाला तुझ्या आयुष्यातील कर्तृत्वाचा

हाच आशिर्वाद आहे बाळा तुला वराळे परिवाराचा 


सौ‌  मनिषा  पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर

No comments:

Post a Comment