Saturday, August 20, 2022

आमची अम्मी

                    आमची अम्मी

हसतमुख स्वभावाची बोलकी हास्य विनोद करणारी

मजेमजेतून आरोग्य शिक्षण देणारी

प्रत्येक परिस्थिती हळूवार हाताळणारी 

अशी आमची अम्मी आहे बोलक्या स्वभावाची

तिच्या नजरेतून खूप काही जाणवत असतं

तिची घालमेल तिचा त्रास सारं काही दिसत असतं

अशी आमची अम्मी तिला खूप काही माहिती असतं

घाईघाईने आवरणं तिच्या अंगवळणीच दिसतं

कामाच्या व्यापात तिचं स्वतः कडे लक्ष नसतं

दर्दी यातना तिच्या उरात लपल्यासारखं वाटतं

तरी हसतमूखानं बोलणं तिनं सोडलेलं नसतं

आरोग्य शिक्षणाच्या प्रवाहातला प्रवास तिचा

पोहणं,बुडणं तरी ध्यास कर्तव्य निष्ठेचा

खूप मैत्रिणी मिळाल्या असतील हा विजय माणुसकीचा

कर्तव्य दायिनी अशी अम्मी शब्द तिचा आपुलकीचा

खूप काही करायचं राहून गेलं तरी दिसते समाधान

प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जेचे देते ज्ञान

अशी खूप विरळा माणसं आहेत जे विसरतात भान

म्हणूनच वाटतो मनिषाला त्यांचा खूप खूप अभिमान


सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर


No comments:

Post a Comment